रोमच्या व्हॅटिकन सिटीने पहिल्यांदाच एका सामान्य भारतीयाला संत ही उपाधी दिलीय

आजपर्यंत कधीच घडलं नाही असं काहीतरी घडतंय. रोमची व्हेटिकन सिटी एका सामान्य भारतीयाला संत उपाधी द्यायला लागलंय. १५ मे २०२२ ला ही उपाधी त्यांना मिळणार आहे. १८ व्या शतकात तामिळनाडूत जन्मलेल्या एका व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला.

त्या व्यक्तीच नाव देवसहायम पिल्लई.

कोण होते हे देवसहायम पिल्लई ? त्यांना संत ही उपाधी का दिली जातीय ? त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर वाद का उसळलाय ?

देवसहायम पिल्लई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ रोजी कन्याकुमारीच्या नट्टालम जिल्ह्यातील हिंदू नायर कुटुंबात झाला. देवसहायम त्रावणकोरचे महाराजा मरेंद्र वर्मा यांच्या दरबारात काम करत होते. इथं त्यांना एक डच नौदल कमांडरला भेटला, ज्याने देवसहायम यांना कॅथलिक धर्माविषयी माहिती दिली. ख्रिस्ती धर्माविषयी जाणून घेतल्यावर देवसहायम यांना त्या धर्माविषयी आत्मीयता वाटली.

पुढं जाऊन १७४५ मध्ये त्यांनी धर्मांतर केलं. धर्मांतर झाल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव बदलून लाजरस ठेवल. त्या नावाचा अर्थ देव माझा मदतनीस आहे. देवसहायम यांनी धर्मांतर करताच त्यांना त्रावणकोर राज्याच्या रोषाला सामोरे जाव लागल. तेव्हाच अख्ख त्रावणकोर राज्यच त्यांच्या धर्मांतराच्या विरोधात गेलं.

फेब्रुवारी २०२० मध्ये, जेव्हा देवसहायम यांना संत ही पदवी देण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा व्हॅटिकनने एक प्रेसनोट पब्लिश केली. त्यात म्हटल होत की,

देवसहायमच धर्मांतर त्यांच्या हिंदू राज्यप्रमुखांना आवडल नाही. देवसहायमच्या धर्मांतरामुळे त्यांच्यावर हेरगिरी आणि देशद्रोहाचा खोटा आरोप लावण्यात आला. त्यांची राज्य सरकारमधील नोकरीही त्यांना गमवावी लागली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आल आणि त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला.

धर्मांतरानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. या दरम्यान समाजात जातीभेद पसरला होता. तो जातीभेद मिटवण्यासाठी ते लोकांच्या समानतेबद्दल बोलत असत. त्यांच्या बोलण्याने उच्चवर्णीय लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा राग आणि द्वेष वाढतच गेला. धर्मांतरानंतर चार वर्षांनी १७४९ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. शेवटी १४ जानेवारी १७५२ मध्ये अरालवीमोझीच्या जंगलात देवसहायमची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

तेव्हापासून दक्षिण भारतातील ख्रिश्चन समाजात त्यांच शहीद म्हणून स्मरण केल जात. त्यांच पार्थिव आता कोट्टार येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स कॅथेड्रलमध्ये ठेवण्यात आलंय.

आता या गोष्टीमुळे देवसहायमला संत ही उपाधी दिली जातेय का ?

तर २००४ मध्ये, तामिळनाडू बिशप कौन्सिल आणि कन्याकुमारीच्या कोट्टर यांच्यासह भारताच्या कॅथोलिक बिशप कॉन्फरन्सने व्हेटिकनला बिएटिफिकेशनची शिफारस केली. २०१३ ला देवसहायमच्या ३०० व्या जयंतीनिमित्त बिएटिफिकेशन झाले.

बिएटिफिकेशनच्या वेळी, पोप बेनेडिक्ट XVI यांनी देवसहायमला फेदफुल लेमॅन म्हणून नवी ओळख दिली. व्हॅटिकनने आपल्या प्रेसनोटमध्ये म्हंटल, की जगभरातील ख्रिश्चन समुदायाने भारतातील चर्चच्या आनंदात सहभागी व्हावं.

आता संत म्हणून उपाधी २०२० मध्ये मिळाली आहे तरी दंगा का सुरू झालाय ?

फेब्रुवारी २०२० मध्ये देवसहायम यांना संत ही उपाधी देण्याची घोषणा झाली आहे. फक्त उपाधी कधी मिळणार आहे याची घोषणा आत्ता झाली.

खरं तर देवसहायम यांच्या नावाचा वाद सुरू आहे. २०१७ मध्ये कार्डिनल एंजेलो अमातो या अधिकाऱ्याने व्हेटिकनला एक पत्र लिहिलं होतं. अमातो तेव्हा व्हेटिकनच्या कांग्रेगेशनचे प्रमुख होते. त्यांनी देवसहायम यांच्या पिल्लई या आडनावाला आक्षेप घेतला. ते म्हंटले की पिल्लई हे आडनाव भारतीय समाजातल्या एका जातीच टायटल आहे. त्यामुळे पिल्लई हे आडनाव हटवल पाहिजे. पण व्हेटिकनने त्यांचं काही ऐकलं नाही.

१५ मे २०२२ ला पोप फ्रान्सिस देवसहायम आणि इतर सहा लोकांना संत ही उपाधी देतील. सर्वांनाच व्हेटिकन सिटीच्या पीटर्स बेसिलिका मध्ये कॅननायजेशन मास मध्ये ही उपाधी दिली जाईल.

व्हेटिकन सिटीकडून अशी उपाधी मिळणारे देवसहायम हे पहिले सर्वसामान्य भारतीय आहेत.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. SAMADHAN KHOCHARE says

    ख्रिश्चनीटि भारतातून कवा संपेल.

Leave A Reply

Your email address will not be published.