चायनीज ॲपच्या माध्यमातून केली जाणारी डेटाचोरी राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) सोमवारी आणखी ५४ ॲप्सवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले, जे एकतर चीनमध्ये आहेत किंवा काही चीनी कनेक्शन आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने या ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती.

नवीन सूचीनुसार, व्हिडिओ एडिटिंग ॲप्स  Viva Video Editor- Snack Video Maker with Music and Nice Video Baidu, जे लहान व्हिडिओ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात, Onmyoji Chess आणि Conquer Online II सारख्या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. PUBG वर बंदी घातल्यानंतर भारतातील पोरं ज्या गॅरेना फ्री फायर- इलुमिनेट या गेमकडे वळली होती त्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याआधीही याआधीही जून २०२० मध्ये सरकारने IT कायद्याच्या कलम ६९ अंतर्गत जारी केलेल्या समान आदेशानुसार, TikTok, ShareIt, UC Browser, Likee, WeChat आणि Bigo Live यासह ५९ ॲप्सवर बंदी घातली होती.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे. ही कारणं चायनीज ॲप बंदीमागे दिली जातात. 

पण याचा नेमका रथ काय आणि नेमका काय धोका आहे हे कमी वाचण्यात येतं तर तेच एकदा समजून घेऊ.

तर या सगळ्यांच्या मुळाशी आहे चायना करत असलेली डेटाचोरी. हे चायनीज ॲप यूजरच्या परवानगीशिवाय किंवा ज्यासाठी परमिशन घेतली आहे त्यापेक्षा वेगळा कारणांसाठी डेटा जमा करतात. आणि हा डेटा थेट चीनमध्ये जमा केला जातो.

आता हे उदाहरणासकट सांगतो…

समजा आपल्या एकाद्या सैनिकाने किंवा महत्वाच्या पदावर असणाऱ्या भारतीय नागरिकाने एखादे चायनीज ॲप इंस्टॉल केले. तर अनेकदा हे ॲप त्याच्या मोबाईल मधला डेटा ज्यामध्ये पर्सनल माहिती, फायनान्शियल ट्रँजॅक्शन, लोकेशन ही माहिती जमा करतात. आणि ही माहिती थेट मग जाते चीनमध्ये. आता या महत्वांच्या व्यक्तीची माहिती आपल्या शत्रू राष्ट्राकडे असणे कसं राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये.

आता चीनमधल्या सगळ्या महत्वाच्या कंपन्यांच्या कामात चीनची कम्युनिस्ट पार्टी कशी हस्तक्षेप करते हे आता लपून राहिलेले नाही. 

अलीबाबा ग्रुपच्या जॅक माला सुद्धा चीनच्या  कम्युनिस्ट पार्टीने आपल्यापुढे झुकण्यास भाग पाडलं होतं.

 एव्हढच नाही तर चीन सरकारनं एक कायदा करूनही चायनीज कंपन्यांना सरकार पुढे कुर्निसात घालण्यास लावलेलं आहे.

चीनचा नॅशनल इंटेलिजन्स लॉ हा या बाबतीतला सगळ्यात महत्वाचा कायदा आहे. 

या कायद्यानुसार चीनमधल्या सर्व नागरिक, कंपन्या यांना राज्याच्या गुप्तचर विभागाबरोबर सहकार्य करणं कंपलसरी आहे. याच कारणांमुळं अमेरिकेने हुवाई वर बंदी घातली होती.

हुवाईकडे आज जगातली सगळ्यात प्रगत आणि स्वस्त असं 5G तंत्रज्ञान आहे. 

मात्र चीनच्या या असल्या वागणुकीमुळे देश  हुवाईबरोबर हातमिळवणी करण्यास पुढे येत नाहीत.

अजून एक महत्वाची गोष्ट दुसऱ्या देशांमध्ये चिनी कंपन्यांनी जरी विळखा घातला असला तरी बाहेरच्या कंपन्यानं मात्र चीनच्या कडक निर्बंधांमुळे चिनी भिंत पार करणं जमलेलं नाहीये. गूगल, फेसबुक, ट्विटर या सारख्या सोशल मीडियाला चीनमध्ये एंट्री नसून या साठी चीननें पर्यायी व्यवस्था केली आहे ज्यावर चिनी सरकराचा पूर्ण कंट्रोल असतो. तसेच ज्यांना चीननं एंट्री दिली आहे तर त्या कंपन्यांना एक चायनीज पार्टनर शोधणं बंधनकारक असतं.

त्यामुळं ही सगळी माहिती लक्षात घेता चायनीज ॲप्सच्या माध्यमातून ड्र्गन्सचा घट्ट होत जाणारा विळखा आधीच सोडवणं भाग होतं जे ह्या ॲप बंदीच्या माध्यमातून केलं जात आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.