या गावातल्या तरुणांनी देशभर “बझार” उभा करून दाखवलेत.

व्यवसाय म्हटलकी आपल्यासमोर फक्त मारवाडीच येतात. आजपर्यंत व्यवसायात मारवाडीच यशस्वी झाले आहेत असाच समज आपला समज आहे. पण सांगली जिल्ह्यातील देवर्डे या छोट्या गावातील लोकांचे महाराष्ट्रात ८० हून अधिक बझार आहेत. एकीकडे देशात आर्थिक मंदी आली आहे. म्हणून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

पण देवर्डे या गावातील युवक नोकऱ्या करत नाहीत तर बझार मालकच होतात. 

सांगली जिल्ह्यातील देवर्डे तालुका वाळवा या जेमतेम १३०० च्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावातील तरुणांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत ५० हून अधिक बझार उभे केले आहेत. त्याहून शंभर एक तरुणांचे करिअर झाले. त्याशिवाय त्या-त्या शहरात, गावात प्रत्येकी किमान सातशेहून अधिक स्थानिकांना रोजगार मिळाला. बझारवाल्यांचे देवर्डे अशी वेगळी ओळख या गावाने निर्माण केली आहे.

देवर्डे हे गाव सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडे येते, वारणा नदीच्या पाण्याने सुजलाम्‌ सुफलाम्‌ झालेला परिसर. शिराळा, इस्लामपूर ही जवळची मोठी शहर, चिकुर्डे व ऐतवडे खुर्द, कुरळप ही दोन मोठी गावे लागूनच आहेत.

तर तुम्ही म्हणाल एवढ छोट गाव तर मग बझार ही संकल्पना आली कुठून.

देवर्डे या गावातील दिनकर नायकवडी येथील तरुणांच्या बझारनिर्मितीमागील ऊर्जाकेंद्र आहे. दिनकर नायकवडी हे वारणा नगर मधील वारणा बझारमध्ये सेल्समन या पदावर नोकरी करत होते. वारणा बझारमध्ये काम करताना त्यांनी सगळे बारकावे शिकून घेतले. पुढे त्यांनी  फलटण, पेण, अलिबाग येथे व्यवस्थापक म्हणून काम केले.

शिराळ्याचे आमदार मानसिंराव नाईक यांना शिराळ्यात बझार काढायचा होता. यासाठी त्यांनी दिनकर नायकवडी यांच्याशी बोलणी केली. शिराळा येथे त्यांनी आपला बझार या नावाने बझार सुरु केला. दिनकर नायकडी यांनी हा बझार नावारुपास आणला.

सुरुवातीला या गावातील तरुणांनी यीकडे दुर्लक्ष केले. पण पुढे यात फायदा आहे हे समजल्यावर तरुण याकडे आकर्षित झाले. काहींनी भागीदारीमध्ये बझार सुरू केले.

त्यामुळे देवर्डेतील तरुणांचे सांगली जिल्ह्यात नऊ, कोल्हापूर जिल्ह्यात सात, नाशिक पाच, सातारा  सहा, नगर आठ, रायगड पाच आदी जिल्ह्यांसह कोकणात सहा, कर्नाटकात आठ बझार जोमात सुरू झाले. दीपक शिंदे, संदीप नायकवडी, जयवंत शिंदे, अनिल पाटील शिवाजी पाटील आदींसह ८० हून अधिक तरुण याचे नेतृत्व करीत आहेत.

व्यवसायात काम करणाऱ्या तरुणांना दिनकर नायकवडी यांची मदत मिळाली आहे. दिनकर नायकडी यांनी येथी तरुनांना दिशा दिली आहे.

अभियंत्यांच वार्षिक पॅकेज जेवढ असत तेवढे पैसे ही युवक दिवाळीमध्येच मिळवतात. आज संगमनेर, नाशिक, वसई, या ठिकाणी बझार आहेत. ही तरुण मंडळी तिकडेच स्थायीक झाले आहेत.

तरुणांना करतात मदत

या गावातील ससेच भागातील तरुण बझार चालू करण्यासाठी तयार असेल तर त्यालाही ही मंडळी मदत करतात. मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतात अस म्हणतात पण या युवकांनी ही म्हण खोटी करुन दाखवली आहे. मराठी तरुणांचा व्यवसाय सुरु व्हावा म्हणून ही धडपडतात.

व्यापार करणे म्हणजे ठराविक समाजाची मक्तेदारी असे मानले जाते; पण देवर्डेतील तरुणांनी ती रद्दबादल ठरविली. व्यापाऱ्याचा कोणताही गंध नसताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर बझारच्या व्यवसायात पाय घट्ट रोवले आहेत. गावातील तरुणांबरोबर बाजूच्या गावातील त्यांचे नातेवाइकही या व्यवसायात उतरले आहेत.

त्यांचेही वीसच्या आसपास बझार तयार झाले आहेत. १०० हून अधिक तरुण या व्यवसायात िस्थर झाले आहेत.

त्यांचा आदर्श घेऊन शेजारच्या गावातील तरुणांनाही या व्यवसायात उडी घेतली आहे. त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती, राहणीमान यात सुधारणा झाली. व्यवसायानिमित्ताने तरुण बाहेर असतात.

आपल्या बरोबर गावची प्रगती व्हावी, तरुणांना काम मिळावे, अशी तळमळ दिनकर नायकवडी यांना कायम वाटते. त्यातून त्यांनी सुरवातीला चार तरुणांना एकत्र करून बझारनिर्मितीची संकल्पना सांगितली. तरुणांनी स्वभांडवल तयार करून व्यवसायास सुरवात केली. यांची प्रेरणा घेवून आज ८० हून अधिक बझार आहेत, दिनकर नायकडी आज शिराळा येथील प्रचिती दूध संघात एमडी आहेत.

  • भिडू संत्या

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.