अंबानींनी पंतप्रधानांच्या भेटीसाठी मिनिटाला १ लाख या दराने पैसे मोजले होते..

असं म्हणतात की सरकार कोणत्याही पक्षाचं असो देश काही उद्योगपती घराणी चालवतात. सत्ताधाऱ्यांचे आणि उद्योगपती घराण्याचे साटेलोटे असते अशी चर्चा गेली अनेक वर्षे चालत आलेली आणि आजचे विरोधक देखील हीच टीका करत असतात.

या टिकेत एक नाव नेहमी चमकत असतं. ते नाव असत रिलायन्सचे अंबानी.

सध्या काँग्रेसवाले मुकेश अंबानी यांची पंतप्रधान मोदींशी असलेल्या मैत्रीवरून आरोप करत असतात. रिलायन्स भाजपला निवडणुकीसाठी सर्वात मोठी फंडिंग करते असेहि बोललं जातं. मुकेश यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी राफेल डीलमध्ये घोटाळा केला असल्याचं बोललं जात असतं. काँग्रेस हे आरोप आज करत असली तरी एकेकाळी असेच आरोप काँग्रेसच्या सरकारवर देखील लागले होते.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. स्व.धीरूभाई अंबानी तेव्हा रिलायन्सचा जम बसवण्याचा प्रयत्न करत होते. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते आपल्या उद्योगसमूहाचे साम्राज्य उभे करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती.

१९८४ साली एक घटना घडली ज्यामुळे फक्त रिलायन्स नाही तर संपूर्ण भारताला धक्का बसेल असे दुरोगामी परिणाम झाले. ती घटना होती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची.

सुवर्ण मंदिरावर केलेल्या लष्करी कारवाईमुळे पंजाब [येतील होता. याच प्रकरणातून पंतप्रधानांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. संपूर्ण देश हादरून गेला. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. प्रचंड वाताहत झाली. अशावेळी इंदिरा गांधींचे थोरले सुपुत्र राजीव गांधी यांनी काँग्रेसची व देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली.

राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. खरं तर राजीव गांधी याना राजकारणात यायचं नव्हतं. ते एकेकाळी इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते. पण संजय गांधींच्या मृत्यूनंतर आईच्या मदतीसाठी ते राजकारणात आले. पण वेगाने बदलत्या घटनांमुळे ते अवघ्या चाळीशीत पंतप्रधान बनले.

राजीव गांधींची इमेज एक सुसंस्कृत राजकारणी अशी होती. त्यांना टेक्नॉंलॉजीची प्रचंड आवड होती. सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याच्या तरुण मंडळींनी राजकरणात यावे यासाठी ते प्रयत्नशील होते. एकविसाव्या शतकातलय भारताचं स्वप्न त्यांनी दाखवलेलं. जुन्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला बदलून टाकणार असल्याची घोषणा ते नेहमी करायचे.

याच भ्रष्ट साखळीचा भाग भारतातले काही उद्योगसमूह आहेत असं पंतप्रधानांचं म्हणणं होतं. म्हणूनच उद्योगपती घराण्यांपासून त्यांनी अंतर राखायला सुरवात केली होती. 

याच सगळ्यात मोठा फटका रिलायन्सला बसला. काँग्रेसमध्ये राजीव गांधींचे स्पर्धक समजले जाणारे प्रणव मुखर्जी हे धीरूभाई अंबानींचे एकदम जवळचे मित्र समजले जायचे. इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात मुखर्जी यांचे स्थान दोन नंबरचे होते. त्यांनी रिलायन्सला अनेक लायन्सन्स देऊन मोठा फायदा करून दिला असल्याचं बोललं जात होतं.

पण जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी महत्वाकांक्षी प्रणब मुखर्जी यांना साईडलाईन तर केलंच याच बरोबर रिलायन्सला देखील ब्लॅक लिस्ट केलं. पूर्वीच्या सरकारच्या काळात अंबानींना मिळणारे वरदहस्त हटले. त्यांची अनेक कामे लालफितीत अडकून पडू लागली. पाण्याविना तडफडणाऱ्या माशा प्रमाणे धीरूभाई यांची अवस्था झाली होती.

