डिस्नेच्या स्टुडियोत उंदीर पळापळ करतांना पाहून त्याला मिकी माऊस सुचला.

एक अशी कंपनी जीचा उल्लेख जगातली मोठ्या कंपन्यामध्ये केला जातो, जीची विक्री २ वर्षांपूर्वी  2340 कोटी डॉलर्स आहे, जीचा ब्रँड गेली अनेक वर्षे सर्वात टॉपवर असलेला दिसतो. अशा कंपनीचे चित्र आपण इमॅजिन करायचं म्हटलं तर कसं दिसेल?  मोठ्या आवाजात धडधडणारे कारखाने, त्यात कच्चा माल येतोय, तयार झालेल्या वस्तू खोक्यातून भरभरून ट्रक्समध्ये जगभर पाठवल्या जात आहेत असंच काहीतरी इमॅजिन होईल.

पण वॉल्ट डिस्ने ही वेगळ्याच प्रकारची कंपनी आहे. ती फक्त मनोरंजनाची उलाढाल करते.

वॉल्टर एलियास डिस्ने हा 1966 सालचा डिसेंबर महिन्यात मरण पावला, तेव्हा न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मोठा मथळा धडकला होता,

‘वॉल्ट डिस्ने वयाच्या पासष्टाव्या वर्षी सागर किनारी पावला. त्यानं एका साध्या उंदरावर स्वतःचं मोठं साम्राज्य उभं केलं होतं.’

वॉल्ट डिस्ने हे वाचायला जिवंत असता तर त्याला नक्कीच ते खटकलं असतं.  खरं तर त्यांनं उंदरावरच्या साम्राज्यशिवाय इतरही बरंच काही केलं होतं. पण त्याचा तो मिकी माऊस नावाचा उंदीर एवढा गाजला की लोक त्याची इतर कामगिरी विसरतात. वॉल्टला याची नेहमीच खंत वाटायची.

1901 साली वॉल्ट शिकागोमध्ये एका गरीब कुटुंबात जन्मला. लहानपणी वडिलांना शेतीत मदत करणे, वर्तमानपत्र वाटणे, असे उद्योग त्यांने केले. पुढे तो एका आर्ट स्कूलमध्ये दाखल झाला. तो फावल्या वेळात लोकांची व्यंगचित्र काढून विके. तेवढाच त्याला त्यातून पॉकेटमनी मिळायचा.

युद्ध सुरू झालं तेव्हा तो शिक्षण, कला वगैरे सोडून रेड क्रॉस मध्ये दाखल झाला.

फ्रान्समध्ये तो अंबुलन्स चालवायचा. वेळ मिळत जायचा तसा तो कार्टून्स काढायचा. वोल्ट कधी शाळेत गेलाच नाही. त्यानंतर त्याने एका जाहिरात कंपनीत नोकरी धरली. लहान लहान उद्योगांसाठी, तो जाहिरातींची चित्र काढायचा, ती चित्रपटगृहांमध्ये दाखवली जायची.

एकदा एका दुकानात त्याची आयवर्क्स नावाच्या माणसाची गाठ पडली. त्यांनी ‘आयवर्क्स डिस्ने’ नावाची कलात्मक वस्तू विकणारी कंपनी काढली. आयवर्क्स नावामुळे लोकांना वाटायचं ते चष्मे विकतात, म्हणून लोकं चष्मे घ्यायला त्यांच्या दुकानात यायची. या गोंधळामुळे त्यांनी कंपनीचे नाव बदललं. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही एका महिन्याच्या आत कंपनी बंद पडली.

नंतर डिस्ने कॅन्सास सिटी मध्ये येऊन पोहोचला. तिथे त्याने दुसर्‍या एका जाहिरातीच्या कंपनीत काम पत्करलं. ही कंपनी सिनेमा सुरू होण्यापूर्वी लोकांची करमणूक करण्यासाठीचा आणि मोशन फिल्मस बनवायची.

ॲनिमेशन फिन्स मध्ये डिस्ने रमू लागला आणि त्याने पुन्हा स्वतः धंद्यात पडायचं ठरवलं. 

‘लाफ ओ ग्रॅम फिल्म्स’ नावाची स्वतःची कंपनी काढली. पहिल्यांदा त्याला जाहिरातींसाठी ॲनिमेशन फिल्म तयार करण्याचा थोडाफार धंदा मिळाला. परंतु तो इतका चालला नाही. चित्र काढण्यासाठी नेमलेल्या कलाकारांना वेळेवर पगार न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली.

