थेट कोर्टात हत्या झालेल्या जितेंदर गोगीला दिल्लीचा सर्वात मोठा गँगस्टर म्हणून ओळखलं जायचं..

दिल्लीतला सगळ्यात मोठा गँगस्टर होता जितेंद्र गोगी. तिहार जेलमधून खंडणी गोळा करण्याचा आरोप त्याच्यावर होता. जितेंद्र गोगीची गणना हि दिल्लीतल्या टॉप मोस्ट गुन्हेगारांमध्ये केली जायची.

४ लाखांचा इनाम दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ठेवलेला होता. फक्त दिल्लीच नाही तर हरियाणामध्ये सुद्धा जितेंद्र गोगीची दहशत होती. हरियाणामध्येसुद्धा त्याच्यावर इनामी बक्षीस लावलेलं होतं.

दिल्लीमधल्या नरेला भागात स्थानिक नेता वीरेंद्र मान यांची हत्या जितेंद्र गोगीच्या गुंडानी केल्याचा आरोपसुद्धा त्याच्यावर होता. जितेंद्र गोगी आणि त्याच्या गँगने वीरेंद्र मान यांच्यावर तब्बल २६ गोळ्या झाडून त्यांच्या शरीराची चाळण केली होती.

हरियाणाची टॉप मोस्ट आणि फेमस गायिका हर्षिता दहियाच्या हत्येचा आरोपसुद्धा जितेंद्र गोगीवर होता. २२ वर्षाच्या नवीनच इंडस्ट्रीत पाय ठेवणाऱ्या या गायिकेची २०१७ ला पानिपतमध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. अशा अनेक गुन्ह्यांची नोंद जितेंद्र गोगीच्या नावावर होत्या. भयंकर दहशत दिल्लीमध्ये आणि आसपासच्या राज्यांमध्ये जितेंद्र गोगीने केलेली होती. पण २४ सप्टेंबर २०२१ रोजी या गुंडाची हत्या करण्यात आली. 

हा एन्काऊंटर गेम बराच काळ चालला आणि थेट कोर्टात चालला. दिल्लीच्या रोहिणी कोर्टात जितेंद्र गोगीच्या सोबतच त्याचे अजून चार लोक मरण पावले. रोहिणीमधल्या २ नंबरच्या कोर्टात हि फायरिंग झाली आणि या फायरिंगमध्ये अजून ३ लोकांना गोळ्या लागल्या. पोलिसांनी या एन्काउंटरमध्ये एका गुंडाला यमसदनी धाडलं.

दोन गटांमध्ये झालेली भांडण थेट गोळीबारीवर आली आणि यात दिल्लीतल्या सगळ्यात मोठ्या गॅंगस्टरची हत्या करण्यात आली. दोन टोळ्यांच्या या गोळीबारात पोलिसांनी राहुल नावाच्या एका गुंडाचा फडशा पाडला. जितेंद्र गोगीला संपवण्यासाठी दुसऱ्या गटाने एक विशेष प्लॅन आखलेला होता. 

चक्क वकिलाच्या वेशात गुंड आले आणि त्यांनी जितेंद्र गोगीवर गोळीबार सुरु केला. वकिलाच्या वेशात हे बदमाश आलेत आणि कोर्ट एरियामध्ये वकिलांची चौकशी होत नाही त्यामुळे त्यांना साहजिकच चौकशी न करता आत सोडण्यात आलं. पण आत जाताच गोळीबाराचे आवाज येऊ लागले. आणि यात पोलिसांनी बचावाखातर गोळीबार केला आणि एका जणाला गारद केलं.

पण विरोधी टोळीने आपला डाव साधला आणि थेट इतके दिवस दहशत माजवणारा जितेंद्र गोगी त्यांना आयताच तावडीत सापडला आणि त्याच्यावर गोळ्या झाडून त्याला कायमचा निकामी केला. त्याला वाचवायला आलेल्या इतर चार जणांवरसुद्धा गोळीबार झाला आणि त्यांनाही त्यात यमसदनी धाडण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ दिल्ली शूटआऊट म्हणून व्हायरल होतोय.

दिल्लीतल्या सगळ्यात मोठ्या डॉनची दहशत कायमची मोडीत निघाली आहे त्यामुळे दिल्लीवाल्यांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.