त्यांना काहीही करून पंतप्रधान राजीव गांधी यांची भेट घ्यायची होती.

मात्र त्यांची व राजीव गांधींची भेट होणे अशक्य होते. उद्योगपतींना दूर ठेवा असे पंतप्रधानांचे स्पष्ट निर्देश होते. त्यांच्या भोवती त्यांच्या सहकाऱ्यांची भक्कम भिंत असायची. त्या भिंतीला पार करणे धीरूभाई अंबानी यांना अशक्य होते. अशा वेळी प्रणबदा यांनी त्यांना एका माणसाची भेट घेण्याचा सल्ला दिला.

तो माणूस होता राजीव गांधींचे मित्र कॅप्टन सतीश शर्मा. एकेकाळी त्यांनी राजीव गांधीच्या सोबत इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक म्हणून काम केलं होतं. त्यांच्याच आग्रहाने सतीश शर्मा राजकरणात आले होते. मित्र म्हणून राजीव गांधींवर त्यांचा प्रभाव होता.

धीरूभाई अंबानींनी सतीश शर्मा यांना भेटून पंतप्रधानांची भेट घालून द्यायची विनंती केली. पण ते तयार झाले नाहीत. रिलायन्सवर असलेला राजीव यांचा राग त्यांना ठाऊक होता. पण धीरूभाईंनी अगदी काकुळतीला येऊन त्यांना विनंती केली.

अखेर सतीश शर्मा तयार झाले. राजीव गांधी जेव्हा आपल्या कार्यालयातून घरासाठी निघतात तेव्हा काही मिनिटांसाठी धीरूभाईंची त्यांच्याशी भेट घालून द्यायचं ठरलं. त्या बदल्यात अंबानी सतीश शर्मा यांना या पाच लाख रुपये आणि जितकी मिनिटे हि भेट चालेल तेवढ्या वेळेसाठी प्रत्येक मिनिटाला १ लाख रुपये प्रमाणे पैसे देतील असं ठरलं.

संध्याकाळी ठीक ८.४० वाजता कॅप्टन सतीश शर्मा यांच्या सोबत धीरूभाई अंबानी पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले.

राजीव गांधी बाहेर येण्याची वेळ झाली. बाहेर त्यांच्या सिक्युरिटीने गाडी स्टार्ट देखील केली. सतीश शर्मा यांनी अंबानींना राजीव गांधींच्या समोर उभं केलं. सगळ्यांना वाटलं कि एक दोन मिनटात हि भेट संपेल पण तस झालं नाही. धीरूभाई अंबानी तब्बल ४२ मिनिटे पंतप्रधानाच्या सोबत होते. बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते.

काय घडलं होतं या भेटीत?

सतीश शर्मा एकदा ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये म्हणाले होते,

चूंकि मैं जानता था कि उन दोनों की बातचीत एक-दो मिनट से ज्यादा नहीं चल सकती है, इसलिए मैं अंबानी से थोड़ा ही पीछे खड़ा था। मैं जानता था कि राजीव गांधी की नजर में अंबानी की कोई खास साख नहीं है.

मात्र धीरूभाई अंबानी राजीव गांधींना म्हणाले,

“मैडम ने जो 250 करोड़ रुपये मेरे पास छोड़े हैं, उसका क्या करना है?”

या प्रश्नानंतर पंतप्रधानांना देखील धक्का बसला. असं म्हणतात कि याच एका प्रश्नामुळे अंबानींनी राजीव गांधींना खिशात टाकलं. त्यांना रिलायन्स विषयक धोरणे शिथिल करावी लागली. अंबानींच्या या भेटीमागच्या व त्या प्रश्नमागचं डोकं देखील प्रणब मुखर्जी यांच होतं असं देखील सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.