दिवाळीला सिनेमा रिलीज करून हिट करायचा फॉर्म्युला आजही बॉलिवूडमध्ये फॉलो केला जातो….

सणासुदीला लोकं खाऊन पिऊन मजा करत असतात. त्यातल्या त्यात दिवाळी असेल आणि ऑफिसला सुट्टी असेल ( यात फक्त लकी लोकं ग्राह्य धरा ) तर मग जलसाच समजायचा. दिवाळी काळात फक्त फटाके,सोनपापड्या, नवे कपडे यांचीच वर्दळ नसते तर एक मोठी घटना याच चालत घडत असते ती म्हणजे सिनेमा रिलीजचा दणका. नीट बारीक लक्ष देऊन बघितलं तर कळेल की दिवाळीला एक मोठा सिनेमा रिलीज होतो म्हणजे होतोच. पण बऱ्याच जणांना वाटत असेल की मागच्या काही वर्षांपासून एखाद्या मोठ्या सणाच्या दिवशी सिनेमा रिलीज होण्याचा ट्रेंड आला का काय पण भिडू तसं नाहीए. आपण जरा डिटेलमध्ये बघू की दिवाळीला सिनेमा रिलीज व्हायचा ट्रेंड कधीपासून सुरू झाला.

दिवाळीला सिनेमा रिलीज का करतात तर लोकांना सुट्टी असते, घरात आनंदीआनंद असतो मग बॉक्स ऑफिसवर लोकांनी सुट्टीचा एन्जॉय करावा म्हणून एखाद्या तगड्या सेलिब्रिटीचा सिनेमा रिलीज केला जातो. खरंतर याला प्रेक्षकांचा मोठा वाटा मानला जातो कारण मोठ्या प्रमाणावर लोकं थेटरात जाऊन सिनेमा बघायला प्राधान्य देतात.( मागच्या दोन वर्षांपासून हे प्रकरण मोडीत निघालं आहे पण लवकरच त्यातही बदल होईल ).

हा ट्रेंड कसा सुरू झाला?

दिवाळी ही अशी सुट्टी कधीच नव्हती की एखाद्या दिग्दर्शकाने सिनेमा रिलीज करावा आणि पैसे छापावे, कारण त्यावेळी सिनेमा रिलेटेड लोकांचा समज होता की घरात सणसूद असताना कोण सिनेमा पाहत बोंबलत फिरल पण ही पद्धत मोडून काढली ती यश चोप्रा यांनी. 90 च्या दशकात बॉलिवूडचा सुवर्णकाळ सुरू होता. दिग्दर्शक यश चोप्रा यांनी दिवाळीत सिनेमा रिलीज करायचा ट्रेंड आणला आणि तो पहिला सिनेमा होता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचा लम्हे. 1991 मध्ये रिलीज झालेला, आजपर्यंत हा चोप्राच्या उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिवाळी बॉक्स ऑफिसवर चोप्रा आणि त्यांच्या मुलाच्या राजवटीला सुरुवात झाली.

यशराज फिल्म्सने 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे,” “मोहब्बतें,” “दिल तो पागल है” आणि “वीर-जारा” यासह दिवाळीला रिलीज झालेल्या हिट आफ्टर हिटसह बॉलिवुडवर राज्य केले. करण जोहरने 1998 मध्ये दिवाळीला हादरवून सोडणारा त्याचा हिट चित्रपट “ कुछ कुछ होता है ” चे वितरण करण्यासाठी चोप्रांसोबत सामील झाला. येथे आवर्जून उल्लेख केला जातो तो म्हणजे दिवाळी हिट्सचा ट्रेंड देणाऱ्या यश चोप्रा यांचा जब तक है जान हा शेवटचा सिनेमा होता आणि तो त्यांनी दिवाळीलाच रिलीज केला होता.

2000 च्या दशकानंतर मात्र खंड पडला. नंतर असे चित्रपट बनणं थांबलं जे प्रेक्षकांची गर्दी खेचू शकलं नाही. यात दिवाळीत सपाटून मार खाणाऱ्या सिनेमांमध्ये सावरीया, ब्लु, ऑल द बेस्ट, क्यूँ की ( फक्त गाणी वाजली ) यांचा समावेश होता. नंतर मग दुसरा ट्रेंड आला ईदच्या दिवशी सलमान खान किंवा शाहरूख किंवा आमिर तर प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट या दिवशी अक्षय कुमार यांचे सिनेमे रिलीज होऊ लागले. गेल्या काही वर्षांत “हॅप्पी न्यू इयर,” “प्रेम रतन धन पायो,” “ए दिल है मुश्किल,” आणि “शिवाय” सारख्या रिलीजने दिवाळीच्या दिवशी गोष्टी थोड्या प्रमाणात वाढल्या आणि बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईसुद्धा केली.

1990 पासून ते आजवर दिवाळीला रिलीज झालेले सिनेमे बघूया.

2021; सूर्यवंशी
2020; लक्ष्मी
2019; हाऊसफुल्ल 4
2018; 2.0
2017 ; सिक्रेट सुपरस्टार ,गोलमाल अगेन
2016; ए दिल है मुश्कील, शिवाय
2015; प्रेम रतन धन पायो
2014; हॅप्पी न्यू इअर
2013; क्रिश 3
2012; जब तक हैं जान,सन ऑफ सरदार
2011; रा.वन
2010; गोलमाल 3, ऍक्शन रिप्ले
2009; ऑल द बेस्ट, मैं और मिसेस खन्ना
2008; फॅशन, गोलमाल रिटर्न्स
2007; ओम शांती ओम
2006; डॉन, जान-ए-मन
2005; क्यों की, गरम मसाला
2004; वीर-झारा, ऐतराज
2003; पिंजर, राजा भैय्या
2002; जीना सिरफ मेरे लिए, वाह… तेरा क्या कहना?
2001; ये जिंदगी का सफर
2000; मिशन काश्मीर, मोहब्बतें
1999; हम साथ साथ हैं, शूल
1998; कुछ कुछ होता है, बडे मियाँ छोटे मियाँ
1997; दिल तो पागल है, दीवाना मस्ताना,भाई,मुस्तफा
1996; राजा हिंदुस्तानी, घातक
1995; दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, याराना
1994; हम आपके है कौन, सुहाग,
1993; बाजीगर
1992; जिगर
1991; लम्हे
1990; जमाई राजा

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.