शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या भांडणात भाजपने डाव साधलाय का ?
दोन मांजरीणींची गोष्ट तुम्हाला माहिती असेल. दोघी चांगल्या मैत्रिणी. एकदा त्यांना एक लोण्याचा गोळा मिळाला. पण हे लोणी मी खाणार कि तू खाणार यासाठी त्यांची भांडणं झाली. मग हे भांडण सोडवायचं म्हणून त्या दोघींनी माकडाला मध्ये घेतलं. त्या माकडाकडून लोण्याचे दोन सारखे भाग करून घेऊ असं ठरलं..तराजूमध्ये लोण्याचा गोळा मोजत मोजत त्या माकडाने सगळं लोणी खाऊन टाकलं. अक्ख लोणी संपलं. मग त्या दोन्ही मांजरांना कळलं कि, अरे आपल्या दोघांच्या भांडणाचा त्या माकडाला फायदा झाला…तात्पर्य काय तर दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
आता राज्याच्या राजकारणात हीच बोधकथा चर्चेत आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झालाय. तिसरं कोण तर भाजप..
खरंच दोघांच्या भांडणात भाजपचा लाभ झालाय का ? आणि झाला तरी तो कसा झाला ? याचा अंदाज काढूया, जाणून घेण्यासाठी व्हिडीओच्या लिंकवर क्लिक करा.