डिस्नेनं आपलं घर सोडलं, कच्चे दाणे खाऊन राहायला सुरुवात केली. पण शेवटी तो हि कंटाळला आणि डोक्यावर पंधरा हजार डॉलर्स कर्ज घेऊन डिस्ने कॅलिफोर्नियातल्या हॉलिवूडला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसला. ते साल होतं 1923. तिथेच जाऊन त्याने त्याच्या काकांच्या गॅरेजमध्ये आपलं बस्तान बसवलं.

हॉलीवूड चित्रपट व्यवसाय आणि आपला पसारा मांडला होता. शेकडे लहान-सहान फिल्म स्टुडिओ जिकडे तिकडे पसरले होते. दिसने एका स्टुडिओ मध्ये नोकरी करण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला. मग त्याने स्वतःचा स्टुडिओ काढायचा ठरवलं. आणि त्याला लागलीच सहा कार्टून फिल्म तयार करण्याची ऑर्डर मिळाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेना.

आणि मग त्याने तीन खोल्यांचा एक स्टुडिओ दरमहा दहा डॉलर्स भाड्याने घेतला आणि पूर्वीच्या आयवर्क्सबरोबर आणखी एकाला कामाला नेमून काम सुरू केलंही!  या कार्टून मधल्या हिरोइनचे नाव होतं ऍलिस. 1924 ते 1926 च्या दरम्यान डिस्ने बंधूंनी पन्नास च्या वर कार्टून फिल्म बनवून थोडाफार पैसा मिळवला आणि मग हॉलीवूडमध्ये अजून मोठा स्टुडिओ घेतला.

ऍलिसवरच्या बऱ्याच फिल्मसनंतर वॉल्टने ‘ओस्वाल्ड’ नावाच्या कशावर कार्टून फिल्म काढून त्या दर चित्रपटाला 2250 डॉलर्स या दराने वितरकांना विकायला सुरुवात केली.

त्याने आणखी चित्रकार नेमले आणि नवीन नवीन कथानकं शोधली आणि नवे नवे चित्रपट  ‘ओस्वाल्ड’ भोवती काढायला सुरुवात केली. पण त्यातल्या एका वितरकांनी डिस्नेची बरीच माणसं फोडली आणि स्वतःच ‘ओस्वाल्ड’ याच नावाच्या सशा वर कार्टून फिल्म बनवायला सुरुवात केली. घडलेल्या प्रकारानंतर वॉल्ट खूप हादरला पण खचला नाही.

आणि मग डिस्ने ला त्याच्या जगप्रसिद्ध मिकी माऊस सापडला.

मिकी माउस चं नाव डिस्ने ने अगोदर ‘मोर्टीमर’ असं ठेवलं होतं पण बायकोच्या आग्रहाखातर त्यांना ते बदलून मिकीमाऊस असं ठेवलं. मिकी माऊस मुळे डिस्नेचं भाग्य उजळलं. कॅन्सान्सच्या गरीबीच्या दिवसात त्याच्या स्टुडिओत बरीच उंदरे पळापळ करीत. त्यांच्या वरून त्याला ही कल्पना सुचली असं तो नेहमी म्हणायचा.

‘प्लेन क्रेझी’ गॅलोपिन गॉशा’ यासारख्या मिकीच्या मुक्त चित्रपटानंतर त्याने ‘स्टीम बोट विली’ हा चित्रपट काढला. त्यात मीकी बोलतोय, गातोय,नाचतोय असं दाखवलं होतं. ती साउंड इफेक्ट्स चित्रपटात आणण्याकरता डिस्नेने अहोरात्र मेहनत घेतली.

भूतकाळापासून त्याने धडा घेतला, काही झालं तरी चित्रपट विकायचे नाहीत भाड्याने द्यायचे नाहीत असं त्याने ठरवलं.

शेवटी एक वितरक तयार झाला आणि चित्रपट लोकांनी बघितला.. आणि लोक अक्षरशः वेडे झाले.

