प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय, होवू शकतात हे आजार…

हल्ली सर्रास प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी होत असतो. बाजारात मिळणाऱ्या मिनरल वॉटरच्या बाटल्या असो की, शाळा, ऑफिस अशा ठिकाणी बाहेर जाताना वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या वॉटरबॅग असो. प्रत्येकजण प्लॅस्टिकच्या बाटल्यामधलं पाणी सुरक्षित असते याच विचाराणे पाणी पितो. 

पण तुम्हाला खरच वाटतं का, या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमुळे तुम्हाला काहीच होत नाही म्हणून ? 

भारतात जे प्लॅस्टिकच्या बाटल्या बनवता सर्वात घातक पदार्थ वापरण्यात येतो त्याच नाव असतं बाइफेनॉल ए.  बाईफोनॉल ए अर्थात BPA चा वापर हा भारतातल्या प्लॅस्टिक उद्योगामध्ये पुर्णपणे बंद करण्यात आलेला नाही. सरकार खूपदा या पदार्थाचा वापर करु नये अस सांगत असलं तरी याशिवाय प्लॅस्टिक बनवणं कठिण असल्यामुळे सर्रास BPA चा वापर प्लॅस्टिक  निर्माण करण्यात  होत असतो. या पदार्थांमुळे कोणते आजार होतात ते आम्ही सांगत आहोत. 

१) कॅन्सर.

संशोधनानुसार जेव्हा प्लॅस्टिकची बाटली गरम ठिकाणी अथवा उन्हात ठेवली जाते तेव्हा त्या उष्णतेमुळे प्लॅस्टिकमधून डायऑक्सिन स्त्राव बाहेर पडण्यास सुरवात होते.  हे डाय ऑक्सिन आपल्या शरिरात विरघळल्यानंतर शरिरातील पेशींवर आघात करत. यामुळे महिलामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. 

२) मेंदूवर परिणाम करत. 

बाटलीतील पाणी पिल्यामुळे BPA मुळे मेंदूच फंन्क्शन कमी होतं. मेंदूसोबत याचा परिणाम नर्वस सिसिस्टी वर होतो. 

३) प्रजनन क्षमतेवर परिणाम. 

BPA मेंदूवरच नाही, तर प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम करते. महिलांसोबत पुरूषांना देखील याचा त्रास होवू शकतो. किडनीचा त्रास, मुतखड्याचा त्रास असे त्रास होवून ते पुढच्या पातळ्यांवर जावू शकतात. 

४) ह्रदय आणि गर्भवती महिलांना त्रास. 

गर्भवती महिलांनी बॉटलीतून पाणी पिल्यास मुलाच्या विकासावर परिणाम होवू शकतो. त्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करावा असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. 

Leave A Reply

Your email address will not be published.