दिवाळीत सणासुदीच्या काळात ब्लॅक मॅजिक वाल्यांचे देखील पेव फुटत असते…

आफ्रिका असो किंवा युरोप, गरीब देश असुदे नायतर श्रीमंत देश असुदे, विकसनशील असुदे किंवा प्रगत राष्ट्र असुदे जगात आजही काळ्या जादूने आपला येऊ वेगळा ट्रेडमार्क लोकांमध्ये सेट करून ठेवलेला आहे. म्हणजे ते खरं असतं का नसतं इथून त्याची सुरवात आहे पण जे जादूटोणा, काळ्या जादूला मानतात ते तर त्याला श्रमतातच पण जे नाही मानत तेसुद्धा भीतीपोटी त्यापासून फटकून राहतात.

आता दिवाळीचा सण म्हणल्यावर या काळ्या जादू करणाऱ्या, कर्मकांड गोष्टींचा वावर वाढतो. कुठं जिज्ञासेपोटी तर कुठं सुडापोटी पण या तंत्रज्ञानाच्या जगात या गोष्टींचं एक वेगळं जग आहे. जसं दिवाळी,दसरा,महाशिवरात्री,नवरात्र या दिवसांमध्ये या गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या दिसतात.

तस पाहिलं तर दिवाळीच्या पाच दिवसात तंत्र साधनेसाठी अनुकूल दिवस मानले जातात शत्रूंवर विजय मिळवणं आणि घरात बरकता आणणं या गोष्टींवर जास्त लोकांचा फोकस असतो. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी जादूटोणा, टोटके केले जातात. 

याविषयीच्या बऱ्याच कथा सांगितल्या जातात पैकी दिवाळीच्या रात्री लक्ष्मी देवी आपली बहीण दरिद्रासोबत पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येते. तिला खुश करण्यासाठी बरीच लोकं हे काळ्या जादू आणि जादूटोणा करत असतात. दुसरं कारण म्हणजे दिवाळीच्या दिवशी महाअमावस्या असते तंत्रांशी निगडित बऱ्याच गोष्टी या सूर्यप्रकाशापासून अलिप्त ठेवून रात्रीच्या अंधारात केल्या जातात. दिवाळीच्या काळात चंद्रप्रकाश कमी असतो आणि अंधार जोरावर असतो. हा अंधार काळ्या जादू करण्याऱ्यांसाठी वरदान असतो.

आता या पुढील गोष्टी समाजात प्रचलित आहेत. त्यावर कोणाची किती श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मॅटर आहे.

स्त्री पिशाच्च पासून वाचायचं असल्यास दिवाळीच्या दिवशी अनेक टोटके केले जातात यात सगळ्यात जास्त केला जातो तो म्हणजे घरातून कचरा बाहेर न फेकणे वैगरे. तांत्रिक लोकं रात्री सिद्धी प्राप्त करण्यासाठी मूडद्याना जागवायचं काम करतात. 

घरात कायम पैसा खेळता रहावा म्हणून दिवाळीच्या दिवशी 12 ते 4 या काळात गुप्त पूजा घातली जाते. देवीची सेवा केली जाते. रात्री घुबडाची साधना केली, त्याच्यावर काळे उडीद, तांदूळ आणि लाकडाचा भुसा फेकला जातो जेणेकरून वाईट शक्ती आपल्याकडं फिरकणार नाही. लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून काहीजण घुबडाच्या ढोलीत पान ठेवून येतात. स्मशानात जाऊन बगळामुखी पूजा घातली जाते. काही लोकं तंत्रमंत्र यांचं लॉकेट घालून फिरतात.

हा सारा खेळ विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या दृष्टिकोनातून चालतो अस नाही तर काही लोकांचा यावर प्रगाढ विश्वास असतो तर काही जण याचं हस उडवतात. देवाधर्माच्या आसपास फिरणाऱ्या या गोष्टी जितक्या थ्रिलर वाटतात त्याहीपेक्षा त्याची क्रेझ लोकांमध्ये जास्त आहे. या कलांमुळे लोकांची आस्था जिवंत राहते ज्यामुळे धर्म आणि समाज यांच्यात एक जिवंतपणा दिसून येतो असं म्हटलं जातं. 

सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही काय या प्रथांना प्रोत्साहन देत नाही आणि समर्थनही करत नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मॅटर आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.