देव आनंदचं डेडिकेशन बघा. सिनेमाच्या सेटवर लंच ब्रेकमध्ये लग्न उरकून टाकलं होतं….

बॉलिवुड म्हणल्यावर जितकं ग्लॅमर तितकेच राडे आणि लफडेसुद्धा जास्त. हिरो हिरॉईनचे प्रेम प्रकरण म्हणजे नुसत्या चर्चांचा विषय. अगोदरच्या काळात परंपरा प्रतिष्ठा और अनुशासन या पद्धतीने सिनेमाच्या सेटवर वावरलं जाई पण भावना सगळ्यांना असतात राव त्यातूनच मग प्रेमाची चिंगारी पेटायची आणि हे लपूनछपून चालणारे प्रेम प्रकरण उजेडात यायचे. आता आजचा किस्सा म्हणजे हाईट आहे जो डायरेक्ट सेटवरच लग्न लावून एक आगळावेगळा रेकॉर्ड सेट केला होता. तर जाणून घेऊया काय किस्सा होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते देव आनंद यांची आठवण आजही लोकांच्या मनात पूर्वीप्रमाणेच ताजी आहे. देव हा हिंदी चित्रपटांचा दिग्गज अभिनेता आहे, ज्याचा केवळ अभिनयच नाही तर डायलॉग डिलिव्हरी, लूक आणि शैली नंतर अनेक लोकांसाठी फॅशन ट्रेंड बनली. 3 डिसेंबर रोजी देव आनंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लग्नाचा एक मजेदार किस्सा पाहूया.

देव आनंदची कल्पना कार्तिक (मोना सिंघा) यांच्याशी चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. इथून त्यांच्यात जवळीक निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रेम फुलले आणि नंतर दोघांनी लग्न केले. पण त्यांच्या लग्नाचा हा किस्सा मजेशीर तर आहेचं शिवाय हे वेडं धाडसच म्हणावं लागेल. टॅक्सी ड्रायव्हर चित्रपटाच्या सेटवर दोघांनी गुपचूप लग्न केले.

देव आनंद स्वतः एका मुलाखतीत सांगतात की शूटिंगच्या वेळी लंच ब्रेक झाला होता, पहिल्या प्रेमाचं दुःख देव आनंद पचवू पाहत होते त्यात त्यांना कल्पना कार्तिक भेटली आणि त्यांच्यात प्रेम अधिकच वाढू लागलं. टॅक्सी ड्रायव्हर सिनेमाच्या शुटिंगवेळी सगळी तयारी देव आनंद यांनी केली होती. कोर्ट मॅरेजचा सगळा बंदोबस्त झालेला होता. जसा सेटवर लंच ब्रेक झाला लागलीच देव आनंद यांनी कल्पना कार्तिक सोबत सेटवरच लग्न उरकून टाकलं होतं.

हा तो काळ होता जेव्हा देव आनंद यांना बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणलं जायचं. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या लग्नाची ही कथा जितकी रंजक आहे तितकीच देव साहेबांची व्यक्तिरेखाही रंजक आहे. देव आनंद यांनी 1946 मध्ये ‘हम एक हैं’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिल्या चित्रपटात देवची जादू चालली नाही, पण त्यानंतर त्याच्या ‘जिद्दी’ने त्याला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटातील देव आनंदच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकली.

देव आनंद यांची फिल्मी कारकीर्द सोनेरी पानापेक्षा कमी नाही. त्यांनी जवळपास 112 चित्रपट केलं आहे. बाजी, टॅक्सी ड्रायव्हर, हाऊस नंबर 44, पॉकेट मार, फुंटूश, सीआयडी, नौ दो इलेवन, गाइड, काला पानी, अस्ली दुक्के, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी, जॉनी मेरा नाम, तेरे मेरे सपने आदींचा समावेश त्यांच्या यादीत आहे.

देव आनंद यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनातही नशीब आजमावले आणि ते यशस्वीही झाले. हरे रामा हरे कृष्ण हा देव साहब दिग्दर्शित असाच एक यशस्वी चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांनी झीनत अमानला ब्रेक दिला होता. यानंतर झीनतलाही लोकांमध्ये प्रसिद्धी मिळाली.

देव आनंदचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले पण कल्पना कार्तिक हे त्याचे पहिले प्रेम नव्हते. कल्पनापूर्वी देव आनंद हे गायक आणि अभिनेत्री सुरैयाच्या प्रेमात होते. त्याचं पहिलं प्रेम अपूर्ण राहिलं. दोघांनीही एकत्र अनेक हिट चित्रपट दिले.

देव आनंद यांनी 3 डिसेंबर 2011 रोजी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ते 88 वर्षांचे होते. मृत्यूसमयी त्यांचा मुलगा सुनील त्यांच्यासोबत होता. आयुष्याच्या शेवटच्या दिवसातही देव आनंद यांनी काम करणे सोडले नाही. देव आनंद दिग्दर्शित चार्जशीट हा चित्रपट 30 सप्टेंबर 2011 रोजी प्रदर्शित झाला होता. आजही देव आनंद यांचा दर्दी फॅनबेस टिकून आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

English Summary: Dev Anand’s marriage’s a funny story. dev Anand and Kalpana Kartik got married on a film set.

Leave A Reply

Your email address will not be published.