तंदुर कांड : त्या घटनेनंतर लोकांनी तंदूरमध्ये भाजून खाणं बंद केल होतं…

तारिख २ जुलै १९९५….

दिल्ली….

मध्यरात्र झाली होती. दिल्लीच्या मुख्य भागात असणाऱ्या अशोक विहारच्या परिसरात असणाऱ्या बगिया रेस्टॉंरंट मधून आगीच्या ज्वाला येत होत्या. रेस्टॉरंटमध्ये आग लागल्यासारखी परस्थिती होती पण बाहेर कोणीच नव्हतं. या वेळी पेट्रोलिंग करणारा एक पोलिस हवलदार अब्दुलनसीर कुंजू आणि होमगार्ड चंद्ररपाल तिथून चालले होते.

रेस्टॉरंटच्या पाठीमागून येणाऱ्या ज्वाला पाहून ते थांबले. तिथेच गेटवर सुशिल नावाचा माणूस थांबलेला. कॉन्स्टेबलनं चौकशी केली तर तो म्हणाला, पार्टीचे पोस्टर जाळतोय !

कॉन्स्टेबलने आत जायचा प्रयत्न केला पण त्याला रोखलं. कॉन्सेबल मागं फिरला. तडक रेस्टॉरंटच्या मागच्या दिशेला जावून त्यांन भितींवरुन उडी मारली. आत येवून जवळून पाहू लागला तर एकजण त्या आगीत बटर ओतत होता. जास्तित जास्त आग भडकावी म्हणून प्रयत्न चालू होता. 

तंदुरी चिकन, तंदुरी रोटी च्यामध्ये भाजतात अशा तंदुरमध्ये ती आग लावण्यात आलेली. तो जवळ जावून पाहू लागलाच तो बाहेर थांबलेला सुशिल तिथे आला. पुन्हा कॉन्स्टेबल सोबत बोलून त्यांने कॉन्स्टेबला बाहेर पाठवलं. 

कॉन्टेबल बाहेर आला. सुशिल देखील कॉन्स्टेबल गेला म्हणून रिलॅक्स झाला. पण तो कॉन्स्टेबल इतक्यात थांबणारा नव्हता. त्याला येतायेता तंदूरमध्ये एका माणसांची बोटं दिसली होती.

एक अख्खा माणूस तंदूरमध्ये जाळला जातोय हिच गोष्ट भयानक होती. 

कॉन्स्टेबलने फोन केला, लागलीच तिथे पोलिसांची व्हॅन आली. रेस्टॉरंटमध्ये पोलिस शिरताच सुशिलने तिथून पळ काढला. रेस्टॉरंटचा मालक होता सुशिल शर्मा होता. पण तंदुरमध्ये जळणारी व्यक्ती कोण होती..? 

सकाळी या गोष्टीत तिसरी व्यक्ती दाखल झाली. त्याने प्रेताची ओळख पटली आणि देशाला हादरवून सोडणारं तंदूर कांड समोर आलं. अस तंदुर कांड कि ज्यामुळे दिल्लीसारख्या शहरात लोकांनी तंदूरमध्ये काही भाजून खाण्याचा विचार देखील वर्षभर सोडला होता. 

देशभरात हाहाकार झाला. तेव्हा आत्ताच्या सारखा मिडीया नव्हता तरिही सर्व वर्तमानपत्रातून हि बातमी पान नंबर एकवर होती. सुशिल शर्मा हा मुख्य आरोपी असल्याचं सिद्ध झालं होतं. पोलिस सुशिलला शोधत होते. 

सुशिल बंगलोरला लपून बसलेला. तिरुपतीला जावून त्यानं टक्कल केलेलं. तिथल्याच कोर्टात अटकपुर्व जामिनसाठी त्यानं अर्ज केला होता. सुशिल शर्माच्या या अर्जाची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली व दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केलं. 

मारण्यात आलेली व्यक्ती सुशिल शर्माची बायको नैना साहनी होती. नैना साहनी कॉंग्रेसमध्ये होती. सुशिल शर्मा कॉंग्रेस युथचा प्रेसिंडेन्ट होता. या दोघांचे प्रेमसंबध निर्माण झाले व त्यातूनच त्या दोघांनी बिर्ला मंदिरात लग्न केलं होतं. 

नैना साहनी सोबतचे संबध त्याने उघड केले नव्हते. याचाच दबाव ती सुशिलवर आणत होती. सुशिलला राजकिय करियरसाठी तिच्यासोबतचे संबध उघड करत नव्हतां. याच वेळी नैना आपला कॉंग्रेसमधेच असणाऱ्या दूसऱ्या मुलासोबत बोलत होती. हिच ती तिसरी व्यक्ती. 

सुशिल घरी आला तेव्हा ती फोनवर बोलत होती. सुशिलने चौकशी केल्यानंतर तिने उडवाउडवीची उत्तर दिली. सुशिलने रिडायल केला तेव्हा तिकडून त्या मुलाचा आवाज आला. त्याने पुढचा मागचा विचार न करता तिला तीन गोळ्या मारल्या. 

तिचा खून झाल्यानंतर त्याने तिचं प्रेत आपल्या गाडीत टाकलं, त्याने ते प्रेत यमुना नदिच्या काठावर आणलं. तिथे आपण पकडले जावू या भितीने तो आपल्या रेस्टॉरंटमध्ये आला. आपला मित्र रमेशला त्याने सगळ्या गोष्टी सांगितल्या. सुशिलने त्याला प्रेत तंदुरमध्ये टाकायला लावलं. आपल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी हे धाडस केलं. 

कोर्टात केस फाईल झाली. सुशिल शर्माला फाशी झाली.

त्यानंतर तो पुढच्या न्यायालयात गेला मात्र तिथे हि त्याची फाशी कायम झाली. सुप्रीम कोर्टाने या केसवर २०१३ साली निर्णय दिला. त्याला फाशीपासून मुक्त करण्यात आलं. त्याला जन्मठेप झाली. सुप्रीम कोर्टाने अस मत मांडल की, सुशीलला घडलेल्या गोष्टीच प्रायश्चित आहे. त्याने खून रागाच्या भरात केला होता. त्यापुर्वी व त्यानंतर कोणतिही केस, तक्रार सुशिलच्या नावावर नाही. त्यामुळे हि शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. 

सुशिल शर्मा तीन वर्षांपूर्वी २३ वर्षांची जेलची शिक्षा भोगून बाहेर आला. झालेल्या गोष्टींचा सुशिलला पश्चाताप होता. त्याने माध्यमांसोबत बोलताना सांगितलेलं की रागाच्या भरात मी नैना आणि माझ्या दोघांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. आत्ता मॅरेज कॉन्सलिंग झालं पाहीजे. व्यक्तिगत हेवेदावे सामोपचाराने सोडवले पाहीजेत अन् त्यासाठीच मी काम करेल.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.