लोकं म्हणतायेत तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात वाजलंय

तृणमूल काँग्रेसची सध्या राष्ट्रीय राजकारणात चलती आहे. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस आणि भाजपाला  अल्टरनेटीव्ह देण्यासाठी तृणमूल सुरवातीची पावलं तरी बरोबर टाकतय असं सांगण्यात येतंय. बंगालच्या निवडणुकीत भाजपाला धूळ चारल्यानंतर तशीच करामत राष्ट्रीय स्तरावर करण्याची वल्गना तृणमूलच्या नेत्यांकडून केली जातेय. पण त्याचबरोबर तृणमूलनं काँग्रेसलाही शिंगावर घेतलंय. एवढा की तृणमूल भाजपशी हरवायला आलंय की काँग्रेस हेच कळत नाहीए.

याआधी तृणमूल म्हटलं कि फक्त ममता बॅनर्जी असं सरळ सोप्पं गणित होतं. 

मात्र सध्या ममतांनबरोबर अजून एक नाव तृणमूलला जोडलं गेलंय ते म्हणजे प्रशांत किशोर.

ममतांचा बंगालमधील विजय असू दे की सध्या राष्ट्रीय पातळीवरील पक्ष वाढवणं प्रशांत किशोर यांना तृणमूलच्या नेत्यांपेक्षा हि जास्त क्रेडिट दिला जातंय. अशा नुसत्या वावड्या असत्या तर त्याकडे लक्ष नं देणं तृणमूलला शक्य झालं असतं. मात्र पार्टीमध्ये जी नवीन लोक दाखल होतायत ती प्रशांत किशोरांच्याच नावाचाचं जप करतायत.

गोव्यामध्ये जेव्हा माजी मुख्यमंत्री लुइझिनो फलेरियो यांनी  काँग्रेसमधून टीएमसीमध्ये सामील होत असताना हद्दच पार केली.

मी टीएमसी नेत्यांना कधीच भेटलो नाही. मी निर्णय घेण्याआधी फक्त प्रशांत किशोर यांना भेटलो असं लुइझिनो फलेरियो म्हणाले होते.

माजी मुख्यमंत्र्याचं हे विधान तृणमूलच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलं होतं. तृणमूलमध्ये आलेले मेघालायचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचं पण पुन्हा तेच. ”टीएमसीचे मुख्य रणनीतीकार आणि मी राज्याच्या हिताचा सारखाच विचार करतो” असं संगमा ह्यांनी म्हटलं होतं. मात्र ज्याला आपण इलेक्शण मॅनेज करायला घेतलाय ज्याचा आणि पार्टीचा काही संबंध नाहीए असा व्यक्ती पार्टीच्या यशाचं श्रेय घेतोय हे तृणमूलच्या नेत्यांना आता सहन होत नाहीए.  

प्रशांत किशोर यांची I-PAC आणि तृणमूल हे दोन्ही वेगेळे आहेत.

तृणमूलनं I-PAC ला पाच वर्षांसाठी काम दिलं आणि त्या काळात त्यांनी तृणमूलनं त्यांना दिलेली टार्गेट पूर्ण करणे अपेक्षित असल्याचं टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांनी म्हटलं होतं. राजकीय जाणकारांच्या मते डेरेक ओब्रायन यांनी I-PACचं नावाखाली प्रशांत किशोर यांनाच आपली जागा दाखवून दिलेय.

पण हे प्रकरण इथंच मिटत नाहीए नुकत्याच झालेल्या कोलकाता निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी आपल्या ठरलेल्या स्ट्रॅटेजिनुसार ५०% तिकिटं नवीन उमेदवारांना देण्यास सांगितलं होतं. मात्र ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या या सल्ल्याला सरळ केराची टोपली दाखवत जुन्याच नगरसेवकांना तिकिटं दिली  होती. 

ममता बॅनर्जी यांनाही प्रशांत किशोर यांच्या बऱ्याच गोष्टी खटकत असल्याचं सांगितलं जातंय. जानकारांच्या मते भारतीय राजकारणात पर्सोनालिटी कल्टवर चालतं. प्रत्येक नेत्याला आपणच पक्षाचा सर्वोच्च नेता असल्याची प्रतिमा निर्माण करायची असते. ममतांनीही अशीच प्रतिमा निर्माण केली होती. तसेच आपल्यानंतर दोन नंबर कोण याचं उत्तर त्यांनी आपले पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना राजकारणात पुढं आणून दिल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र प्रशांत किशोर या दोन्ही जागांशी स्पर्धा करत असल्याचं तृणमूलच्या नेत्यांना वाटतंय.

प्रशांत किशोर यांना आपल्या पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवताना नितीश कुमारांनी प्रशांत किशोर हे प्रसिद्धीसाठी हावरे आणि अतिमहत्वकांक्षी असल्याचं म्हटलं होतं.

आता तृणमूललाही जवळपास तसंच वाटत असल्याचं सांगण्यात येतंय. या सर्व गोष्टींवर सध्या तरी आम्ही ‘एकच टीम’ असल्याचं म्हणतंय. पण येणाऱ्या काही दिवसात ममतादीदी प्रशांत भाऊंना कसं हॅन्डल करतात हे बघण्यासारखं आसनारंय.

हे ही वाच भिडू :  

 

Webtitle :Disputes between TMC and political strategist Prashant Kishor

 

Leave A Reply

Your email address will not be published.