द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशिया-युक्रेन वॉर दिवसेंदिवस भीषणच होत चालंलय. पुतीन चर्चेसाठी तयार झाले आहेत मात्र त्याच वेळी युद्ध मात्र चालू आहे. दिवसेंदिवस देश सोडून जाणाऱ्या युक्रेनियन निर्वासितांची संख्या ही वाढत आहे. तर आठव्या दिवसानंतर युद्ध कोणत्या वळणावर  येऊन ठेपले आहे त्याचा आढावा घेऊ.

वॉशिंग्टन पोस्ट –

WhatsApp Image 2022 03 04 at 8.35.52 AM

रशियाने युद्धात आता आपला पूर्ण जोर लावला आहे अशा आशयाची वॉशिंग्टन पोस्टची हेडलाइन आहे.

पोस्टने जो मॅप छापला आहे त्यावरून युद्ध नेमकं कोणत्या स्थतीत आहे याची कल्पना करता येते. युक्रेनचे किव्ह, खारकीव्ह, मारिओपॉल, खेरसोन या शहरांना रशियन सैन्याचा वेढा अगदी घट्ट झाला  आहे. यामध्ये  खारकीव्ह या शहरात आतापर्यंत सगळ्यात जास्त बॉम्ब टाकण्यात आले असून जीवितहाणीही याच शहरात जास्त आहे. रशियन सैन्य जेव्हा शहरावर हल्ला करत आहे तेव्हा त्यांची स्ट्रॅटेजि असते की जी पब्लिक प्रॉपर्टी म्हणजे कम्युनिटी हॉल, गव्हर्नमेंट बिल्डिंग उध्वस्त करायची ज्यामुळे मग  शहर सरेंडर करेल. 

WhatsApp Image 2022 03 04 at 8.43.43 AM

the worst is yet to come…

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली त्यावरून पुतीन यांचा सध्यातरी युद्ध थांबवण्याची कोणतीही तयारी नाहीये. या चर्चेत पुतीन यांचा पूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याची महत्वाकांक्षा असल्याचं दिसून आल्याचं वृत्तही पोस्ट ने दिलं आहे.

वॉशिंग्टन पोस्ट च्या महत्वाच्या अपडेट्स ..

  • रशियन सैन्याने आग्नेय युक्रेनमधील आण्विक  साइटवर गोळीबार केल्यानंतर युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे असं युक्रेनियन अधिकार्‍यांचं म्हणणं आहे आहे. परंतु संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक वॉचडॉगने  सांगितलय की या आगीमुळे “आवश्यक” उपकरणांवर अजून परिणाम झालेला नाहीये.
  • युक्रेनचे लोक तीन वर्षांपर्यंत युरोपियन युनियनमध्ये “तात्पुरत्या संरक्षणासाठी” पात्र असतील अशी हमी देण्यात आली आहे.

अल-जझीरा 

WhatsApp Image 2022 03 04 at 9.19.19 AM

अल जझिराच्या अपडेट्स नुसार

  • युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चर्चेसाठी बसण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर अधिक आंतरराष्ट्रीय समर्थनाची मागणी केली आहे.
  • युक्रेन आणि रशियन यांच्यात ज्या वाटाघाटी चालू आहेत त्यामध्ये लोकांना युद्धक्षेत्रातून बाहेर पाडण्यासाठी  ‘हुम्यानीटेरियन  कॉरिडॉर’  तयार करण्यास रशियाने मान्यता दिली आहे.
  • यूएनच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या हल्ल्यादरम्यान दहा लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केले आहे.

ग्लोबल टाईम्स –

WhatsApp Image 2022 03 04 at 9.30.40 AM

चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या या न्यूज एजन्सी कडून आज वेस्टर्न देश रशियावर घालत असलेल्या आर्थिक निर्बंधांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

फेडरेशन इंटरनॅशनल फेलाइन, बेल्जियममधील  मांजर नोंदणी एनजीओने, मंगळवारी त्यांच्या  शोमधून रशियन जातीच्या मांजरींवर बंदी घालण्याची घोषणा केली आणि रशियामध्ये राहणा-या मांजरी मालकांना देखील संस्थेतून बंदी घालण्यात आली आहे. याचा हवाल देत पाश्चिमात्य देशांचे निर्बंध किती हास्यसपद असल्याचं ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.

तसेच वाढत्या जिओपॉलिटिकल धोक्यांचा विचार करता याही वर्षी चीन आपलं बजेट किमान ७% नि वाढवेल असं ग्लोबल टाईम्सने छापलं आहे.मार्च २०२१ मध्ये, चीनने १.३५ ट्रिलियन युआन ($२०९ अब्ज) चे संरक्षण बजेट जाहीर केले होते जे मागच्यावर्षीपेक्षा  ६.८ टक्के जास्त होतं.

द गार्डियन 

द गार्डियनने पण the worst is yet to come.. म्हणत पुतीन युद्ध अजूनच भीषण करू शकतात असं म्हटलं आहे. पुतीन यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे प्लॅन केलं होतं त्यानुसारच युद्ध पुढे सरकत आहे. युद्धात शाहिद झालेल्या आपल्या पोराच्या मृतदेहाला कवटाळणाऱ्या बापची इमेज युद्धाबाबदल बरंच काही सांगून जाते.

युक्रेनमधील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाला रशियन गोळीबारामुळे आग लागली असून. इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) ने म्हटले आहे की झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात “गंभीर परिस्थिती” निर्माण झाली असल्याने त्यांनी त्यांचे आपत्कालीन केंद्र “24/7 रिस्पॉन्स  मोड” मध्ये ठेवले आहे.
म्हणजे एकंदरीतच युद्ध दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.