जेव्हा पोलिसांची धाड पडली आणि दाऊद अर्धी बिर्याणी टाकून जीव मुठीत घेऊन पळून गेला होता…
मुंबईवर सत्ता गाजवू पाहणाऱ्यांमध्ये दाऊद इब्राहिमसुद्धा होता. मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये त्याच्या वाटेत जे जे लोकं आडवे येत गेले त्या त्या लोकांना कायमचं आडवं करून दाऊदने आपली दहशत निर्माण केली होती. आपल्या काळ्या धंद्यातून तो करोडो रुपये छापू लागला होता. मुंबईतले बिल्डर्स, व्यावसायिक लोकांचा तो अनपेक्षितपणे बॉस झाला होता आणि मोठ्या त्यांच्याकडून खंडण्या उकळू लागला होता.
पण इतकं मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या दाऊदला पोलिसांकडून पकडलं जाऊ नये म्हणून एकदा खात्या ताटावरून उठून जीव मुठीत घेऊन पळून जावा लागलं होतं त्याबद्दलचा हा किस्सा.
दाऊद बद्दलचे अनेक सिक्रेट उलगडले आहेत डीआरआय माजी जनरल बी व्ही कुमार यांनी आपल्या DRI And The Don’s या पुस्तकामध्ये. यात दाऊदचा सुरवातीचा काळ दाखवलेला आहे. त्या सुरवातीच्या काळात दाऊदची 90 च्या दशकासारखी दहशत नव्हती. तेव्हा तो एक लोकल गुंड होता. सिनेमांमध्ये जसं त्याला जाडजूड, जाड मिश्या, डोळ्यावर गॉगल आणि हातात सिगारेट दाखवलेलं आहे तसा तो नव्हता.
त्या काळात तो लोकांना धमकवण्यासाठी आलमजेब पठाण सारख्या लोकांना जवळ बाळगत असे आणि त्यांच्या जीवावर तो हवा करत असायचा. लोकांना खंडणीच्या धमक्या देऊन आणि मर्डर करण्याच्या गोष्टी करून तो आपली दहशत माजवू पाहत होता. पण पुढे आलमजेब आणि दाऊदमध्ये दुष्मनी निर्माण झाली.
आलमजेबने दाऊदवर दोनदा गोळीबार केला होता. एकदा तर एक गोळी दाऊदच्या मानेला चाटून गेली होती पण ती गोळी आलमजेबची नव्हती तर दाऊदचा साथीदार हाजी इस्माईलची होती जी चुकून चालवली गेली होती. जेव्हा तो जखमी झाला तेव्हा बी व्ही कुमार यांनी त्याला पकडलं आणि चौकशी केली होती.
एके दिवशी गुजरातच्या लल्लू जोगीच्या फार्म हाऊसवर दाऊदचा माल उतरणार असल्याची माहिती बी व्ही कुमार याना मिळाली होती आणि त्याचवेळी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्या फार्म हाऊसमध्ये दाऊदसुद्धा दाखल झालेला होता. बी व्ही कुमार यांनी सापळा रचला आणि छाप्याची पूर्ण तयारी केली होती. दाऊद त्या फार्म हाऊसमध्ये बिर्याणी खात बसलेला होता. जेव्हा छापा पडला तेव्हा दाऊदची धांदल उडाली ,पोलिसांचा आवाज येऊ लागला आणि तो बिर्याणी अर्धी टाकून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. आपलं उरलंसुरलं सामान घेऊन दाऊद पोलिसांच्या भीतीने पळून गेला होता.
बी व्ही कुमार म्हणतात की दाऊद एक सामान्य गुंड होता पण इतरांच्या सोबतीला राहूनही त्याने आपला अवैध धंदा वाढवला. त्याचा उद्देश हा पैसा कमावणे हाच होता पण त्या नादात तो आतंकवादी बनत गेला.
हे ही वाच भिडू :
- बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..
- सुषमा स्वराज यांच्या एका निर्णयामुळे दाऊदचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं होतं.
- एक असा गंड पत्रकार ज्याने दाऊदच्या हॉटेलवर ४.२८ कोटींची बोली जिंकली होती!
- भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला