ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच सुरु होती आणि आपला विकेटकिपर रोज रात्री पार्कमध्ये झोपत होता

भारतीय क्रिकेट टिममधला सगळ्यात बेस्ट विकेटकिपर म्हणाल तर सगळ्यात आधी महेंद्रसिंह धोनीचं नाव समोर येईल. पण धोनीच्या आधीही असे अनेक विकेटकिपर होऊन  गेले, ज्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाचं योगदान दिलं. त्यातलाच एक खेळाडू म्हणजे बुधी कुंदरन.

ज्यानं वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी टीम इंडियात एन्ट्री तर मारलीचं, पण काही वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत नावलौकिकही मिळवलं.

खरं तर बुधीच्या कुटुंबियांना क्रिकेटचा खेळ बकवास वाटायचा, ज्यामुळे अर्थातच घरच्यांचा त्याला विरोध होता. पण जेव्हा बुधीच्या शानदार खेळीमुळे त्याची शाळेच्या संघात निवड झाली. तेव्हा त्याच्या आईने गुपचूप त्याच्या वडिलांचे कपडे बुधीच्या साईजचे करून मॅचसाठी ड्रेस तयार केला. यांनतर जेव्हा बुधीने इंटर स्कुलमॅचमध्ये पहिल्यांदा हा ड्रेस घातला तेव्हा त्यानं २१९ रन ठोकले.

दुसऱ्या दिवशी त्याचा फोटो जेव्हा पेपरात छापून आला. त्याच्या वडिलांना तो फोटो पाहून फार गर्व वाटला. यानंतर बुधीच्या क्रिकेट करियरने जो स्पीड पकडला,  तो परत थांबलात नाही.

बुधीने सगळ्यात आधी मुंबईत क्रिकेट खेळायला सुरुवात केली, मात्र नंतर त्याने मुंबई सोडून रेल्वे टीमच्या ट्रायलसाठी गेला.  त्यावेळी लाला अमरनाथ हे रेल्वे टीमचे मेंटोर होते. सोबतच, लाला भारतीय क्रिकेट संघाचे निवडक देखील होते. त्यांना बुधीचा खेळ  इतका आवडला की, त्यांनी बुधीला रेल्वेऐवजी थेट भारतीय संघात खेळण्याची ऑफर दिली.

पण त्यावेळी बुधीजवळ ना हातमोजे होते ना पॅड. त्यावेळी टीम इंडियाचे विकेटकीपर नरेंद्र ताम्हाणे यांनी आपली किट बॅग बुधीला दिली. मॅच खेळात असताना त्याने घातलेली टोपी ती त्याला भारदा हायस्कूलचे प्राचार्य बेहराम मुर्झबान यांनी दिली. तो ज्या बॅट आणि पॅडने खेळला, तोही त्याच्या क्लब, फोर्ट विजय कडून मिळाला होता.

बुधीचा इंटरनॅशनल क्रिकेट डेब्यू ऑस्ट्रेलियासोबतचा मुंबईतील ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. भारतीय क्रिकेटमधला तो असा काळ होता, जेव्हा स्थानिक खेळाडूंना भारतीय संघासह हॉटेलमध्ये थांबवले जात नव्हते. मॅचच्या आदल्या रात्री तो त्याच्या घरीच होता. त्याचं घर मार्केट गेट परिसरातल्या एका चाळीत होते. पण भारतीय संघासाठी आपली पहिलीच मॅच असल्याने  त्याला झोपच आली नाही. 

तो उठला आणि उशी -चादरी घेऊन मुंबईच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये गेला आणि झोपला. तिथे डासांनी त्यांना रात्रभर त्रास दिला. सकाळ झाली आणि तो टीम इंडियासाठी खेळण्यासाठी मैदानावर पोहोचला. त्याने पहिल्या सामन्यातच जवळपास १५० ओव्हरपर्यंत विकेटकिपिंग केली. पण मॅचच्या पाचही दिवस तो पार्कमध्ये झोपला होता, याची कोणालाचं कल्पना नव्हती.

आपल्या करियरच्या दुसऱ्या डावातच त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली. पण इयान मॅकाफीच्या चेंडूवर अवघ्या तीन धावांवर त्याची विकेट पडली.  यांनतर मद्रासमध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये कॅप्टनने रामचंदने त्याला थेट डाव सुरु करण्यासाठी पाठवले. या मॅचमध्ये त्याने १२ चौकारांसह ७१ धावा केल्या.

कुंदरन पहिला असा खेळाडू बनला ज्याने पहिल्यांदा टेस्ट मॅच खेळला आणि नंतर रणजी मॅच खेळले. कुंदरन हा भारतीय क्रिकेटमधला पहिला असा फलंदाज होता, ज्याने क्रिकेटमध्ये आक्रमक विकेटकिपींगचा ट्रेंड सुरू केला.

१९६३-६४ मध्ये, मद्रासमध्ये इंग्लंडच्या अटॅकसमोर  कुंडरनने १९२ धावांची शानदार खेळी खेळली. जवळजवळ ५० वर्षे हा स्कोर कोणत्याही भारतीय विकेटकिपरचा सर्वात मोठा स्कोर होता. नंतर धोनीने चेन्नईमध्ये २२४ धावा करून तो ब्रेक केला. विशेष म्हणजे याच मॅचमध्ये बुधीने आणखी एक रेकॉर्ड केला होता, तो ३१ बॉण्ड्री मारून, त्याचा हा रेकॉर्ड देखील ३८ वर्षांपर्यंत कोणीही मोडू शकला नाही.

एका सीरिज मध्ये ५०० धावा करणारा क्रिकेट इतिहासातील तो पहिला विकेटकिपर बनला.

दरम्यान, १९६७ मध्ये सुट्टीसाठी गेलेला बुधी भारतीय संघात परत कधी आलाच नाही. कारण अधिकाऱ्यांकडून खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटवरून त्याने स्टेटमेंट केलं होत. हा वाद फार टोकाला गेला होता.

ज्यानंतर तो ग्लासगो येथे शिफ्ट झाला आणि १९७० मध्ये त्याने स्कॉटलंडमधील स्कॉटिश लीग ड्रंपेलियर्सशी करार केला. ८० च्या दशकात तो स्कॉटलंड क्रिकेट संघासाठी बेन्सन आणि हेजेस कपमध्येही खेळला. मात्र २००६ ला लंग्स कॅन्सरमुळे बुधीच मृत्यू झाला. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.