हे आहेत दाऊदचे लेटेस्ट फोटो

दाऊद कोरोनामुळे गेला. दाऊदचा जितका बाजार  राॅ ने उठवला नसेल तितका बाजार भारतीय माध्यमांनी उठवला आहे.

आजपर्यन्त कित्येकदा अयशस्वीपणे दाऊदला मारण्याचं यशस्वी काम कोणी केलं असेल तर ते फक्त भारतीय मिडीयावर. 

खरं सांगायचं तर जगात इबोला येवूदे, बर्ड फ्लू येवूदे, सार्स येवूदे प्रत्येक संकटात मिडीया बळी देत तो दाऊदचा. आत्ता दाऊद खरच गेला की जिवंत आहे हे सांगणं अवघड असलं तरी दाऊदच्या भावानेच दाऊद जिवंत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

असो तर या दाऊद प्रकरणामुळे एक नवीन चर्चा वरती आली. ती म्हणजे किती दिवस दाऊदचे तेच ते जुने फोटो दाखवणार. भारतीय माध्यमांमधून दाऊदचे तेच १९८० च्या काळतले दोन तीन फोटो दाखवले जातात.

आत्ता या फोटोंचे पण काही खास किस्से आहेत. त्यातल्या पहिल्या फेमस फोटोचा किस्सा तुम्हाला सांगतो.

दाऊदचा हा बराच फेमस फोटो आहे. पिवळ्या शर्टमधला दाऊद निवांतमध्ये क्रिकेट बघतोय. हा फोटो १९८५ च्या भारत पाकिस्तान मॅचमध्ये काढण्यात आला होता.

ही मॅच होती शारजाहं मध्ये.

मॅचचे फोटो काढण्याची जबाबदारी इंडिया टुडेच्या भवरसिंह यांच्याकडे होती. ते सांगतात की मला पाठीमागून दाऊद दाऊद असा आवाज आला.

A9B94D6B FA12 4534 B2A1 8FA943396C6F

समोर बसलेल्या दाऊदकडे मी कॅमेरा रोखला आणि फोटो काढू लागलो. तेव्हा मला एका गुंडाने रोखल. तो गुंड छोटा राजन होता. मात्र लगेच दाऊदने खिंचने दे अशी आर्डर दिली आणि हा फोटो निघाला.

या फोटोबद्दलची विशेष स्टोरी डिटेलमध्ये वाचण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. 

पण हे दोन तीन फोटो सोडले तर दाऊदचे इतर फोटो नाहीत. आत्ता हे फोटो आहेत सुमारे १९८० ते १९८५ सालातले. दाऊद असा दिसायचा त्याला सुमारे ३५ ते ४० वर्ष झाली.

तूम्ही एक काम करा आपल्या फेसबुकचा डिपी आहे तो फोटो पहा आणि पाच सहा वर्षांपूर्वीचे फोटो पहा. अक्षरश: तुम्हाला स्वत: बद्दल धक्का बसेल.

मग ह्यो तर दाऊद आहे. विचार करा दाऊद किती बदलला असणार. एकतर दाऊद आत्ता म्हातारा झाला असणार. त्याची केसं पिकली असणार. चुकून तो कंबरेत वाकला असला तर. किंवा त्याचे सगळे दात सुद्धा पडलेले असू शकतात. शक्यता तर खूप आहेत.

मग आम्ही काय केलं तर लेटेस्ट मधले फोटो मिळतात का याचा विचार केला. तेव्हा गुगलवर आम्हाला हे फोटो मिळाले.

यांतील काही दहा वर्षांपूर्वी काढलेले आहेत तर काही २० वर्षांपूर्वी.

१) २०१५ सालाच्या इंडिया टुडेच्या बातमीत हा फोटो छापण्यात आला आहे. फोटोखालील लिंकवर जावून आपण संबधित बातमी वाचू शकता.

C529F532 6063 48E2 A7F2 96C42E69757Bhttps://m.hindustantimes.com/india-news/india-makes-pitch-to-grill-dawood-ibrahim-aide/story-LSqmRiXV2jINUmDAuri2EP_amp.html

२) दाऊदचा हा फोटो दहा ते वीस वर्ष जूना असल्याचे सांगतात. वेगवेगळ्या न्यूज चॅनेलमधून हा फोटो झळकला असून आपल्या कराची येथील बंगल्यात हा फोटो त्याने काढला असल्याचं सांगण्यात येत.

9B99D67B 997B 4695 A7A7 B86EFA2F8B3E

३) हा फोटो झी न्यूज सह इतर माध्यमांमधून झळकला होता. दाऊदचा हा सर्वात लेटेस्ट फोटो आहे अस सांगण्यात येतं.

https://zeenews.india.com/hindi/pakistan-china/exclusive-latest-picture-of-dawood-ibrahim-in-pakistan-captured-by-indian-intelligence-agencies/549145/amp

730ADB2F 87A1 4FD3 8492 755348D9A43C

Leave A Reply

Your email address will not be published.