धारा ऑइलने केलेली जिलेबीची जाहिरात ब्रॅण्डला पुन्हा मार्केटमध्ये घेऊन आली होती….

आज टीव्ही किंवा मोबाईल पाहताना जाहिरात आल्यावर आपलं डोकं भणाणून जातं, म्हणजे आजच्या काळात सोशल मीडियावर वाहणारा जाहिरातींचा पूर, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग यामुळे काही ब्रँड मोठे झालेत  नाही. पण ९० च्या दशकात टीव्ही वैगरे हे सगळं नवीन होतं तेव्हा जाहिराती या आकर्षक आणि लोकांच्या मनात राहून त्या पाठ व्हायच्या. पण आजचा किस्सा आहे एका जाहिरातीचा, त्या जाहिरातीने डुबणारा ब्रँड पुन्हा मार्केटमध्ये आणला होता.

हि गोष्ट आहे १९९० ची जेव्हा धारा ऑईलची डिमांड मार्केटमध्ये वेगाने कमी होत होती आणि कंपनी बंद करायची वेळ आली होती. लॉन्चिंगच्या वेळी धारा ऑईलचा सगळीकडे बोलबाला होता आणि मागणीसुद्धा प्रचंड होती पण हळूहळू हा धारा ऑईलचा ब्रँड मार्केटमधून गायब होऊ लागला होता. अशावेळी हे ऑइल बनवणाऱ्या मुद्रा कंपनीने या ब्रॅण्डला झळाळी कशी मिळेल यावर विचार करायला सुरवात केली. 

अशा वेळी मुद्रा कंपनीचे मालक ऍड एजन्सीच्या संपर्कात आले. एजन्सीचे मालकी जगदीश आचार्य यांनी या ब्रॅण्डच्या ऍडसाठी एक मस्त स्क्रिप्ट लिहिली. पण जगदीश आचार्य यांच्या आईने या जाहिरातीत फास्ट फूड ऐवजी जिलेबी राहूदे म्हणून सांगितलं. यानंतर त्यांनी एक घर सोडून चाललेला मुलगा धारा ऑईलमध्ये आईने तळलेल्या जिलेबीच्या आमिषाने पुन्हा घरी येतो अशी ती स्क्रिप्ट बनवण्यात आली.

एक मुलगा घर सोडून जात असतो, त्या मुलाचं हसणं आणि जिलेबी. हर कॉम्बिनेशन ९० च्या दशकातील लोकांना चांगलंच ठाऊक असेल. अगोदर या ऍडमध्ये एका १२-१३ वर्षाच्या मुलाला कास्ट करण्यात आलं होतं, मात्र त्या मुलाकडून हवे तसे इमोशन मिळत नसल्याने कास्टिंग बदलण्यात आली. 

नंतर या ऍडमध्ये परजान दस्तूरला या छोट्या मुलाला घेण्यात आलं. परजान दस्तूरला त्याची आई प्ले स्टेशनवरून उचलून घेऊन आली आणि थेट शूटिंगच्या ठिकाणी दाखल झाली. त्याच वेळी परजान दस्तूरला जोरदार भूक लागली होती. हि ऍड फक्त ६० सेकंदाची होती मात्र या ऍडने लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षित केलं.

एक जबरदस्त म्युझिक ट्यून, लहान मुलगा, आईच प्रेम आणि संयुक्त परिवार यामुळे हि जाहिरात चांगलीच चालली. या ऍडच्या दुसऱ्या पार्टवेळीसुद्धा परजान दस्तूरला पुन्हा कास्ट करण्यात आलं, या जाहिरातीतसुद्धा जिलेबी, म्युझिक ट्यून होती पण या जाहिरातीत परजान दस्तूर हा एका लहान मुलाचा मोठा भाऊ होता. या जाहिरातीची थीमसुद्धा तीच होती, मोठा भाऊ लहान भावाला घर सोडण्यापासून परावृत्त करतो.

यामागे कारणसुद्धा होतं आईच्या हातून बनलेली जिलेबी.

 

या दोन्ही जाहिराती तेव्हा चांगल्याच गाजल्या होत्या आणि या जाहिरातींमुळे धारा ऑइलपुन्हा मार्केटमध्ये आली होती. आजही अनेक लोकांना हि जाहिरात आणि परजान दस्तूर चांगलाच आठवत असेल. एका साध्या जाहिरातीमुळे कंपनी पुन्हा मार्केटमध्ये आली यातून ९० च्या दशकात असणाऱ्या जाहिरातींचा इम्पॅक्ट कळतो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.