लहानपणापासून पैसे साठवण्याची सवय हेच डेल कॉम्प्युटरच्या निर्मितीचं रहस्य होतं

कॉम्प्युटरचा आणि आपला संबंध हा आला फक्त एमएससीआयटी पुरता नंतर जास्तीत जास्त गेम झोन मध्ये. नंतर आत्ता कॉम्प्युटरमध्ये अनेक अपडेटेड व्हर्जन आलेत. ऍप्पल, एचपी, लेनोवो अशा बऱ्याच कंपन्यांचे लॅपटॉप आपण पाहिले असेल.

एक काळ होता Dell या कंपनीचे लॅपटॉप प्रत्येक जॉब सेकटरमध्ये दिसत होते. कारण ही डेल कंपनी जगातली सगळ्यात मोठी कॉम्प्युटर कंपनी होती. पण ती सुरू करणाऱ्या मायकल डेलचा हा यशस्वी प्रवास किती हुशारीचा होता ते आपण जाणून घेऊया.

पोराला नादी लावण्यासाठी आईवडिलांनी कॉम्प्युटर घेऊन दिला आणि त्याने जगातली सगळ्यात मोठी कॉम्प्युटर कंपनी उभारली. डेल टेक्नॉलॉजीचे संस्थापक मायकेल डेल यांचं लहानपणी पैसे गल्ल्यात टाकून साठवण्याचं वेड त्यांना जगातली सगळ्यात मोठी कॉम्प्युटर कंपनी बनवण्यापर्यंत घेऊन गेलं.

२३ फेब्रुवारी १९६५ रोजी अमेरिकेत मायकल डेलचा जन्म झाला.

वडील डॉक्टर आणि आई स्टॉक ब्रोकर होती. पैशांचा व्यवस्थित वापर कसा करावा याचं गणित डेलला त्याच्या आईकडून कळलं होतं. शाळेपासून बिझनेस मॅनेजमेंट कसं असावं ,पैसे कसे वाचवावे याचे धडे त्याला आईकडून मिळाले होते. १२ वर्षाचा मुलगा २००० डॉलर साठवणे म्हणजे १९७८ च्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती.

वयाच्या दहाव्या वर्षापासून मायकल डेल आईवडिलांकडून मिळालेले खाऊचे पैसे साठवून ठेवत असे. हे वेड इतकं होतं की वयाच्या १२ व्या वर्षी मायकल डेलकडे २ हजार डॉलर झालेले होते. हे फॅड इतकं होतं की डेलची इन्व्हेस्टमेंट ही तेव्हाच्या शाळेतल्या शिक्षकांच्या पगाराईतकी झाली होती.

अगदी कमी वयातच डेल स्टॉक मध्ये पैसे गुंतवू लागला आणि यातून त्याला जास्त फायदा होऊ लागला.

वयाच्या पंधराव्या वर्षी मुलाला नादी लावण्यासाठी मायकल डेलचा आईवडिलांनी त्याला एक कॉम्प्युटर घेऊन दिला. पण मायकल हा विचार करू लागला की हा कॉम्प्युटर कसा बनवला गेला. मग कॉम्प्युटरवरच मायकल जास्त काम करू लागला. पण कॉम्प्युटर काम कसं करत यावर तो जास्त विचार करू लागला.

मग त्याने कॉम्प्युटरचे सगळे पार्ट सुटे केले. अजून एक कंपनीचा कॉम्प्युटर आणला आणि त्याचेही सगळे पार्ट सुटे केले. लवकरच मायकलला अंदाज आला की कॉम्प्युटर कोणकोणत्या पार्ट पासून बनतो. घरच्यांची इच्छा होती की पोरगं डॉक्टर व्हावं पण मायकल तिसऱ्याच गोष्टीत घुसलेला होता. कॉलेज काळात भरपूर माहिती त्याने कॉम्प्युटर बद्दल जमा केली आणि त्याचे पार्ट सुटे करून लोकांना विकायला लागला.

मायकल डेलच्या या टेक्नॉलॉजीमुळे लोकांना पार्ट खराब झाल्यावर थेट नवीन कॉम्प्युटर खरेदी करण्याची गरज पडत नव्हती, मायकलमुळे बऱ्याच लोकांच्या अडचणी दूर झाल्या. असेंम्बल केलेला कॉम्प्युटर हा इतर कॉम्प्युटर पेक्षा स्वस्त असायचा यातूनच मायकल डेलचा बिझनेस वाढत गेला. मग १९८४ साली pc लिमिटेड नावाची एक कंपनी मायकलने सुरू केली. पण काही महिन्यातच नाव बदलून डेल कॉम्प्युटर कार्पोरेशन करण्यात आलं.

मायकल डेलची व्यवसाय वाढण्याची खासियत म्हणजे तो लोकांना चांगली सर्व्हिस देत असे. वयाच्या 27 व्या वर्षी मायकल डेल जगातला सगळ्यात तरुण ceo बनला होता. आज घडीला जगातली सगळ्यात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून डेल ओळखली जाते. पैसे साठवण्याचा नाद इथपर्यंत घेऊन आलाय भिडू….

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.