भारतात सर्वात पहिली सुर्यांची किरणं या गावात पडतात.
कार्यकर्त्यांनो तुम्हाला ठावं हाय का? भारतातील कोणत्या गावात पहिल्यांदा सुर्यांची किरणं पडत्यात ते. कसं माहित असणार तुम्हास्नी. कारण कासराभर सुर्य वर येवेस्तोवर तुम्ही गोधडीच्या बाहेर पडत नाही. पडले तरी मोबाईलमधी डोकं घालून असतातच की.
पण काळजी करायचं काय भी कारण नाही, आम्ही तुमच्या रिकाम्या टकुऱ्यात ज्ञानाची भर घालू…
भारतातील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओेळखल्या जाणाऱ्या अरूणाचलप्रदेश राज्यातील दांग या छोट्याशा गावात भारतातील सुर्याची किरण पडतात. मात्र त्या अगोदर तुम्ही सेव्हन सिस्टर्स काय आहे हे समजून घ्या.
पुर्वोत्तर भारतातील जे सात छोटे छोटे राज्य आहेत ना, त्यांना सेव्हन सिस्टर्स म्हणतात. त्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपुर, मिझोराम, नागालैंड आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो. (MPSC वाल्यांना 1 गुण) मात्र या सातही राज्यातील संस्कृती आणि परंपरा अगदी वेगळ्या आहेत. मात्र सामाजिक, आर्थिक, आणि राजकीय दृष्ट्या हे एकच आहेत.
आता मुळ मु्द्द्यावर येवूया. याच राज्यातील अरूणाचल प्रदेशमधील दांग या गावी सुर्याची पहिली किरणं पडतात. अरूणाचलमधून वाहणारी ब्रम्हपुत्रा नदीची सहाय्यक लोहित नदी आणि सती नदीच्या संगमावर हे गाव वसलेलं आहे आणि जिथं भारताच्या सिमा चिन आणि म्यानमार या दोन्ही देशाला मिळत्यात.
दांग या गावची लोकसंख्या फक्त ३५ ते ४० आहे. म्हणजे तीन ते चार कुटुंब. मात्र समुद्रसपाटीपासून ४०७० उंचावर असं हे टुमदार गांव आहे. आणि याच गावात पहाटे ४ वाजता सुर्योदय होतो. म्हणजे ४ वाजता इकडं उजाडतं. लोकं उठत्यात कामाला भी लागतात.
पण कार्यकर्त्यांनो १९९९ ला पहिल्यांदा समजलं की भारतातील सुर्यांची किरणं या गावामध्ये पडतात म्हणून त्यांच्य़ा अगोदर अंदमानमधील कटचाल टापूवर पडतात असं समजलं जायचं.
मात्र, १९९९ पासून या गावाला नवी ओळख मिळाली आणि देश- विदेशातील लोकांचे थवेच थवे इथं सुर्यांची पहिली पडणारी किरण पाहायला यायला लागली.तुम्हाला जर हे पाहायला जायचं असेल तर फिकीर करायची नाही. आम्ही तुम्हाला कसं जायचं दावतो.
तुम्ही अरूणाचलप्रदेशात गेलात की तिथून वलोंगला जायचं. वलोंगच्या जमिनीवर १९६२ साली भारत आणि चिनचं युद्ध झालेलं. याच वलोंगवरून जवळपास ९० मिनीटांची ट्रेंकीग करत गेलात की तुम्ही दांग या ठिकाणी पोहचाल.
हे ही वाचा.
- या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा गाढवांचा बाजार भरतो..
- प्रत्येक घरातील एक माणूस देशासाठी शहिद : महाराष्ट्रात आहे शहिदांच गाव.
- स्वत:ची ग्रामपंचायत नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या गावात भरतं, एक दिवसाच साहित्य संमेलन
ए भिडू, स्वतःला काय लय बिरबलाची औलाद समझतोस कारे तू ?
म्हणे काय तर तुमच्या रिकाम्या टकुऱ्यात ज्ञानाची भर घालू ?
जरा सभ्य भाषेचा पण वापर करतं जा की