संजय गांधीनी खरच इंदिरा गांधींना मुस्काड लगावली होती ? 

संजय गांधी आणि इंदिरा गांधी. मायलेकाची जोडी. इंदिरा गांधी हा स्वतंत्र अभ्यासाचा चर्चेचा विषय तर संजय गांधी देखील स्वतंत्र अभ्यासाचा चर्चेचा विषय. पण जेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची एकत्रित चर्चा होवू लागते तेव्हा त्यांचे निर्णय, त्यांनी केलेली कामे अशा मुद्यांना डावलून चर्चा व्यक्तिगत संबध आणि किस्से कहाण्यांवर जाते. 

बऱ्याच वेळा विषय संपतो ते संजय गांधीना इंदिरा गांधींनीच संपवल, त्या संजय गांधीच्या अपघातानंतर तिथे किल्या शोधण्यासाठी गेल्या होत्या. संजय गांधीनी कसं इंदिरा गांधीना मुस्काडात लावली होती… 

एकामागून येणाऱ्या एक कहाण्या. बर या फक्त कहाण्या आणि Wtsapp च ज्ञान. कि त्यातही काही सत्य आहे. WTSapp वरती पसरल्या जाणाऱ्या या फॉरवर्डचे एक एक मुद्दे आपण जाणून घेवूच तुर्तास पहिला मुद्दा तो म्हणजे. 

खरच संजय गांधींनी इंदिरा गांधींना मुस्काड लावली होती का ? 

आणिबाणीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसात किंवा महिन्यानंतर द वॉशिंग्टन पोस्ट मध्ये हि बातमी आली होती. त्यामध्ये एका डिनर पार्टीमध्ये संजय गांधींनी इंदिरा गांधींना सहा वेळा मुस्काडीत मारल्याची बातमी देण्यात आली होती. हि बातमी केली होती, पुलित्झर पुरस्कार विजेता असणाऱ्या लुईस एम सिमंस यांनी. 

आणिबाणीच्या काळात मोठ्या देशभरातील वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशीप लादल्या कारणामुळे हि बातमी तेव्हा कोणत्याच वर्तमानपत्रात छापून आली नव्हती. मात्र वॉशिंग्टन पोस्ट या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात हि बातमी छापली गेल्याने तो विषय जगभर चर्चेचा झाला. यावर वेगवेगळे लेख मागवण्यात आले त्याचं कारण देखील तसच होतं ते म्हणजे त्या परस्थितीत आई आणि मुलांच्या व्यक्तिगत संबधावर संपुर्ण देशाचं भविष्य अवलंबून होतं. 

हि बातमी केली होती ती, लुईस एम सिंमस यांनी. त्यांनी आपल्या नंतरच्या म्हणजे तब्बल चाळीस वर्षांनंतरच्या मुलाखतीत ती बातमी कशी मिळाली होती. तेव्हा नेमकं काय घडलं होतं याबाबात सांगितलं होतं. 

सिंमस म्हणतात, 

“या बातमीचे माझ्याकडे दोन सोर्स होते. ते दोन्हीही लोकं तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधीचे निकटवर्ती म्हणून समजले जात. त्यांपैकी एकजण माझ्या घरी आले होते. तेव्हा इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यातील नात्यांबाबत सांगत असताना त्यांनी एका खाजगी डिनर पार्टीत संजय गांधींनी इंदिराजींना सहा वेळा मुस्काडीत लावल्याचं सांगितल होतं. हि गोष्ट ऐकताच मी दूसऱ्या दिवशी अन्य एका व्यक्तीकडे या बातमीची खातरमजा केली होती. त्यांनी देखील या बातमीला पुष्टी दिली. पण मी ती बातमी लगेच वापरली नाही. मला योग्य वेळी ती बातमी छापायची होती. मला जेव्हा पाच तासांमध्ये भारत सोडून जाण्यासाठी सांगण्यात आलं तेव्हा मी बॅंकाकच्या एका हॉटेलमध्ये बसून ती बातमी लिहली.” 

सिंमस यांनी ती बातमी छापली आणि त्यामुळेच त्यांना तात्काळ देश सोडून जाण्यासाठी सांगण्यात आल्याचं सांगितल जात पण या गोष्टीत तथ्य नव्हतं. सिमंत यांनी भारतीय सैन्याशी एक बातमी केली होती त्यावरुनच तात्काळ पोलिसांनी त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडलं होतं. भारतातून जाणाऱ्या पहिल्या फ्लाईटने त्यांना जाण्यास सांगण्यात आलं होतं. तेव्हा ते बॅंकाकला गेले व तिथेच हि बातमी लिहली. त्यांनी देश सोडल्या सोडल्या बातमी छापली गेल्याने अनेकांना त्याच बातमीमुळे त्यांना देश सोडावा लागला अस वाटतं पण खुद्द सिंमस या गोष्टीला नकारतात. 

पुढे आणिबाणी उठवण्यात आली. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं व त्या सरकारने पुन्हा सिमंस यांना भारतात बोलवलं. 

आणिबाणीच्या नंतर भारतात आलेल्या सिमंस यांनी इंदिरा गांधीची थेट मुलाखत घेतली. त्यांनी इंदिरा गांधींना आपणाला तात्काळ भारत सोडण्याविषयी का सांगण्यात आलं होतं असा प्रश्न केला तेव्हा इंदिरा गांधींनी माझा त्यामध्ये सहभाग नव्हता इतकच उत्तर दिलं. मात्र सिंमस म्हणतात तेव्हा, त्या बातमीच्या कन्फर्मेशन घेण्याच धाडस मी करु शकलो नाही. 

त्यानंतर मात्र या गोष्टींचा ना कोणता पुरावा आला न बातम्यांचे सोर्स सांगण्यात आले. सिंमस हे जगप्रसिद्ध पत्रकार होते त्यामुळे ते अशी खोटी बातमी पेरतील याबाबत देखील शंका घेण्यासारखं काही नव्हतं. शेवटी याबद्दलचा एक किस्सा तेच आपल्या एका मुलाखतीत सांगतात, 

ते म्हणतात काही वर्षांनंतर मी राजीव गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनर पार्टीमध्ये गेलो होतो. या पार्टीत सोनिया गांधी आणि राजीव गांधी होते. अचानक एका व्यक्तिने राजीव गांधीसोबत ओळख करुन देत असताना त्या व्यक्तिने सांगितले की, याच पत्रकारांनी ती बातमी छापली होती. 

तेव्हा राजीव गांधीनी चक्क हसून मान हलवली होती ! 

हाच शेवटचा किस्सा होता. ते सोर्स ती बातमी पत्रकारांनी कधीच सांगितली नाही. पत्रकारांनी आपले सोर्स सांगायचे देखील नसतात. त्यानंतरच्या घटना बऱ्याचशा सुचक वाटतात इतकच. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.