यानंतर डिस्ने ने भराभर मिकी चे चित्रपट काढले आणि ते खूप गाजले. मग त्याने शास्त्रीय संगीतावर आधारलेला ‘द सिली सिफनीज’ हा चित्रपट काढला. पण या सुमारास त्याचा आणि वितरकांचे दिसू लागलं. वितरकांकडून पैसे वेळेवर येईनात.

नंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या अनेक वर्षाच्या आयवर्क्स या सहकाऱ्याला नोकरी वर ठेवून त्याने डिस्नेसोबतच दोन हात करण्याचा मनसुबा रचला होता. शेवटी त्याने कहरच केला. डिस्ने त्याला भेटायला गेला तर त्याने डिस्ने लाच नोकरीची ऑफर दिली.  आणि मग फाटलंच.

शेवटी कोलंबिया पिक्चर्स बरोबर करार झाला त्यानंतर डिस्नेचे चित्रपट येतच राहिले आणि प्रचंड गाजतच राहिले. तो आता प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचत होता.

चार्ली चॅपलीनही त्याचं खूप कौतुक करी. त्याने स्नो व्हाइट अंड सेवन ड्रॉप्स हा चित्रपट काढायला तीन वर्ष घेतली पण तोही खूपच गाजला. मुख्य म्हणजे डाव्या विचारांच्या लोकांनी ही त्याला डोक्यावर घेतलं. यामुळे दिसलेला खूप बक्षीसही मिळाले. आणि त्याची प्रसिद्धी आणि संपत्ती वाढतच गेली.

मिकी माऊस तर एवढा लोकप्रिय झाला की, तो ब्रीफकेस, टी-शर्ट साबण, खेळण्याचे पत्ते, हेअर ब्रश, काचेच्या वस्तू, अलार्म ची घड्याळे या सगळ्यांवर दिसायला लागला. पण मिकी माऊस वर त्याने स्वतःचा हक्क ठेवल्याने त्याला खच्चून पैसे मिळायला लागले.

मिकी जगभर गाजू लागला. इटलीमध्ये ‘टोपोलींनो’ म्हणून तर जपानमध्ये मीकिकुची या नावाने तो लोकप्रिय होत होता.

टेलिव्हिजनच्या उदयानंतर डिस्नेने त्यावर आपले चित्रपट दाखवायला सुरुवात केली. या कार्यक्रमांची प्रचंड लोकप्रियता बघून कोकोकोला, जॉन्सन अंड जॉन्सन अशांसारख्या कंपन्यांनी ते स्पॉन्सर करायला सुरुवात केली.

त्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर ‘डिस्नेलँड’ नावाचा कार्यक्रम पुढची सात वर्ष दाखवण्याचा करारही केला. यासाठी त्याला किमान एक-दोन कोटी डॉलर्स तरी लागणार होते. 

यावेळी डिस्ने कॅलिफोर्नियामधील ‘डिस्नेलँड’ नावाचं एक मोठं पार्क उभं करत होता.

वयाची पन्नाशी उलटून गेल्यानंतर चा भयानक महागडा असा त्याचा तो प्रकल्प बघून कंपनीतल्या इतरांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यांनी मदत म्हणूनही फक्त 10, 000 डॉलर्स दिले पण डिस्ने ने हार मानली नाही.

त्याने त्याचं एक घर विम्याच्या पॉलिसीज सगळं पणाला लावलं, पण ‘डीस्नेलँड’ चं स्वप्न काही सोडलं नाही.

हा पार्क म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नव्हती. हजारो एकरामध्ये कृत्रिम नद्या, पूल, असंख्य झाड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या असंख्य गोष्टी यांसाठी अनेक आर्किटेक्टस, इंजिनियर्स आणि कामगार अहोरात्र मेहनत घेत होते. तसेच अग्निशमन दलाचे एक ऑफिसही त्याने तिथे उभं केलं. त्याच्याच वरच्या मजल्यावर बसून तो सगळ्यावर देखरेख करीत असायचा.

शेवटी 1955 झाली डिस्नेलँड सगळ्यांसाठी खुलं झालं. 

सुरुवातीला तेथे रोज 200 पाहुणे येत. पुढे संख्या वाढली 1965 सालापर्यंत पाच कोटी अमेरिकनांनी त्याला भेट दिली होती.  मग आता अनेक कंपन्यांनी त्याचा पैसे ओतून स्वतःच्या जाहिराती, स्पॉन्सरशिप हे प्रयोग चालू केले.

