देवानंदमुळे बॉलिवूडच्या अभिनेत्यांना राजकारणाचा रस्ता खुला झाला…

कंगना ज्या पाठीमागे भाजप आहे. असेल नसेल आपल्याला त्यात पडायचं नाही. पण कंगनामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं का तर हो. बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण तापलं गेलय हे पण खरं.

सध्याच्या घडामोडींमुळं एक प्रश्न पडतो. तो म्हणजे, हे सिनेमा आणि बॉलिवूड एकत्र कधी आलं.

म्हणजे सिनेमा वेगळा आणि राजकारण वेगळं अस काही पहिला चित्र होतं का? की पहिल्यापासूनच सिनेमाच्या पाचवीला राजकारण आणि राजकारणाच्या पाचवीला सिनेमा पुजलेला आहे.

हेमा मालिनी, जया बच्चन, गोविंदा, रेखा, राजेख खन्ना, स्मृती इराणी, बच्चनसाब अशी पटपट नावं आठवतात पण हे सगळं कशामुळे शक्य झाल हे माहित नसतं. म्हणजे फिल्मस्टार लोकांनी राजकारणाची वाट कधी धरली हे कळणं पण तितकचं महत्वाच आहे.

तर याची सुरवात भारताच्या एकदम सुरवातीपासून आहे.

सुरवातीच्या काळात पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद यांच्यासोबत संबध चांगले होते. पण त्या काळात या सेलिब्रिटी लोकांचा राबता फक्त सहज भेट इतकाच मर्यादित होता. ही लोकं कधी कोणत्या पक्षाकडून उभा राहिल्याची नोंद नाही की ही लोकं कधी कोणत्या पक्षाच्या प्रचाराला गेल्याची नोंद नाही.

मग याची सुरवात कधी झाली….

हिंदी सिनेमा आणि राजकारण यांच्या एकत्रीकरणाची सुरवात ऐंशीच्या दशकात झाल्याचं सांगण्यात येतं. या घटनेला देवानंद आणि आणिबाणी या दोन्ही गोष्टी जबाबदार होत्या.

झालेलं अस की इंदिरा गांधी यांनी देशभरात आणिबाणी लागू केलेली. या आणिबाणी विरोधात समाजातील वेगवेगळ्या घटकांनी आवाज उठवण्यास सुरवात केली. कृती न करता विरोध या तत्वावरच हे काम चालू होतं

पण या सर्व घडामोडीत सर्वात पुढचं नाव होतं ते देव आनंद यांच.

आणिबाणीच्या काळात देवआनंद यांच्यासोबत संजीव कुमारसहीत काही मोठ्या लोकांनी आणिबाणीला विरोध करण्यास सुरवात केली. फक्त बोलून विरोध न करता आण एक पक्ष काढूया असा विचार करण्यात आला आणि बॉलिवूडच्या कलाकरांचा राजकिय पक्ष अस्तित्वात देखील आला.

या पक्षाचे प्रमुख होते देवानंद तर पक्षाचं नाव होतं, नॅशनल पार्टी ऑफ इंडिया.

१९७७ साली या पार्टीची स्थापना करण्यात आली. एनपीआई अर्थात नॅशनल पार्टी ऑफ इंडियाची पहिली सभा मुंबईच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आली.

IMG 20200926 115808

या पहिल्याच सभेला झालेल्या गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले होते. आत्ता त्यामध्ये बघ्यांची गर्दी किती आणि मतदारांची किती हा संशोधनाचा विषय होता. ते काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र निश्चित होती, ही पॉलिटिकल पार्टी मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा करणार आणि मत खाणार याची भिती सर्वच प्रमुख पक्षांना होती.

पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे हा पहिला किस्सा होता जेव्हा बॉलिवूडसाठी राजकारणाचे रस्ते खुले झाले होते.

त्यानंतर आणिबाणी उठवण्यात आली. देशभरात जनता पक्षाची हवा होऊ लागली. मोठ्या प्रमाणात लोक जनता पक्षाच्या पाठीमागे उभा राहिले. लोकसभा इलेक्शनमध्ये आत्ता उमेदवार घोषीत करुन पार्टी उतरणार हे निश्चित होणार होतं तेव्हाच देवानंद यांच्यामार्फत पक्ष विसर्जित करण्यात आला.

पक्ष विसर्जित झाला. एनपीआई पक्षासोबत असणाऱ्या सेलिब्रिटींनी राजकारणात पाय ठेवला नाही पण बॉलिवूडसाठी राजकारण ही देखील संधी असू शकते ही गोष्ट निवडक अभिनेत्यांनी हेरली.

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे राजकारण्यांना देखील कळलं की वेळ आली तर बॉलिवूडचे हे स्टार लोकांची चांगली गर्दी जमा करू शकतात.

त्यानंतर कॉंग्रेसने नर्गिस दत्त यांना राज्यसभेवर पाठवलं. आणि सुनिल दत्त यांना लोकसभेला कॉंग्रेसच्या तिकीटावर उभा केलं. त्यानंतर हा न थांबणारा सिलसिला सुरू झाला तो कायमचा.

या घटनेनंतरचं बॉलिवूडसाठी राजकारणाचे रस्ते खुले झाल्याचं सांगण्यात येत आणि त्याचं सर्वस्वी श्रेय देवानंद यांना जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.