कित्येक दशकांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी धर्म संसदेत केलेले भाषण आजही लागू होते.

दिवस २० सप्टेंबर १८९३. स्थळ शिकागो. निमित्त होते जागतिक धर्म संसदेचे….याच विश्व धर्म संसदेत सलग चार दिवस स्वामी विवेकानंद यांनी हजेरी नोंदवली होती आणि चौथ्या दिवशी त्यांनी एक आपले ऐतिहासिक भाषण दिले होते….ज्या भाषणामुळे संपूर्ण जगभरात भारताची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली होती. तेंव्हा विवेकानंद यांचं वय अवघं ३० होतं.

अमेरिकेतल्या शिकागो येथील धर्म संसदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणानंतर जगामध्ये भारताची प्रतिमा मजबूत झाली. या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील जागतिक धर्म संसदेमध्ये भाषण देऊन भारताची ओळख जगात प्रस्थापित केली. त्यांनी आपल्या भाषणाने जगाला भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले होते. त्यांचे भाषण ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण एवढ्या लहान वयात इतकं दमदार भाषण देणारा तिथे दुसरा कोणी नव्हताच. 

धर्म संसदेत स्वामी विवेकानंद काय म्हणाले होते ?

स्वामी विवेकानंदांनी भाषणाला सुरुवात केली, “अमेरिकन बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही ज्या उत्साहाने माझे स्वागत केले ते पाहून माझे मन भरून आले. जगातील सर्वात प्राचीन संत परंपरेच्या वतीने आणि सर्व धर्मांच्या मातेच्या वतीने मी तुमचे आभार मानतो.” सर्व जाती आणि पंथातील लाखो आणि करोडो हिंदूंनो, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

jagran

याच भाषणात ते म्हणाले होते कि, ‘भारत सर्व धर्मांना सत्य म्हणूनच मानतो’

“जगामध्ये सहिष्णुतेची कल्पना पूर्वेकडील देशांतून पसरली आहे. मला अभिमान आहे की मी भारताचा नागरिक आहे. ज्या देशाने, धर्माने जगाला सहिष्णुता दिली आहे आणि सार्वभौम मान्यतेचा धडा शिकवला आहे. आम्ही केवळ वैश्विक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही तर सर्व धर्मांना सत्य मानतो.”

ते पुढे म्हणतात कि,  “मौजूदा सम्मेलन जो कि आज तक की सबसे पवित्र सभाओं में से है, वह अपने आप में गीता में कहे गए इस उपदेश इसका प्रमाण है। “जो भी मुझ तक आता है, चाहे कैसा भी हो, मैं उस तक पहुंचता हूं। लोग अलग-अलग रास्ते चुनते हैं, परेशानियां झेलते हैं, लेकिन आखिर में मुझ तक पहुंचते हैं।”

जेंव्हा ते जातीयवाद आणि धर्मांधता यावर विचार मांडत होते….

सांप्रदायिकता आणि कट्टरता यावर भाष्य करताना ते म्हणाले, “जातीयवाद, कट्टरता आणि त्याच्या भयंकर वंशजांच्या धार्मिक आडमुठेपणाने या सुंदर पृथ्वीला दीर्घकाळ वेठीस धरले आहे. त्यांनी ही पृथ्वी हिंसाचाराने भरून टाकली आहे आणि ही पृथ्वी किती वेळा रक्ताने लाल झाली आहे. किती संस्कृती नष्ट झाल्या आणि किती देश नष्ट झाले हे माहित नाही. जर हे भयंकर राक्षस नसते तर मानवी समाज आताच्या पेक्षा खूप चांगला झाला असता, परंतु त्यांचा काळ संपला आहे. मला आशा आहे की याचा रणशिंग परिषद सर्व धर्मांधता, कट्टरता आणि दुःखाचा नाश करणारी असेल.”

“पूरब कि दुनिया की सबसे बड़ी जरूरत धर्म से जुडी नही है…उनके पास धर्म की कमी नही है…लेकिन भारत के लाखों पीड़ित जनता अपने सूखे हुये गले से जिस चीज के लिये बार बार गुहार लगा रही है, वो है रोटी. वो हम से रोटी माँगते है, लेकिन हम उन्हें पत्थर पकड़ा देते है…भूक से मरती जनता को धर्म का उपदेश देना उसका अपमान है…भूखे व्यक्ति को तत्वामीमांसा कि शिक्षा देना उसका अपमान है….”

म्हणजेच, पूर्वेकडच्या लोकांची गरज हि धर्माशी निगडित नाहीये. भारतातील कोट्यवधी पीडित जनता कोरड्या घशाने पुन्हा पुन्हा ज्याची आर्जवे करत आहेत ती म्हणजे ‘रोटी’. ते आपल्याकडे रोटी मागतात, पण आपण त्यांच्या हातात दगड देतो… भुकेल्या लोकांना धर्माचा प्रचार करायला लावणे हा त्यांचा अपमान आहे… भुकेल्या माणसाला तत्त्वज्ञान शिकवणे हा त्यांचा अपमान आहे….असं म्हणत त्यांनी भविष्यातल्या उद्भवलेल्या परिस्थितीवर तेंव्हाच भाष्य करून ठेवलं असं म्हणणं अतिशियोक्ती ठरणार नाही. 

 हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.