चुकून बायो घेतलेल्या पोरीने आता ब्रेस्ट कॅन्सरवर लस शोधालीये

भारतात स्वस्त आणि चांगले उपचार मिळतात म्हणून जगभरातील अनेक नागरिक भारतात उपचारासाठी येतात. त्याला मेडिकल टुरिझम असं गोंडस नाव पण दिलंय. पण अशा भारतात महिलांच्या आरोग्य बाबत कशा प्रकारची हेळसांड होते ही, आकडेवारीवरून स्पष्ट होते.

भारतात दर मिनिटाला एक ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट सापडते आणि दर १३ मिनिटाला या कॅन्सरमुळे १ महिलेचा मृत्यू होतो. यावरूनच या कँसरची दाहकता लक्षात येते.

असे असले तरीही एक आशेचा किरण दिसत असून ब्रेस कॅन्सर मधील लायलाज ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरवर अमेरिकेत एक लसीचा शोध लागला आहे. ही लस शोधून काढण्यात एका भारतीय डॉक्टर महिलेचा समावेश आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ज्या अमेरिकेतील टीम ब्रेस्ट कॅन्सरवरील लस शोधून काढली त्यात राजस्थान मधील अजमेरच्‍या कन्‍या डॉ. छवी जैन यांचा समावेश आहे. या लसीच्या चाचण्या प्राण्यावर यशस्वी झाल्या आहेत. आता या लसीच्या महिलांवर क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरने बाधित असणाऱ्या १८ ते २४ या वयोगटातील महिलांना क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात दोन आठवड्यांच्या अंतराने तीन डोस दिले जाणार आहेत.

डॉ. छवी जैन म्हणाल्या की, ही लस प्रभावी ठरल्यास ब्रेस्ट कॅन्सर सारख्या असाध्य रोग बरा होण्याची आशा आहे.

एका अहवालानुसार ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर मध्ये अल्फा लैक्टलब्युमिन नावाचे ब्रेस्ट कॅन्सर प्रोटीन तयार होते. ही लस याच प्रोटीनला संपविण्याचे काम करते. अमेरिकेतील लर्निंग इन्स्टिट्यूट क्लीव्हलँड क्लिनिकमधील शास्त्रज्ञ छवी या अमेरिकेतील कॅन्सर सोसायटीच्या महिला संशोधन दूतही आहेत.

डॉ. छवी जैन यांचे आई-वडील सुद्धा डॉक्टर आहे

अजमेरमध्ये लहानाची मोठी झालेल्या छवीचे आई-वडील सुद्धा डॉक्टर आहेत. डॉ. संजीव जैन हे बालरोगतज्ञ असून अजमेर येथील जेएलएन हॉस्पिटलमध्ये ते आहेत. तसेच डॉ. छवी यांची आई या जेएलएन हॉस्पिटल मध्ये असून त्या ऍनेस्थेसिया विभागात आहेत.

डॉ. छवी जैन यांचे प्राथमिक शिक्षण अजमेरमधील सोफिया आणि मयूर स्कूल येथे घेतले. यानंतर   डॉ. छवी जैन यांनी पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजीमधून एमटेक केले. त्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंडमधील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठातून पीएचडी मिळवली.

डॉ. छवी जैन यांनी २०१८ ते जून २०२१ पर्यंत लर्नर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी डॉ. थॉमस बड आणि डॉ. व्हिन्सेंट टूहे यांच्या संशोधनावर आधारित कॅन्सर लसीच्या चाचणी टीममध्ये सामील झाल्या.

आपण म्हणत असतोमी अशी मोठी कामगिरी करणारे लोकं लहानपणापासूनच हुशार म्हणून ओळखले जातात. त्यांचे विश्व हे त्यांच्या क्षेत्राशी संबंधित पुस्तके हेच असते. रात्रंदिवस अभ्यास केल्यानेच यश मिळते असा आपला समाज आहे. पण डॉ. छवी यांच्याबाबतीत हि गोष्ट लागू होत नाही. 

डॉ. छवी जैन यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीही डॉ. छवीला रात्रंदिवस अभ्यास करतांना पाहिले नाही.

मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हाही डॉ. छवी जैन यांना काही प्रश्न विचारले तर ती सगळ्या प्रश्नाची अगदी योग्य उत्तर देत असे. याचा आम्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसे. स्वतः छवीनेही कबूल केले आहे की, तिने कधीच जास्त वेळ बसून अभ्यास केला नाही. कोणताही प्रश्न तिला पटकन समजतो, म्हणूनच तिला इतर मुलांइतके कष्ट घेण्याची गरज पडत नाही.

 खरं तर डॉ. छवीला इंजिनियर व्हायचे होते. 

डॉक्टर आई-वडील असणाऱ्या छवी जैन यांना आपल्या चुलत बहिणीप्रमाणे इंजिनियर व्हायचे होते. मात्र एक दिवस त्यांच्या हातात बायोलॉजीचे पुस्तक काय पडले त्यांच्या विचारात बदल झाला. मयूर विद्यालयात अकरावीला असतांना त्यांनी गणित हा विषय घेतला होता. मात्र काही दिवसानंतर त्यांच्या हातात बायोलॉजीचे पुस्तक पडले आणि त्यांनी गणित विषय बदलून देण्यात यावा अशी मागणी केली.

एक दिवस त्यांनी बायोलॉजीच्या क्लासमध्ये बसू देण्याची विनंती केली होती. एक दिवस बायोलॉजीच्या क्लासमध्ये बसलेल्या छवी जैन यांचे भविष्यच बदलून गेले आहे. इंजिनिअर होण्याची इच्छा असणाऱ्या छवी जैन यांनी त्यानंतर MBBS चे शिक्षण पूर्ण केले…पण त्यांच्या या योगदानाचा भारताला अभिमान आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.