एका दिग्गज नेत्याने रागाच्या भरात मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा कुर्ता फाडला होता…

दिग्विजय सिंह एकेकाळी मध्यप्रदेश काँग्रेसचा प्रमुख चेहरा. गांधी परिवारा जवळील. केंद्रिय राजकारणात दिग्गी राजा अशी विशेष ओळख असणाऱ्या दिग्विजय सिंह यांच्या सोबत घडलेला हा किस्सा. 

एक वेळा दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असतांना झालेलं भांडण लपवू शकले नव्हते. त्यांचा फाटलेला कुर्ता मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं.

राजकारणात हे चालत असत.

कोणासोबत झाले होते भांडण? कोणी फाडला होता दिग्विजय यांचा कुर्ता?

मध्यप्रदेश मधून छत्तीसगड वेगळ करत एक नवीन राज्य स्थापन करण्यात येत होते. त्यावेळी केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतुत्वाखालचे सरकार होते. तर मध्यप्रदेश मुख्यमंत्री होते कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह. जेव्हा नवीन राज्याची स्थापनेची चर्चा सुरु होते. त्यावेळी छत्तीसगड मधील कॉंग्रेस नेत्यांना आशा आकांश उंचावू लागल्या होत्या.

नेत्यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत होते

कॉंग्रेसच्या प्रत्येक नेत्याला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत होते. आप आपल्या मतदार संघात तयारी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या होत्या. यात विद्याचरण शुक्ला स्वताला मुख्यमंत्री पदाचे सर्वात शक्तिशाली दावेदार समजू लागले होते. का तर, त्यावेळच्या छत्तीसगड मधील कॉंग्रेस मधील शुक्ला सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते होते.  

सर्वात महत्वाचे म्हणजे दिल्ली कॉंग्रेस मध्ये त्यांचे वजन होते.

कॉंग्रेस मध्ये पद मिळवायचे असेल तर ही गोष्ट फार महत्वाची असते. मात्र त्यांना ३१ ऑक्टोबर २०००  रोजी चांगलच झटका लागला. कारण त्याच्या ऐवजी माजी आयएएस अधिकारी आणि कॉंग्रेस कुटुंबियांच्या जवळील अजित जोगी यांचे नाव छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले होते.

आणि शुक्ला यांनी गाठले फार्म हाऊस

ही बातमी कळातच विद्याचरण शुक्ला यांना राग अनावर झाला. आणि ते रागाच्या भारत आपल्या फार्म हाउसवर निघून गेले. त्यावेळी कॉंग्रेसकडून गुलाम नबी आझाद आणि प्रभा राव यांना छत्तीसगड मध्ये निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते.

अजित जोगी यांना छत्तीसगडचा मुख्यमंत्री करणार असल्याचे समजल्यावर विद्याचरण शुक्ला नाराज झाले होते. हे समजल्या नंतर गुलाब नबी आजाद आणि प्रभा राव यांनी थेट फार्म हाउस गाठले. त्यांच्या सोबत दिग्विजय सिंह सुद्धा होते. फार्म हाउस वर शुक्ला यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री अजित जोगी यांना बनविण्यात येणार असल्यामुळे विद्याचरण शुक्ला यांना जेवढा राग आला होता. तेवढाच राग त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आला होता. गेल्या काही वर्षापासून विद्याचरण शुक्ला हेच मुख्यमंत्री होतील असे त्यांना वाटत होते.

फार्म हाउसवर तीनही नेत्याचे आगमन होताच शुक्ला यांच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करायला सुरुवात केली.

संतप्त कार्यकर्ते थेट गुलाब नबी आझाद प्रभा राव आणि दिग्विजय सिंह यांच्यावर अंगावर धावून गेले होते. गोष्ट धक्काबुक्की पर्यंत येवून पोहचली होती. याचा सामना दिग्विजय सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा करावा लागला.

विद्याचरण फार्म हाउस मधील मध्यल्या खोलीत बसले होते. मात्र त्यांनी बाहेर सुरू असलेल्या गोंधळ  शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही.

दिग्विजय सिंह फार्म हाउस मध्ये जाऊन पाहतात तर विद्याचरण शुक्ला घामाघूम होऊन बसले होते.

फार्म हाउसवर गेल्याला त्या तीन नेत्यांची  शुक्ला यांच्या सोबत काय चर्चा झाली? शुक्ला यांनी त्यांना नेमके काय उत्तर दिले? या सर्व गोष्टी केवळ त्या चार जणांचा माहित. मध्ये काय झालं हे बाहेर कोणाला कळलच नाही.
मात्र जे झाल ते वाईट होत. दिग्विजय सिंह जेव्हा बाहेर आले तेव्हा त्याचं उत्तर दिसले.

शुक्ला याच्याशी चर्चा करून बाहेर आले तेव्हा दिसलेला नजरा पाहून सर्वच जण चकित झाले होते. दिग्विजय सिंह यांचा कुर्ता फाटला होता. मीडियाच्या कॅमेरात ही गोष्ट कशी लपणार आहे बर. आता मात्र दिग्विजय सिंह यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार होते.
दिग्विजय सिंह यांना ही बाब लपविताच येणार नव्हती. त्यांचा कडे दुसरा कुठलाच रस्ता नव्हता. त्यामूळे पत्रकारांनी त्यांना विचरण्यापूर्वीच त्यांनी सांगून टाकले.

राजकारणात आहे गोष्टी होत असतात. त्यावेळी कळले की मध्ये चर्चे दरम्यान काय झाले आहे. त्यावेळी दिग्विजय सिंह हे ऐका राज्याचे मुख्यमंत्री होते. काँग्रेस मध्ये त्यांच्या शब्दाला त्यावेळी चांगलेच वजन होते.

२०१३ मध्ये ऐक वेळ अशी आली होती. मध्यप्रदेश काँग्रेस भवन मध्ये मीटिंग सुरू होती आणि दिग्विजय सिंह दरवाजा बाहेर वाट पाहत उभे होते. त्यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष होते अरुण यादव.

Leave A Reply

Your email address will not be published.