सीआयडी मधले डॉक्टर साळुंखे पण खुनी शोधण्यासाठी लोकार्ड सायन्स वापरतात.

लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल माहितीय का तुम्हाला. नसेल तर तुम्ही वाचायलाच पाहिजे, की क्राईम घडत असत तेव्हा पोलीस किंवा सीआयडी एखाद्या गुन्हेगाराचा शोध कसा घेतात.

तर सायन्स मध्ये अशी एक गोष्ट असते जी यासाठी मदत करते तीच ती गोष्ट म्हणजे लोकार्ड प्रिन्सिपल. 

फॉरेन्सिक सायन्स आणि जेरियाट्रिक्सच्या जगात तुम्ही जिथे कुठं पाहाल तिथ प्रत्येक गुन्हा घडलेल्या ठिकाणी आरोपी आपला काहीतरी नामोनिशाण सोडून गेलेला असतो. म्हणजे त्याला खरं तर हे माहित नसतं. पण ते कळत ‘लोकार्ड एक्सचेंज प्रिन्सिपल’ मुळे.

गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणतीही तपास यंत्रणा किंवा पोलिस किंवा अगदी फॉरेन्सिक सायंटिस्ट  पोहचण्याआधी गुन्हेगार सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते मिटवतानाच तो व्यक्ती स्वतःच या लोकार्ड सिद्धांताला जन्म देण्याचे पहिले आणि मुख्य कारण बनतो.

तर हे लोकार्ड तत्त्व काय आहे ते जाणून घेऊया ? 

फ्रेंच शास्त्रज्ञ डॉ. एडमंड लोकार्डने शोधलेलं हे एक्सचेंज मॉडेल फॉरेन्सिक सायन्सच्या जगातील सर्वात मेन प्रिंसिपल होते. फिजिक्सचे अभ्यासक असलेल्या लोकार्ड यांनी फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास करताना बऱ्याच ठोकताळ्यांचा अभ्यास करून काही सूत्र मांडली. त्यांनी दिलेली सूत्र ही  जगातला खूप मोठा शोध होता, जो १८७७ ते १९६६ दरम्यानच्या काळात सादर करण्यात आला. त्यांनी काही ठोस उदाहरणांसह फॉरेन्सिक सायन्सच्या जगासमोर हा रिजल्ट ठेवला होता.

लोकार्ड एक्सचेंज तत्त्वानुसार,

जेव्हा जेव्हा जगातील दोन गोष्टी एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा पहिली गोष्ट आपली एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीजवळ ठेवतेच ठेवते. हे सूत्र जगातल्या प्रत्येक वस्तूला लागू होते. जर तुम्हाला लोकार्ड तत्त्व इतर आणि सोप्या शब्दात समजून घ्यायचे असेल, तर असं समजा प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी गुन्हेगार आपला एखादा पुरावा निश्चितच जागेवर सोडतो.

लोकार्ड तत्त्वानुसार, जेव्हाही गुन्ह्याची घटना घडते, तेव्हा हे तत्त्व १००% लागू होते. प्रत्येक ठिकाणी एखादा ट्रेस राहतोच. उदाहरणार्थ, जर कोणी गुन्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो त्याच्या नजरेतून कोणताही पुरावा सुटू नये म्हणून काळजी घेत असतो. पण त्याच्या शरीराचा सुगंध, फिंगर प्रिंट आणि असे सर्व पुरावे जागेवरच सोडून देतो.

त्या गुन्हेगाराला हेही कळत नाही की त्याने घटनास्थळी पोहोचलेल्या तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक सायन्स तज्ञांसाठी हजारो पुरावे सोडले आहेत. हे सर्व पुरावे डॉ. लोकार्ड यांनी त्यांच्या एक्सचेंज प्रिन्सिपलमध्ये मांडले. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर हे सर्व पुरावे आजही आरोपींना कायदेशीररित्या दोषी ठरवण्याची किल्ली आहेत.

आपल्याला बेसिक माहित असतं कि एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला तर पहिल्यांदा तिथं पोलिसांसोबत श्वान पथक पोहोचते. फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेण्याचा प्रयत्न करते. किंवा घटना घडलेल्या ठिकाणाजवळ रस्ता असल्यास, त्यावर पुरावा म्हणून उपस्थित असलेल्या वाहनांच्या चाकांच्या (टायर) खुणा. याचा अर्थ, प्रत्येक टप्प्यावर, फ्रेंच शास्त्रज्ञ डॉ. एडमंड लोकार्ड यांच्या सूत्राचा वापर केला जातो.

देशाचे वरिष्ठ न्यायवैद्यक शास्त्र तज्ञ डॉ. के. एल. शर्मा यांनी १९९७ साली दिल्लीच्या कृष्णा नगर भागात अपहरण झालेल्या १० वर्षांच्या मुलाच्या हत्येचा उलगडा डॉ. लोकार्ड यांच्या सिद्धांताचा वापर करून केला होता. खूनी हा त्या मुलाच्या घरापासून पोस्टमोर्टम हाऊसपर्यंत पोलिसांच्या सोबतच होता पण ते पोलिसांना ही माहित नव्हते.

जेव्हा त्या मारेकऱ्याने मुलाची हत्या केली तेव्हा त्याने मारेकऱ्याच्या छातीवर ओरबाडले होते. त्यामुळे मारेकऱ्याच्या छातीवर जखमा झाल्या होत्या. पोस्टमॉर्टम दरम्यान मुलाच्या हाताच्या नखांमध्ये त्याची त्वचा सापडली होती. आणि एवढ्याश्या एका स्ट्रेसवरून त्यांनी खुनाचा तपास लावला होता.

असा हा लोकार्ड फॉर्म्युला सीआयडी या मालिकेतले डॉक्टर साळुंखे पण वापरतात, म्हणून तर सीआयडी मध्ये साधा तपास सुद्धा फेल जात नाही. नाहीतर आहेत आपले खरे सीआयडीवाले, एक गुन्हा सोडवला जाईल तर शपथ. त्यांनी या साळुंखे डॉक्टरांना घेऊन जायलाच पाहिजे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.