रशियाचा क्रूश्चेव्ह जेव्हा अमेरिकेत भेटीला यायला निघाला तेव्हा मला फक्त ‘डीस्नेलँड’ बघायचं असं म्हणाला होता.

यशानंतर 1960 मध्ये ओरलांडो, फ्लोरिडा येथे त्याने 27 हजार एकर जागा घेऊन डीस्नेवर्ल्ड उभा केलं. यात उद्याचं शहर कसं असेल हे रंगवण्यासाठी त्याने ‘एक्पोट सेंटर’ म्हणून एक अफलातून प्रकार उभा केला. 1971 साली सुरू झालं. पण ते पूर्ण होण्याअगोदरच म्हणजे 1966 सालीच वॉल्ट डिस्ने मरण पावला.

त्याच्या मृत्यूनंतर कंपनी काही काळ दिशाहीन झाल्यासारखे वाटत होती. तिच्यातली नवनिर्मिती आणि चैतन्य या गोष्टी हरवून गेल्या सारखा उदास वातावरण निर्माण झालं होतं.

एवढ्यात मायकेल आयनर यानं कंपनीची सूत्रे हातात घेतली आणि पुन्हा तिच्यात जान ओतली.

कंपनीने पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या प्रेक्षक वर्गाला आणि मध्यमवयीन लोकांना आपलेसे वाटतील असे सिनेमे काढायचा सपाटा लावला. लवकरच डिस्नेने परत एकदा लोकांच्या मनात असलेलं, आपलं लाडाचं पण काही काळ हरवलेलं स्थान काबीज केलं.

स्टीव्ह जॉब्ज या ॲपल कंपनीच्या गाजलेल्या सीईओला डिस्नेने आपल्या संचालक मंडळावर घेतल्यावरून वादळ निर्माण झालं होतं. 2008 मध्ये जॉब्जच्या तब्येतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीतही त्याने डिस्नेच्या संचालक मंडळावर राहायची इच्छा व्यक्त केली. त्याला अनेक लोकांनी विरोध केला.  पण त्याला न जुमानता जॉब्जची फेरनिवड करण्यात आली.

“मी एप्पल कंपनीचे कामकाज बघण्यासाठी शारीरिक दृष्ट्या असमर्थ आहे” असं विधान केल्यामुळे प्रकरण अजुनच भडकलं. ‘डिस्नेच्या संचालकपदी काम करायला जॉब कसा काय समर्थ आहे’,  असा प्रश्न अनेक जण विचारायला लागले पण शेवटी जॉब्जने आपलं पद राखलं.

 

2009 साली डिस्नेने प्रथमच आपल्या चित्रपटांमध्ये गोऱ्या राजकन्या ऐवजी काळी राजकन्या दाखवायचे ठरवलं.

त्यासाठी त्यांनी ‘द प्रिन्सेस अँड फ्रॉग” नावाचा सिनेमा काढायचं ठरवलं. पण यात खूप वादविवाद झाले. काळ या लोकांवर नेहमीसारखी शिक्के मारून डिस्नेनं हा सिनेमा काढल्याचं अनेकांचं मत झालं. 

उदाहरणार्थ, या राजकन्येचं आधीच एका मोलकरणीचे होते असं दाखवण्यात आलं होतं. निषेधानंतर बदलून ते स्वतःचे रेस्टॉरंट काढायच्या प्रयत्नात असलेल्या महिला उद्योजकाचे करण्यात आलं. पण शेवटी ही राजकन्या एका गोर्‍या राजपुत्राच्या प्रेमात पडते असं दाखविण्यात आल्यामुळे समतावादी लोक भडकले.

काळा तरुण राजपुत्र असूच शकत नाही का असा त्यांचा प्रश्न होता. या सगळ्या गोंधळामुळे डिस्नेला या सिनेमात अनेक बदल करावे लागले.

पण कितीही वाद झाले, संकटे आली तरी डिस्ने हॉलिवूडमध्ये पाय रोवून उभी आहे. वॉल्ट डिस्नेच्या मिकी माउस सारख्या कलाकृतींनी अमेरिकाच नाही तर भारतासारख्या देशातल्या कित्येक पिढ्याना भुरळ घातलीय. त्यांचं नाव जगभरातल्या आबालवृद्धांना माहीत असतं हे त्या कंपनीचे यश आहे!

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.