द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?
युक्रेन रशिया युद्ध आता युक्रेनच्या प्रमुख शहरांवर येऊन ठेपले आहे. सुरवातीला जरी युक्रेनने चांगली लढत दिली असली तरी रशियन आक्रमण आता लोकवस्तीच्या जवळ आलेलं असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात होत आहे. इथून पुढे युद्धच अजून भीषण रूप जगापुढे येण्यास सुरवात होईल. ९ व्या दिवसांनंतर युद्ध नेमकं कोणत्या परिस्थितीत येऊन ठेवलं आहे याचा आढावा घेऊ.
वॉशिंग्टन पोस्ट –
आधी नॉर्थ मधून जोरदार आक्रमण करणाऱ्या रशियाने युक्रेनच्या दक्षिणेतूनपण तेवढाच जोर लावला आहे. त्यामुळं युक्रेनला सर्व बाजूनी आता रशियन अक्रर्माणाचा सामना करावं लागत आहे.
आणि यामुळंच युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात मानवहानी होण्यास सुरवात झाली आहे असं पोस्ट ने म्हटलं आहे. आत्ताच नेमके किती मृत्यू होत आहेत हे युक्रेनला नेमकं मोजता येत नाहीये. युनायटेड नेशन्सने युक्रेनमध्ये आतापर्यंत किमान ७५३ सामान्य नागरिक युद्धाला बळी पडलेत ज्यामध्ये २२७ ठार आणि ५२५ जखमी झाले आहेत, ज्यात अनेक मुलांचा समावेश आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनला केला जाणाऱ्या शस्त्रास्त्रे पुरवठ्यात वाढ केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी टॅंक आणि एअर डिफेन्स सिस्टिमचा समावेश आहे. युक्रेनमधील युद्ध आत समोरासमोर खेळलं जाईल ही शक्यता ध्यानात घेऊन अमेरिकेने हत्यारांचा पुरवठा वाढवल्याचा पोस्ट ने म्हटलं आहे.
अल -जझीरा
नाटोने रशियन हल्ल्यांदरम्यान “नो-फ्लाय झोन” स्थापित करण्याचे युक्रेनियची विनंती नाकारली आहे.
कारण लष्करी नो-फ्लाय झोनचा प्रॉब्लेम असा आहे की त्याची अंमलबजावणी लष्करी शक्तीने करावी लागेल. जर एखादे रशियन विमान नाटोच्या नो-फ्लाय झोनमध्ये गेले तर नाटो सैन्याला त्या विमानावर कारवाई करावी लागेल. ज्यामध्ये आकाशातून विमान शूट करणे हे देखील समाविष्ट असू शकते. आणि जर असं झालं तर रशियाच्या दृष्टीने ते नाटोचे युद्ध असेल आणि संघर्ष अजूनच चिघळेल.
अनेक न्यूज आउटलेट्सने म्हटले आहे की ते नवीन कायद्यामुळे रशियामध्ये त्यांचे कार्य थांबवतील पुतीन यांनी “बनावट” बातम्या पसरवणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा करण्याचा कायदा पास केला आहे. यामुळं ता रशियन सरकारला अपेक्षित आहेत तश्याच बातम्या आता प्रसिद्ध केल्या जातील.त्याचबरोबर रशियाने फेसबुकला ब्लॉक केलं आहे तर ट्विटरवर निर्बंध घातले आहेत.याच बरोबर UN मध्ये रशियाने मानवाधिकारांचं केलेल्या उल्लंघनची चौकशी देखील होणार आहे.
ग्लोबल टाइम्स
चीनच्या या वृत्तपत्राने आता युद्धाच्या बातम्या देणं जवळपास थांबवलेलं दिसतंय. त्यामध्ये नुईज एजन्सीने असं म्हटलंय की कि रशियावर सॅंक्शन टाकले तरी त्यांच्या डिफेंस इंडस्ट्रीवर जास्त फरक पडणार नाहीये. बाकी युद्धाच्या काळात कशी आपली अर्थव्यवस्था जोरात आहे असंच चीन आपल्या नागरिकांना सांगत आहे.
द गार्डियन
आण्विक हानी थोडक्याने वाचली असं म्हणत काळ युक्रेनमधल्या नुक्लिअर पॉवरप्लांटला लागलेली आग आता नियंत्रीत आहे असं गार्डियन ना म्हटलं आहे. आणि बाकीच्या दिवसांसारखाच युद्धातल्या नाटोचं . युरोपियन देशांचं अपयश यावर काहीही नं बोलता सामान्य नागरिकांना युक्रेनयुद्धात किती समस्यांना सामोरं जावं लागतंय यावरच गार्डीयनने आपला भर दिला आहे.