नोटबंदीच्या ४थ्या जयंतीनिमित्त १०,००० ची नोट बंद करणाऱ्या नोटबंदीचे स्मरण

२०१६ ला मोदी सायबांनी ५०० आणि हजारांच्या नोटा काढून टाकल्या होत्या. त्याला आज ४ वर्षे पूर्ण झालीत. या नोटबंदीला अभूतपूर्व म्हणून संबोधण्यात आलं होतं.

८ नोव्हेंबरचा तो झटका मोठा होता हे खरं पण अभूतपूर्व नक्कीच नव्हता. कारण याआधीच्याही अनेक लोकांनी आपापल्या शासनकाळात नोटबंदी केली होती. पण त्या एवढ्या फेमस झाल्या नाहीत इतकंच! नोटबंदीच्या ४थ्या जयंतीनिमित्त त्यातल्या एका अशाच लोकांच्या विस्मृतीत गेलेल्या नोटबंदीचा हा किस्सा! थोद्याथीडक्या नाही तर १०,००० ची नोट बंद करणाऱ्या या नोटबंदीचा एक वेगळा इतिहास आहे.

त्यांच्या भाजपा पक्षाचे बीज असणाऱ्या जनता पक्षानेही यापूर्वीची नोटबंदी केली होती. ४१ वर्षांपूर्वी मोरारजी देसाई यांनी मोठ्या रकमेच्या नोटा थेट चलनातून बाद केल्या होत्या.

१६ जानेवारी १९७८ साली जनता पक्षाच्या सरकारने १००० रुपये, ५००० रुपये, आणि तब्बल दहा हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकली होती. आणि त्यालाही त्यांनी काळा पैसा हेच कारण दिलं होतं.

१७ जानेवारीला त्यांनी १००० रुपये, ५००० रुपये, आणि दहा हजार रुपयांची नोट चलनातून वगळली जाईल. त्यामुळे त्याच दिवशी या नोटा बँकेत जमा कराव्यात असा आदेश दिला होता. त्यासोबतच पुढच्या दिवशी सगळ्या बँका, पोस्ट आणि पैशाची देवघेव करणारी इतर सरकारी कार्यालये त्यांनी बंद ठेवली होती.

याही बंदीचे उद्दिष्ट होते ते मोदी सरकारच्या नोटबंदीचेच! काळ्या पैशाला अटकाव घालणे आणि लोकांकडे असणारा काळा पैसा बाहेर काढणे!

यासाठी मोरारजी सरकारने १९७८ साली हाय डेनॉमिनेशन बँक नोट्स असा कायदाच आणला होता. या कायद्याचे जनक होते त्यांचे वित्तमंत्री एच. एम. पटेल. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे या काळात अर्थसचिव कोण असतील? ते होते नोटबंदीला कडाडून विरोध करणारे काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी!

१९३८ साली ब्रिटिशांनी १०,००० रुयांची नोट सुरु केली होती. भारताच्या इतिहासात सगळ्यात मोठ्या रकमेची हि नोट होती. १९५४ मध्य भारत सरकारच्या नव्या मुद्रेनीशी ही नोट चलनात आली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आय. जी. पटेल यांचा त्याला कडाडून विरोध होता. पण त्यांचा विरोध सरकारने जुमानला नाही आणि नोटबंदीची घोषणा केली.

योगायोग बघा, २०१६ च्या नोटबंदीच्या वेळीही पटेलांचे उर्जित हेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. आणो मोरारजी देसाई व मोदीजी दोघेही गुजरातचेच… त्यातही दोन्ही वेळी काँग्रेसला लोकांनी निवडणुकीत पाडलं होतं!

या मोठ्या नोटा जवळ असणाऱ्या लोकांना बँकेत येऊन आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा हिशोब द्यायचा होता. चुकीची माहिती देणाऱ्या आणि काही काळंबेरं आढळून आल्यास त्यांची सविस्तर चौकशी केली जाणार होती. तसेच कला पैसे आढळल्यास ३ वर्षांपर्यंतची शिक्षा होणार होती.

या घटनेमुळं देशातील सोन्याची आणि महागड्या वस्तूंची किंमत झपाट्याने कमी झाली. त्यांच्या मागणीमध्येही अचानक मंदी आली. पण त्याकाळी त्याचा मोठा परिणाम जनमानसावर झाला नाही.  मुळातच या नोटा फार कमी लोकांकडे होत्या. भारताची अर्थव्यवस्थाही फारशी सशक्त नव्हती. त्यामुळे याचा परिणाम फार मर्यादित स्वरूपाचा होता.

देशातील ९९ टक्के जनतेला अशा नोटा आहेत हेच माहित नव्हते.

त्यांनी १० हजाराच्या नोटाच कधी बघितल्या नव्हत्या.

पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या फक्त २०% भाग म्हणजे या नोटा होत्या. त्यामुळे याचा देशभर परिणाम झाला नाही कि लोकांच्या रंग लागल्या नाहीत. दिल्लीतील रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आणि देशातील इतर ठिकाणी असणाऱ्या काही निवडक शाखांवरच या नोटा बदलण्याची सोय करण्यात आली होती. त्या नोटा त्वरित हटवला गेल्या होत्या आणि त्याजागी दुसऱ्या नोटा आल्या.

जनता पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीकडे पूर्ण बहुमत होते. त्यामुळे या प्रक्रियेत कोणतीही अडचण आली नाही. काँग्रेस विरोधी बाकावर बसलेली असल्याने त्यांनी याला काहीसा विरोध केला. पण हि प्रक्रिया निर्धोक पार पडली होती.

अजून एटीएम मशिन्सचा जोधा नव्हता. त्यामुळं त्याशिवाय चलनाचे दळणवळण करून ते देशातल्या सामान्य नागरिकापर्यंत पोचवणे जिकिरीचे होते.

बँकांच्या कार्यक्षेत्राबाहेर असणाऱ्या भारतीयांची संख्या मोट्ठी होती, अनेक लोकांची बँक खातीच नव्हती. फक्त १५ ते २० % नोटा चलनातून बाहेर गेल्याने याचा कुणालाही फटका बसला नाही. त्यामुळे नोटांचा तुटवडा जाणवण्याचा प्रश्नच नव्हता.

पण याही नोटबंदीचा मूळ उद्देश साध्य झाला नाही. कला पैसे बाहेर काढायचे काम काही पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे काळ्या पैशाचा मोठा साठा सापडेल अशी अपेक्षा फोल ठरली.

ब्रिटिशांच्या शासनकाळातही अशीच एक नोटबंदी १९४६ साली झाली होती. त्याचाही उद्देश हाच होता. तेव्हाही इंग्रजांनी देशातल्या १००० आणि १०,००० रुपयांच्या नोटा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण स्वातंत्र्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने या नोटा पुन्हा चलनात आणल्या होत्या.

नोवेंम्बर २००० मध्ये १००० रुपयांची न पुन्हा चलनात आणण्यात आली. पण १०,००० च्या नोटेला पुन्हा देशात येण्याचं भाग्य मिळालं नाही.

हे हि वाच भिडू: 

Leave A Reply

Your email address will not be published.