एकाच झाडापासून बनणाऱ्या गांजा, भांग आणि चरस मध्ये फरक तो काय ?

भिडूंनो उघडा डोळे बघा निट. हिमालयात आलाय तुम्ही..हिमालयात….काययईईईईई विश्वास बसेना. 

गांजा मारून हे वाचलात ना तर नक्कीच हिमालयात जाणार तुम्ही. एकदम सुस्साट. बाय द वे, गांजा मारणे, पिणे नसतं ते, त्याला ओढतात म्हणे, ओढतात. आता काही सुशिक्षित येतील बघा सांगायला की, गांजा काय म्हणताय जॉइन्ट म्हणा जॉइन्ट. सभ्यता नावाचा प्रकार आहे की नाही तुमच्यात.

पण हे बघ भिडू गांजा हा एकमेव पदार्थ असाय ज्याला काहीही म्हणलं तरी तो काय चढायचा रहात नाही. त्याच काम तो इमानइतबारे करतो. तोच काय त्याचे साथीदार पण त्यांची काम इमानेइतबारे करतात.

आता तुम्हाला गांजाचे साथीदार माहित नसतील तर अवघड आहे राव. सांगतो.. हेम्प, चरस, हॅश ऑइल, भांग…आता हे गांजापासून कस बनवायचं त्याची रेसिपी सांगतो.

पण रेसिपी सांगायला सुरुवात करायच्या आधी गांजा बेकायदेशीर आहे म्हणणाऱ्यासाठी खास,

आपल्या आजूबाजूला कुणाच्या सिगरेटमध्ये कुठला माल आहे ते एकदा हाय झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. चुकून चुकिच्या संगतीनं तूम्ही गांजा मारलाच तर तुम्हाला दूरवरुन गांजाचा वास अचूक ओळखता येतो हे १०० टक्के सत्य असलेली गोष्ट आहे. बाकी गांजा मारू नये या विचाराचेच आम्ही आहोत पण हाच विचार घेवून कुंभ मेळातल्या अघोरी सांधूकडे गेलो तर पेटकात दोन चार त्रिशूल पडतील म्हणून आम्ही कोणालाच चांगल वाईट सांगायच्या फंदात पडत नाही.

आम्ही फक्त माहिती देतो. १०० टक्के खात्रीशीर माहिती. 

तर होळी असो वा कुंभमेळा भांग आणि गांज्याच्या नशेत असलेली लोक तिथं तुम्हाला हमखास भेटतील. आणि असं नाही कि हिप्पी कल्चर म्हणून हे लोक याचे नाशे करतात. तर नशे करण्याचा इतिहास लाभलाय आपल्या भारत भूमीला.

तर होळीची रेसिपी म्हणून भांग खूप फेमस आहे.

भारत मध्ये जे Cannabis या Marijuana नावाचं जे झुडूप उगवतं त्याच Scientific नाव आहे  Cannabis Indica. बेसिकली याला सगळीकडे भांगेचे किंवा गांजाच झाड म्हंटल जात.

या झाडाच्या सुकलेल्या कळ्यांना पानांना संस्कृत मध्ये गांजाम्हंटल जात. लोक जेव्हा गांजा मारतोय असं म्हणतात, तेव्हा या सुकलेल्या पानांना तंबाखू बरोबर मिक्स करून त्याची बिडी बनवतात आणि त्याचे कश मारतात. हे मारून माणूस रिलॅक्स होतो. याला वीड, पॉट असं पण म्हंटल जात.

 

आता या झाडाला जी फुल येतात, त्याच्या कळ्या हातावर घेऊन घासत, रगडत बसायचं. हे रगडून रगडून तुमच्या हातावर एक चिकट असा काळा थर जमा होईल. (फोटोत बघा कसा ते )

त्या काळया थराचा एक गोळा बनवायचा. यालाच चरस किंवा मग हशीश असं म्हंटल जातं.  भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि लेबनान अशा देशांमध्ये हशीश किंवा चरस हातावर रगडून रागडूनच बनवलं जात. हे रगडायचा स्पीड जेवढा कमी तेवढ चरस चांगल्या गुणवत्तेच.

Tosh Valley charas

आता येऊया भांगवर. जेव्हा कोणाच्या खाण्यापिण्यात गांजाच्या झाडाच्या वाटलेल्या पानांचा गोळा टाकला जातो त्याला भांग म्हंटल जात. होळीच्या दिवशी जी थंडाई बनवली जाते त्यात भांग मिसळलं जातं. याव्यतिरिक्त उत्तरेकडच्या राज्यांत भांगची भजी हलवा असे पदार्थ पण बनवले जातात. आता याची रेसिपी काय आम्हाला माहित नाही.

बाकी या होत्या चरस आणि भांगेच्या रेसिपीज. यातलं करून बघायला काही हरकत नाही. पण एक गोष्ट मात्र फिक्स होते ते म्हणजे पोलीसांना घावला तर लय रट्टे पडतात. आतपण जायला लागतं. तसही माणसानं येवढं मटण थाळी, चिकण थाळी बनवलं आहे तर मोकळेपणाने ते खावं. असल काहीही मारण्यात अर्थ नसतो (सामाजिक जबाबदारीचं भान जपण्यात आलं आहे)

असो, गांजाच्या रेसिपी बद्दल इतकं अभ्यासू मराठीमध्ये तरी कोणी लिहलं नाही अस आमचं अंर्तमन म्हणत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो गांज्यावर बंदी आहे गांज्यावर लिहण्यावर नाही. सो जस्ट चील.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.