हिंदू मुस्लिम वादातून पेटलेल्या गुरुग्राममध्ये असा हि एक गुरुद्वारा आहे जिथं नमाज पडला जातो.

भारतात हिंदू मुस्लिम कट्टरतेचं पेव फुटलंय. आणि यावरून राजकारण सुरूच आहे. पण काही आदर्श गोष्टी पण घडतात. कधीकधी माध्यम अशा गोष्टींना प्रसिद्धी द्यायला विसरतात. पण भिडू अशा गोष्टी सांगायला विसरत नाही बरं का… हि गोष्ट आहे सामाजिक सौहार्दाची.

हरियाणातल्या गुरुग्राम शहरात नमाज अदा करण्यावरुन वाद सुरु आहे. पण गुरुग्राम मधल्याच काही हिंदूंनी मुस्लिमांना आपल्या घरी नमाज पठण करण्यासाठी जागा देऊ केली आहे. त्याही पुढं जाऊन काही शीख बांधवांनी नमाजसाठी गुरुद्वारामध्ये जागा देऊ केलीय.

काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राममध्ये उघड्यावर नमाज पठण करण्याला विरोध होतोय. जसा तो इतर भारताच्या अनेक भागांमध्ये होतोय. गुरुग्राम मध्ये अनेकदा दोन्ही हिंदू मुस्लिम गट आमनेसामने आले. एवढच नाही तर हिंदू संघटनांनी मुस्लिमांना उघड्यावर नमाज पठण करण्यास विरोध केला.

मग या वादात आठवडाभरापूर्वी गुरुग्राम प्रशासनाने मुस्लिम ज्या आठ ठिकाणी नमाज पठण करतात त्याची सुद्धा परवानगीही रद्द केली.

वाद टोकाला जाऊ नये, परस्पर बंधुभाव रहावा म्हणून प्रशासनाने समिती ही स्थापन केली होती. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा काही हिंदू लोकांनी उघड्यावर जुम्म्याचा नमाज पठण करण्यास विरोध केला.

या वादात शीख समुदायाच्या गुरुग्रामच्या सदर बाजारच्या गुरुद्वारा समितीने मुस्लिमांना गुरुद्वारामध्ये नमाज अदा करण्यास परवानगी दिली.

यावर गुरुद्वाराचे अध्यक्ष शेरदिल सिंह म्हणाले की,

जर एखादी ओपन स्पेस असेलच तर मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी. आणि अशा क्षुल्लक मुद्द्यांवरून भांडू नये. उघड्यावर नमाज अदा करणाऱ्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली. मात्र ज्यांना अडचण आहे त्यांनी हल्ला करण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधायला हवा होता.

आम्ही गुरुद्वाऱ्याचे बेसमेंट मुस्लिम बंधूंच्या नमाज पठणासाठी खुल करीत आहोत. ज्या कोणा मुस्लिम बांधवांना अडचण आहे त्यांनी इथं येऊन शुक्रवारची नमाज अदा करावी.

देखा…..इसको कहते है भाईचारा. हे फक्त गुरुग्रामच नाही तर आपल्या संपूर्ण भारतात अपेक्षित आहे मित्रांनो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.