त्या दिवशी दिनेश कार्तिकला कळाल की आपल्या बायकोचं दुसऱ्या क्रिकेटरशी लफडं सुरू आहे.

प्रेम कधी पण केव्हा पण होऊ शकतं अस म्हणतात. पण जर प्रेम लग्नानंतर वेगळयाच व्यक्ती बरोबर झालं तर तेव्हा मात्र घोळ होतो. पण आपली बायको आणि जवळच्या मित्राने धोका दिला तर जास्त वाईट वाटतं.

सुप्रसिद्ध विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक याच्या सोबत सुद्धा असच काहीसं झालं होतं.

दिनेश कार्तिक मूळचा तामिळनाडू च्या थिरूचेंडूरचा. त्याचे वडील सुद्धा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत त्यामुळे अगदी लहानपणापासून दिनेशला क्रिकेटची आवड निर्माण झाली होती.

पण वडिलांच्या नोकरी निमित्त दोन वर्षे कुवेतला गेला पण क्रिकेटवरील एकाग्रता काही कमी झाली नाही. वडिलांना सुद्धा दिनेश ला इंडियन जर्सी मध्ये बघायचं होत.

घरच्यांच्या शिक्षणाच्या आग्रहामुळे त्यांची स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत ती वेळ दिनेशवर त्यांनी येऊ दिली नाहीत.

त्याला फक्त आणि फक्त क्रिकेट खेळू दिलं.

स्कुल क्रिकेट पासूनच दिनेशचं कौतुक सुरू झालं. वेगाने अंडर१४, अंडर १६ , अंडर १९ हे टप्पे पार करत तो तामिळनाडूच्या रणजी टीममध्ये पोहचला. तेव्हा त्याच वय फक्त सोळा वर्षे होतं.

रॉबिनसिंग चा आदर्श बाळगत दिनेशने स्वतःच्या फिल्डिंग वर मेहनत घेतली होती. त्याची फिल्डिंग बघून त्याला विकेटकिपिंगची जबाबदारी सुद्धा देण्यात आली.

साधारण दोन हजार सालाच्या सुरवातीला भारताकडे रेग्युलर विकेटकिपर नव्हता.

मोंगिया मॅच फिक्सिंग मध्ये सापडल्यापासून अनेक किपर ट्राय केले गेले.

याच काळात अवघा १८ वर्षांचा दिनेश कार्तिक भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळू लागला. सगळं स्वप्नवत घडल होतं. वडिलांची इच्छा पूर्ण झाली.

पण दुर्दैवाने दिनेशला टीम मधली जागा पक्की करता आली नाही. पुढे धोनी आल्यावर तर त्याच्या करियरला मोठा सेटबॅक बसला.

पण धोनीला सुद्धा दिनेशच टॅलेंट माहीत होतं.

२००७ साली पहिल्या टी20 वर्ल्ड कप साठी जेव्हा सचिन, गांगुली, द्रविड यांनी माघार घेतली तेव्हा कप्तानी मिळालेल्या धोनी ने दिनेश कार्तिक ची निवड केली.

या वर्ल्डकप मध्ये दिनेश खूप काही चमकदार कामगिरी करू शकला नाही पण जिंकणाऱ्या वर्ल्डकप चा सदस्य म्हणून त्याचीही खूप हवा झाली.

पुढच्या वर्षी तो फॉर्मात देखील आला. त्याचं टीममधलं स्थान पक्कं झालं.

२००७ साली त्याच निकिता वंजारा या मुलीशी लग्न झालं. हे लग्न झालं तेव्हा दोघांचंही वय अतिशय कमी होतं. अजून समज आली नव्हती. दिनेश कार्तिकला तर क्रिकेट सोडून काही दिसतही नव्हतं.

पुढे त्याच्या करियरमध्येही खूप उतार आला. आयपीएल मध्ये चांगली कामगिरी होत नव्हती. भारतीय टीममधून स्थान परत गेलं होतं. तामिळनाडूकडून रणजी खेळताना तो कमबॅक करण्यासाठी कष्ट घेत होता.

रणजीचा २०१२ सालचा सिझन सुरू होता.

तामिळनाडू विरुद्ध कर्नाटक मॅच होती. त्या दिवशी दिनेश कार्तिकवर आभाळ कोसळणारी माहिती कळाली.

दिनेशच्या बायकोचं निकिताचं दुसऱ्याच कोणाशी अफेअर सुरू होत. तो दुसरा म्हणजे दिनेशचा बेस्ट फ्रेंड आणि भारतीय ओपनर मुरली विजय.

मुरली विजय आणि दिनेश कार्तिक लहानपणापासूनचे मित्र.

कित्येक वर्षे दोघे एकत्र तामिळनाडू कडून खेळले होते. पण इतकं असूनही मुरलीने आणि निकिताने दिनेशला फसवलं होत.

दिनेशशी लग्न होऊन पाच वर्षे झालेली तरी निकिता त्याच्या सोबत खुश नव्हती. मित्र म्हणून मुरली त्यांच्या घरी यायचा आणि यातून हा विवाह बाह्य संबंध सुरू झाला.

निकिता त्या काळात प्रेग्नन्ट होती.

दिनेशने तिला तडकाफडकी घटस्फोट देऊन टाकला. मुरली विजयशी तीच लग्न झालं.

दिनेशने सुद्धा सुप्रसिद्ध स्क्वाश प्लेअर दीपिका पल्लीकल हिच्याशी लग्न केलं.

आज हे चौघेही आपापल्या संसारात खुश आहेत. मुरली आणि निकिता ला त्यांनंतर दोन मुले झाली. सध्या ते तीन बाळांचे पालक आहेत.

या नंतर कधी दिनेश आणि मुरली आपापसात बोलले नाहीत.

पण अनेकदा एकमेकांसोबत खेळण्याचा प्रसंग येतो. उदाहरणार्थ २०१८ साली इंग्लंड दौऱ्याला दोघांचीही निवड झाली होती. तेव्हा ते एकत्र खेळले मात्र त्यांच्यातील भांडणे आणि तणाव मैदानातही जाणवून येत होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.