दिल्ली सरकारने बंदी घातलेल्या स्पा मधल्या क्रॉस जेंडर मसाजला पुन्हा सुरुवात होणार का ?

कोरोना पार्श्वभूमीवर देशभर ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बंद करण्यात आलेला व्यवसाय म्हणजे सलून,ब्युटी  पार्लर, स्पा. सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी सलून स्पा व्यवसाय बंद करणे रास्त होते. पहिली लाट ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती.

परंतु त्यामधून स्पा,ब्युटी पार्लर,वगळण्यात आले होते. नंतर काही प्रमाणात त्यांना परवानगी देण्यात आली.नंतर दुसरी लाट आली तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती होती. परंतु आता लसीकरणानंतर सर्व उद्योग सुरळीत चालू आहेत. स्पा, ब्युटी पार्लर , यांना पण पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.

स्पा ला परवानगी देण्यात आल्यानंतर अनेक सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात उघडकीस येऊ लागले होते. बरेच दलाल आणि स्पा चे मालक स्पा च्या नावाने तिथे वेश्या व्यवसाय चालवित असल्याच्या घटना महाराष्ट्रासोबत संपूर्ण देशात उघडकीस येताना बघितल्या गेल्या.

महाराष्ट्रात हि अशीच काही प्रकरण उघडकीस आलेली आहेत ती आधी बघूया…

पिंपरी वाकड येथे एका स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने उघडकीस आणले होते. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी दोन युवकांसह स्पाची मालक व व्यवस्थापक असलेल्या एका महिलेवर गुन्हा दाखल झाला होता.

वाकड येथील दत्त मंदिर रोड येथे फॉरव्हर स्पा झोन स्कीन केअर या सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी बनावट गिन्हाईकाच्या माध्यमातून खात्री करून कारवाई केली होती.

देशभरात अशी अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. तेव्हा देशभरात ह्या असल्या प्रकरणांना आळा  घालण्याची मागणी होत होती. ह्या अशी प्रकरणे दिल्ली ,मुंबई सारख्या मोठ्या शहरात उघडकीस येण्याचे  प्रमाण जास्त होते. यावर आळा  म्हणून दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला होता.

स्पा सेंटरमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्तींचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली होती. म्हणजेच महिलांनी पुरुषांचा आणि पुरुषांनी महिलांचा स्पा करण्यावर बंदी घालण्यात आली होती. हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी त्याचं स्वागत केलं होता. ह्या निर्णयामुळे सेक्स रॅकेटवर आळा बसेल असा विश्वासही व्यक्त केला जात होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लैंगिक शोषण आणि देहव्यापार रोखण्यासाठी राष्ट्रीय राजधानीतील स्पा आणि मसाज सेंटर चालवण्यासाठी कठोर नवीन नियमांना मंजुरी दिली. यामध्ये स्पा करण्यासाठी जर पुरुष स्पा सेंटरला आला तर पुरुषानेच स्पा करावा असं म्हटलं आहे तिथे महिलांना स्पा करण्यावर बंदी लावण्यात आली होती.

बंदी जाहीर झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि,‘आम्ही दिल्लीतील अनेक मसाज पार्लरमध्ये अचानक धाडी घालून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे आणि सरकारला शिफारशी सादर केल्या आहेत. आता दिल्लीत भिन्न लिंगाच्या व्यक्तीच्या मालिशवर बंदी घातल्याबद्दल मी दिल्ली सरकारची आभारी आहे’

परंतु यामध्ये एक नवीन वळण आले आहे. गेल्या महिन्यात द असोसिएशन ऑफ आयुर्वेद आणि स्पा यांनी एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते, कि दिल्ली सरकारने स्पा साठी केलेले नियम हे जाचक आहेत. आम्हाला विरुद्ध लिंगी मसाज ला बंदी घातल्यामुळे आम्हाला नवीन व्यवस्था करावी लागणार आहे, जे आम्हाला परवडण्यासारखे नाही. योग आणि जिम मध्ये सुद्धा क्रॉस जेंडर ट्रेनर हे असतातच. परंतु याआधी घडलेल्या घटनांमुळे सरसकट सर्व स्पा ला हे नियम लावणे योग्य नाही त्यामुळे हि बंदी उठवावी.

त्यामध्ये सरकारने कोर्टात या याचिकेला उत्तर देताना म्हटलंय कि, आम्ही  स्पा संदर्भात लागू केलेले नियम हे सध्या तरी कोणावर बंधनकारक नाहीत. हेंल्थ ट्रेड लायसन हे दिल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट,१९५७ च्या कलम  ४१७ अंतर्गत दिले जाते. जोपर्यंत या कायद्यात बदल केला जात नाही तोपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात येणार नाही.

पण तुम्हाला माहितीये का कि, स्पा मध्ये सेक्स रॅकेट रोखण्यासाठी सुद्धा काही नियम अगोदर पासुनच लागू करण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष स्पा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंधनकारक आहेत. स्पा मध्ये सेवा घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे वैध असे ओळखपत्र जमा करून घेणे प्रत्येक स्पा मालकावर सक्तीचे आहे. वर्किंग अवर मध्ये स्पा चे दरवाजे हे लॉक करण्यात येऊ नये असं सुद्धा नियमांमध्ये  नमूद केलेलं आहे.

याचिकेच्या उत्तरात दिल्ली सरकारने दिलेल्या उत्तरावरून तरी हेच दिसतंय कि क्रॉस जेंडर मसाज ला सध्या तरी कुठलेही निर्बंध नाहीत. त्यामुळे आता स्पा मध्ये चालत असलेल्या सेक्स रॅकेट च्या प्रमाणात वाढ तर होणार नाही ना या शंकेस बळ मिळत आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.