‘ढालगज भवानी’ या शब्दामागचा खरा इतिहास काय आहे?

आपण ढालगज भवानी अगदी शिवी असल्यासारखं रोजच्या व्यवहारात वापरतो पण आपल्याला हे ढालगज भवानी म्हणजे नक्की काय हे माहित नाही.

ढाल म्हणजे ढाल आणि गज म्हणजे हत्ती अशी या शब्दाची फोड होते खरंतर.

युद्धाच्या मैदानात अगदी पुढे जो ढालीसारखा शत्रूच्या सैन्याला सामना करणारा पहिल्या फळीतला हत्ती हा ढालगज म्हणून ओळखला जायचा.

या हत्तीवर मराठेशाहीची चिन्हे, वस्त्रे सजवलेली असत. आणि या हत्तीवर भगवा जरी पटक्याचा झेंडा घेऊन एक दोन सैनिकांना बसवले जायचे. त्यांचे काम असे कि झेंडा फडकावत ठेवणे आणि पुढे पुढे चाल करत राहणे, ढाल गजावरून झेंडा खाली उतरला कि मागच्या सैनिकांना पराभवाचा संदेश मिळे.

या ढालगजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या हत्तीच्या गंडस्थळावर एक मोठी ढाल बांधलेली असायची. पूर्वीच्या काळी किल्ले राजवाडे यांच्या मुख्य द्वाराला ते कोणी तोडू नये यासाठी मोठे अणकुचीदार सुळे लावलेले असत. हे दार कपाळाला ढाल बांधलेला ढालगज हत्ती धडका देऊन तोडून टाके आणि किल्ल्याचा विजय सुकर करे.

म्हणूनच ढालगज हत्तीला सैन्यात सर्वात जास्त महत्व असे.

जशी युद्धा साठी घोड्यांचे परीक्षण केले जायचे त्याच प्रमाणे ढालगज निवडण्यासाठी हत्तींचेही परीक्षण होत असे. पहिल्या फळीतला ढालगज होणे म्हणजे काही सोप्पे काम नव्हते. हा हत्ती चपळ आणि निडर असायला हवा, हुशार असायला हवा. तोफेच्या तसेच बंदुकांच्या आवाजाला न घाबरता पुढे चालत राहण्यासाठी त्याला विशिष्ट परीक्षेतून जायला लागायचे.

पूर्वी मराठ्यांनी जेवढी युद्धे जिंकली, त्यात जसे घोडे आणि सैनिकांचे पराक्रम आहेत तसेच या ढालगजांचे देखील आहेत.

तर मग विचाराल कि हि भवानी कोण???

भवानी हि पेशव्यांची ढालगज होती. आणि तिने केलेल्या पराक्रमांवरून तिचे नाव आपल्या बोली भाषेत भांडणाची खुमखुमी असलेल्या बायकांसाठी फेमस झाले. इतिहासात नोंद आहे कि भवानी हत्तीणीने पेशव्यांच्या सैन्यात खूप वर्षे ढालगजाचे काम केले आणि तिचा दबदबा खूप होता.

अतिरिक्त माहिती.

अफझल खानाचा ढालगज सुद्धा त्याच्या ताकदी साठी खूप फेमस होता, असे म्हणले जायचे कि अफझल खानच्या ढालगजात दहाहजार सैन्याचे बळ होते.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.