हे मंत्रीमहोदय ॲप वापरून पाऊस पुढं मागं करायचा प्लॅन बनवत आहेत..
आपल्या सगळ्यांना शाळेत नेहमी शिकवतात. वर्षाचे १२ महिने असतात, त्यात ३ ऋतू असतात ते म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. ज्यांनी आपआपसात ४-४ महिने वाटून घेतलेले असतात. मात्र आजकाल तर त्यांच्यापण टाइमटेबल बिघडलंय. कधी हिवाळ्यात कडक ऊन पडतंय तर कधी कडक उन्हाळ्यात धो- धो पासून पडतोय.
बाकीचं एक वेळ ठीके भिडू पण विनाकारण आणि लिमिटच्या बाहेरच्या पडणाऱ्या पावसाचं काय करायचं. ह्या ओल्या दुष्काळामुळं गेल्या २-३ वर्षाचचं पाहिलं तर काय – काय घडलं, हे काय वेगळं सांगायची गरज नाही.
पण एका भिडूनं हा पाऊस कंट्रोल करणार असल्याचं म्हटलंय. आणि हा भिडू काय साधा- सुधा नाही बरं का,तर एका राज्याचा उच्च शिक्षणमंत्री आहे.
तर हे मंत्री महोदय म्हणजे धनसिंग रावत. तर ३० ऑगस्टला रावत यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल तर झालाच. मात्र यांनतर रावत यांची खिल्ली उडवली जातेय.
ज्यात मंत्री धन सिंह रावत यांनी म्हंटलं कि,
आता एक अॅप आलेय, ज्याच्या मदतीने पाऊस कुठंही कमी किंवा वाढवता येऊ शकतो. ते लवकरच या अॅपचं प्रेसेंटेशन केंद्र सरकारला देणार आहेत. जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर हे अॅप अनेक राज्यांसाठी वरदान ठरेल.’
या व्हिडिओत रावत सिंह बोलताना सांगतात कि, “आम्ही आमच्या या अॅप प्रोग्रॅममध्ये आयआयटीची मदत घेणार आहोत. जे आमचे रिसर्च सेंटर म्हणून काम करेल. त्यात आणखी तीन -चार जणांची भर पडलीये.
यानुसार ते अॅपच्या मदतीनं ठरवतील की कोणत्या भागात किती पाऊस पडणार आहे. कमी पडणार आहे कि जास्त . जेणेकरून आम्ही तिथल्या लोकांना अगोदरच अलर्ट करू. आम्ही आमच्या यंत्रणांना देखील अलर्ट करू. ते पीडब्ल्यूडीचे असो, सिंचन विभागाचे असो, जे काही असो.’
ये नासा या इसरो के वैज्ञानिक नहीं उत्तराखंड सरकार के मंत्री जी हैं,
मैं सदैव कहता हूं धन सिंह रावत जी महापुरुष हैं महापुरुष। pic.twitter.com/XCDWdqnvPr— “अजातशत्रु” ☭™ 🚜 (@BAAHUBALII) August 30, 2021
आता धन सिंह रावत यांचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय कि, लोक त्यांची खिल्ली उडवायला लागलेत. सोबतच कमेंट्स देखील करायला लागलेत.
दरम्यान, धन सिंग रावत यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, रावत उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालेत. महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा आमदारकी मिळूनही त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळालीये.
यांच्याकडे उत्तराखंड सरकारचे अनेक महत्त्वाचे विभाग आहेत. यामध्ये वैद्यकीय आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सहकारी, उच्च शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि प्रोटोकॉल या विभागांचा समावेश आहे.
एवढंच नाही तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये धन सिंह रावत यांचा पहिला नंबर होता. आता आमदारकीची पहिलीचं वेळ आणि थेट मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये हे बहुधा पहिल्यांदाच घडलं असावं.
ते काहीही असो जर धन सिंग रावत यांच्या पाऊस कंट्रोल करण्याचं अॅप जर लॉन्च झालं तर देशातल्या बऱ्याचश्या अडचणी दूर होतील एवढं मात्र खरं. पण यात आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे अॅप जर चुकून जनतेच्या हातात पडलं तर.. पुढचं आपलं न बोललेलं बरं
हे ही वाच भिडू :
- भगतसिंह कोश्यारींचे पट्ट शिष्य झाले आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
- अमेरिकेच्या CIA ने बसवलेल्या सेन्सरमुळे उत्तराखंडमध्ये महाप्रलय आलाय ?
- सोलापूरचं काय घेवून बसलाय, हा माणूस बियरवर पाऊस पाडून दाखवतोय !