उद्धव ठाकरे खोटं बोलले : एक धारावीचा मच्छर.

धारावीतील लोकांना चावणारा डास आणि मला चावणारा डास एकच आहे, त्यामुळे या लोकांशी माझे रक्ताचे नाते आहे,

असे विधान उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईतल्या एका सभेत केले. या महाभयंकर नातेसंबध सांगणाऱ्या विधानावर राजकारण करणारे लोक बोललेच पण एका डासाला काय वाटतं ते कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच सुनिल गजाकोश यांनी खास डासांना बोलतं केलं. त्याच मनोगत ऐकलं आणि ते शब्दात माडंल.

तो डास जे काही बोलला ते अगदी जसं च्या तसं.

मी धारावीतला मच्छर तिथेच जन्मलो, लहानाचा मोठा झालो, काल मी मच्छी मार्केट मधे केणी काकूंच्या म्हावऱ्यावर घोंघावत असतांना फेसबुकवर उद्धव ठाकरेंच भाषण ऐकलं, ते म्हणाले धारावीतले मच्छर हे कलानगारात येवून मलाही चावतात, म्हणून आमचं आणि धारावीकरांचं रक्ताचं नातं आहे.

हे ऐकून मी घाबरलोच, आई शप्पथ सांगतो की आमच्या धारावीतल्या एकाही मच्छराला कलानगर, मातोश्री आणि उद्धव ठाकरेंमधे इंटरेस्ट नाही.

धारावीत घोगंत असतांना उगाच हायवे क्रॉसकरून कलानगर मधील मातोश्रीला जायचे म्हणजे मध्यल्या खाडीतल्या मच्छर भाई लोकांशी पंगा घेणे होतं त्यामुळे आपण कधी तिकडे आम्ही जात नाही, खूप राडा करतात खाडीतील नेटीव्ह मच्छर ते आम्हाला परप्रांतीय म्हणून ठोकतात. म्हणून आम्ही खाडी पल्याड जातच नाही.

बरं खाडी पार केलं की कधी काळी मधे ड्राईव्ह-इन थेटर होतं तिथे आणि नवनवीन गाड्यांमधे पॉश लोकांचे रक्त पिवून गब्बर झालेली सुखवस्तू मच्छरांची वस्ती होती, ते तर खाडीतल्या मच्छरांना येवूनच द्यायचे नाहीत. तेथे आमची कशी सोय लागणार? आत तिथे कॉर्पोरेट ऑफिस आलेत, जैनांच्या सोसायट्या आल्या आहेत, बाजूला बिकेसी आलं आहे. त्या मच्छरांची आजची पिढी तर खूपच माजली आहे. मुंबईतर त्यांनीच विकत घेलती आहे, त्यांनी मराठी सोडून गुजराती, मारवाडी आणि इंग्रजी भाषा बोलतात, आणि जवळ आंबानी स्कूल आहे तिथे जावून काय काय शिकतात, सेलीब्रटींच्या मुलांना चावतात, ते आमच्यातले ब्लू ब्लड मच्छर आहेत, त्यांचा तोरा आम्हाल सहन होत नाही.

म्हणून आम्ही तिकडेही जात नाही.

त्यापुढे तर पूर्ण बंदोबस्तातले कलानगर आहे. आमचा एक मित्र जीवाची रिस्क घेवून कधीकाळी ठाकरेंना पाहायला गेला होता, पण खिडक्यांना जाळे लावले होते येतांना इतर मच्छरांनी हकलून लावले कलानगरातील मच्छर अगदी शिस्तीतले होते पाहाऱ्यावर असलेल्या पोलीसांना सतत चावून त्यांच्या अंगात शिस्त आली होती, त्यांनी माझ्या मित्राला उडून उडून लाथा मारल्या आणि हकलून लावले.

तेव्हापासून धारावीतले मच्छर कलानगर सारख्या सुरक्षित वस्तीत जात नाहीत हे लक्षात ठेवा बरं.

तुम्हाला सांगतो, आपली धारावी बरीच इथे मुबलक रक्त मिळत, सर्व जाती धर्माचं मिळतं, सर्व भाषेतलं मिळतं, बिफ खाणाऱ्या इस्माईलचं मिळतं, चिकन खाणाऱ्या रघूदादाच मिळतं, डोसा खाणाऱ्या वेंकटच मिळचे, मासे खाणाऱ्या केणीच मिळतं, कुंभारवाड्यात तर राजस्थानी पदार्थ खाणाऱ्यांच मिळतं आणि डुक्कर खाणाऱ्या माकडवाल्या कुंचीकोरवेचं तर रक्त खूपच टेस्टी लागतं.

काय कमी आहे धारावीत? इथे कोणताही भेदभाव नाही घराला जाळ्या नाही आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे आमची पुढची पिढी सुरक्षित आहे, कुठेही संभोग करा कुठेही अंडी घाला, किचन पासून संडासापर्यंत कुठेही फिरायला बंदी नाही.

आम्हाला इतिहास पण हे इथे, माझे पणजोबा म्हणे एके काळी वरदराजनला चावलेत आणि नायकनमधे त्यांच रोल करणाऱ्या कमल हासनला माझ्या आजोबांनी चावलयं मद्रास स्पेशल रक्त होतं म्हणे, त्यांच ते नेहमीच गुण गायचे, बाबींनी धारावी सिनेमा करणाऱ्या ओम परी आणि शबाना आझमी या दोघांना चावलेत, आता परवा मी स्वता कालाच्या शुटींगच्या वेळेस महान रजनीकांत सरांना चावायलो गेलो तर ते लगेच रोटोब होवून माझ्या बोलायला लागले. म्हणाले अरे मी रजनीकांत आहे तुलाच चावेन, चल निघं इथून. मी लगेच थलायवा म्हणून त्यांच्या पाया पडलो, त्यांनी आशिर्वाद दिला. तेव्हा पासून मला तर सगळे मच्छर मान देवू लागलेत.

आणि पर्वा गल्ली बॉयच्या वेळेस तर मज्जामज्जा होती राणवीर सिंग, आलीया भट्ट, झोया आणि अनेक कलाकारांना चावण्याचा फिस्ट केला, आणि ते सगळे खूप प्रेमळ होते आमच्या कित्येक बांधवांना सिनेमात रोल मिळाला.

आता बोला अशी धारावी सोडून आम्ही कशाला जावू कलानगरात. माझं ऐका उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत. आमचं कसलंच रक्ताचं नात नाही मग धारावीकरांचे कसे असणार?

उद्धव ठाकरेचं हे वाक्य ऐकून आमच्या इस्माईला राग आला, मला मारायला धावला एक फटक्या गारद झालो असतो पण मी कसाबसा सटकलो, इस्माईला बोलतांना मी ऐकलंय, अरे ह्या मुच्छरांमुळे आम्ही आणि ठाकरेंचा रक्त एक आहे म्हणे, मत मागतांना यांना हे सुचतं आणि निवडणूक झाली की पाकीस्तान जा म्हणतात ओरडतात, आता ह्या मच्छरांना हकलून लावणार, नको हा रक्ताचा व्यवहार.

आता आमची स्थिती बिकट होणार असे दिसते धारावीतले मच्छर उध्दवजींना चावतात त्यामुळे फवारणी होईल आणि यापुढे आमचे जेनोसाईट नक्की आहे, जाम घाबरलो आहोत आम्ही, वाचवा आम्हाला. धारावीच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत त्यांच ऐकू नका.

एक धारावीकर मच्छर.

लेखकाच्या पुर्वपरवानगीने प्रकाशित.

  •  भिडू सुनिल गजाकोश.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.