एखाद्याला अचानक हार्ट अटॅक, कार्डिॲक अटॅक आला तर काय करायचं?

साऊथ कोरियाची राजधानी सिओल येथे हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास १५० जणांचा मृत्यू झाला. छोट्या गल्लीत एकाचवेळी जास्त लोक जमल्याने ही घटना घडल्याचे सांगितलं जात आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हरायला होत आहेत. या व्हिडीओत चेंगराचेंगरीनंतर अनेकजण बेशुद्ध पडले असून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या छातीवर जोरात दाब देण्यात येत आहेत. त्याला वैद्यकीय भाषेत CPR म्हटलं जात.  

CPR म्हणजे काय ? हा उपचार कोणीही करू शकतं का? हार्ट अटॅक की कार्डिॲक अरेस्ट या दोन्हीतला फरक काय? हे सगळं जाणून घेऊया…

सगळ्यात पहिले CPR सिस्टीम काय असते?

मेडिकल क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या या टर्मचा फुलफॉर्म आहे ‘कार्डिओ पल्मोनरी रेससिटेशन’ (Cardiopulmonary resuscitation). कार्डिओ शब्दावरूनच कळतं की हा हृदयाशी संबंधित उपचार आहे. मात्र सीपीआर हे काही औषध किंवा इंजेक्शन नाहीये तर ही एक प्रक्रिया आहे.

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा श्वास बंद होतो, हृदय बंद पडतं, माणूस बेशुद्ध होतो तेव्हा त्या व्यक्तीचं हृदय चालू ठेवण्यासाठी आणि श्वसन चालू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कारण जर एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके थांबले असतील तर पुरेशा ऑक्सिजनशिवाय शरीरातील पेशी खूप लवकर संपू लागतात. 

त्याचबरोबर त्याचा परिणाम मेंदूवरही होतो आणि यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता बळावते. अशावेळी सीपीआर केल्यास बेशुद्ध व्यक्तीच्या फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळतो.

जेव्हा व्यक्तीचा श्वास थांबतो तेव्हा पेशंटला झोपवलं जातं आणि त्याचा श्वास परत आणेपर्यंत किंवा हृदयाचे ठोके सामान्य होईपर्यंत छाती दाबली जाते. दर दोन श्वासांनंतर एक पंप अशा प्रकारे छाती दाबली जाते. आवश्यक वाटलं तर काहीवेळा रुग्णाला तोंडाने देखील श्वास दिला जातो. यामुळे शरीरात आधीपासून असलेल्या ऑक्सिजनयुक्त रक्ताचं संक्रमण होऊ लागतं.

काही मिनिट ही प्रक्रिया करायची असते, त्यानंतर जर रिस्पॉन्स आला नाही तर व्यक्ती मृत म्हणून घोषित करता येतो.

CPR ही प्रक्रिया नक्की केव्हा केली जाते? हार्ट अटॅक आणि कार्डीॲक अरेस्ट फरक काय ? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इंडियन मेडिकल असोशिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं…

दोन प्रकार असतात.. एक हार्ट अटॅक आणि दुसरं कार्डिॲक अरेस्ट.

हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडतात. हृदयाला अनेक रक्त्तवाहिन्या असतात आणि त्या जोड रक्तवाहिन्या नसतात. अशात एखादी रक्तवाहिनी ब्लॉक झाली तर त्या भागातला रक्तपुरवठा बंद होतो आणि हृदयाचा तो भाग निर्जीव होतो, याला हार्ट अटॅक म्हणतात. 

हा भाग मोठा असेल तर तो मोठा अटॅक असतो. तीन मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये जर रक्ताच्या गाठी झाल्या, ब्लड प्रेशर वाढलं तर यापद्धतीचा अटॅक येत असतो.

आता कार्डिॲक अटॅक म्हणजे हृदयाचं स्पंदन थांबणं. म्हणजे हृदयाची धडधड थांबणं. याची अनेक कारणं आहेत, हे अटॅक आणि इतर आजारांमध्ये देखील होतं. 

हार्ट अटॅकमध्ये सीपीआर देण्याची गरज नसते. त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन असतं ते किंवा काही औषधं असतात ती ठराविक काळात दिली गेली तर ब्लॉकेजेस कमी होतात. जर जास्त ब्लॉक असतील तर त्याची अँजिओग्राफी किंवा अँन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करावी लागते.

इमर्सजन्सीमध्ये बऱ्याचदा अँन्जिओप्लास्टी करावी लागते किंवा काही तासात जर पेशंट दवाखान्यात पोहोचत असेल तर ती गाठ विरघळवता येते. एकंदरीत हार्ट अटॅक हा रिव्हर्ट करता येतो.

कार्डीॲक अरेस्टमध्ये औषधांची गरज नंतर लागते. आधी रुग्नाचा श्वास सुरु करण्यासाठी CPR प्रोसेस करावी लागते. अगदी जन्मलेल्या लहान व्यक्तीपासून ते वृद्ध व्यक्तीसाठी ही प्रोसेस असते. वयानुसार ती बदलते. गर्भवती महिला, नवजात अर्भक लहान मुलं आणि वयस्कर अशांसाठी CPR प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.

जर एखाद्या व्यक्तीला पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारे बेशुद्ध झाला तर सामान्यांनी काय करायला हवं?

अशावेळी बघायचं की त्या व्यक्तीचे श्वास सुरु आहेत का? हृदयाचे ठोके सुरळीत आहेत का? जर हृदयाचे ठोके चालू असतील आणि श्वास चालू नसेल तर CPR दिल्याने माणूस लवकर रिव्हाइव्ह होऊ शकतो. मात्र हृदयाचे ठोके बंद असतील आणि श्वास देखील बंद असेल तर अगदी इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस उपलब्ध करून द्याव्या लागतात.

पण लक्षात घ्या CPR हा अंतिम उपचार नाहीये, CPR प्रोसेसचा हा नियमच असतो की जेव्हा प्रक्रिया सुरु केली जाते त्याच क्षणी कार्डियाक ऍम्ब्युलन्स बोलवावी लागते. कार्डियाक ऍम्ब्युलन्स येईपर्यंत रुग्णाला या प्रक्रियेचा उपयोग होतो.

CPR ही प्रक्रिया कुणीही शिकू शकतो का?  यावर डॉ. भोंडवे म्हणाले…

ही काटकोरपणे करायची शास्त्रीय प्रोसेस असते. मात्र शाळेतली मुलं, सर्वसामान्य माणसं देखील शिकू शकतात. परदेशात अनेक ठिकाणी यासाठी मशीन ठेवलेली असते आणि लोकांना त्याच्या वापराबद्दल माहिती दिलेली असते. आपल्याकडे IMA तर्फे आणि इतर वैद्यकीय संस्थांतर्फे असे प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.

तर…एकंदरीत तुम्हांला लक्षात आल असेल CPR म्हणजे नक्की काय ते ह प्रोसेस तुम्हांला शिकायचं असेल तर तुम्ही त्याच प्रशिक्षण घेऊ शकता..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.