भर जवानीत अडवाणी ते डेप्युटी अग्निवीर… फडणवीस होत आहेत सोशल मिडीयावर ट्रोल

गुरुवारी दुपारपर्यंत जनतेपासून पार सूत्रांपर्यंत सगळ्यांना वाटत होतं, की नवं सरकार स्थापन होताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असं गणित लागेल. त्या हिशोबानं कित्येक जणांनी ‘मी पुन्हा येईन’ या एका वाक्याला धरुन लई मिम्स बनवल्या होत्या.

मग पत्रकार परिषद सुरू झाली आणि गेम झाला, देवेंद्र फडणवीसांनी स्वतः घोषणा केली की, ‘एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि मी या सरकारमध्ये सहभागी होणार नाही.’

सोशल मीडियावर लगेच दंगा सुरू झाला, लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा जेवढा धक्का बसला नाही, तेवढा धक्का देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये नसल्याचा बसला. फडणवीस यांच्या चाहत्यांनी शून्य मिनिटात सोशल मीडियावर फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला.

फडणवीस किंगमेकर आणि चाणक्य असल्याची चर्चा सुरू झाली.

इकडं हा धुरळा उडाला होता आणि तिथं भाजपच्या हायकमांडनं टप्प्यात कार्यक्रम केला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी फडणवीस सरकारमध्ये सामील होत असल्याचं थेट ट्विटरवरुन सांगितलं. जेपी नड्डा यांनी केलं, तेच अमित शहा यांनी. त्यामुळं काही वेळापूर्वी चाणक्य असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मग सुरू झाला मिम्सचा आणि ट्रोलिंगचा पाऊस. त्यातल्याच काही धुरळा मिम्स तुमच्यासाठी…

एक मीम होतं, फडणवीस अडवाणी झाल्याचं

290621078 4847679145338792 6670589793230249812 n

एकनाथ शिंदेंच्या नाराजीची सुरुवात झालेली, आमदार नॉट रिचेबल होण्यापासून. आता चर्चा झाली फडणवीसांच्या नाराजीची…

२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण त्यांना ३६ तासांच्या आत राजीनामा द्यावा लागला. यंदाही त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलंच…

https://www.facebook.com/thenewindia82/photos/a.904855529674919/2166766103483849/

 

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनताना फारसे खुश नव्हते अशी टीकाही झाली आणि ट्रोलिंगही…

https://www.facebook.com/semienglishmedium/photos/a.137463543514406/1110373299556754/

 

आता कार्यकर्ते ट्रोलिंग करायला काय सुट्टी देत नसतात, त्यामुळं एडिटिंगचा खेळही जोरात सुरु झाला..

 

मग विषय आला फडणवीस अग्नीवीर झाल्याचा…

WhatsApp Image 2022 07 01 at 12.01.46 PM

आणखीन एक मीम आम्हाला घावलं ते हे,

WhatsApp Image 2022 07 01 at 12.09.37 PM

फडणवीस यांच्या चाहत्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं कसं संघाचे आणि भाजपचे संस्कार आहेत, हे सांगण्याचं काम केलं आणि मग त्याच्यावरही मिम्स आले…

WhatsApp Image 2022 07 01 at 12.10.34 PM    

 

बाकी तुम्ही फडणवीसांचे चाहते असाल किंवा नसाल, पण या मिम्स हलक्यात घ्या. कसंय रोजच्या सत्तानाट्यातली वळणं बघून लोड येणं स्वाभाविक आहे, त्यावरच हा उतारा.             

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.