आत्तातरी धूममध्ये कुठल्या गाड्या होत्या ते समजून घ्या !

२७ ऑगस्ट २००४ रोजी धूम रिलीज झाला होता. एवढी वर्ष झाली मात्र अजूनही कानात धूम ची गाडीच एक्सीलेटर वाढवल्यासारखी वाटणारी धून घुमत राहते. यशराज सारख्या बड्या बॅनर ने १६ वर्षानंतर एॅक्शन मुव्ही बनवला होता. यशराजची त्या काळातली ओळख स्विझर्लंडच्या बागा, शिफोन साडी मधली नायिका, मोठ्या हवेल्यांमध्ये राहणऱ्या कुटुंबाची कथा अशी होती. मात्र धूम मध्ये त्यांनी वेगळेपण आणला. एॅक्शन चित्रपट असून सुद्धा यशराज  बॅनरचा चकचकितपणा मुव्हीत होता.
त्यावर्षी हा पिक्चर तुफान गाजला. चोर पोलिसाची टिपिकल कथा होती. दोन तीन इंग्लिश पिक्चर च्या स्टोऱ्या एकत्र करून हा पिक्चर बनवलां होता पण निर्मितीचा दर्जा सुद्धा जागतिक सिनेमाशी नात सांगणारा होता. भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक ट्रेंड सेट करायचा मान धूमला जातो. जॉन अब्राहमच्या हेअर स्टाईलपासून ते गाड्यापर्यंत. त्यानंतर बऱ्याच वर्षापर्यंत स्पोर्ट्स बाईकला धूम गाडी म्हणायची पद्धत पडली होती.
जॉनचे लांब केस पाहून अनेकांनी लांब केस वाढवले. डोळ्यावर काळा गॉगल घालून आपल्या स्प्लेंडरला स्पोर्ट्स बाईक समजून पळवणारे खूप जण होते. खुद्द महेंद्रसिंग धोनी ने देखील त्याच्या एकेकाळच्या लांब केसांचे आणि स्पोर्ट्स बाईक प्रेमाचे रहस्य धूम आहे हे मान्य केले. या चित्रपटाचे खरे हिरो अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा होते. पण व्हिलन असून जॉन अब्राहम भाव खाऊन गेला. आणि त्याच्या पेक्षा ही जास्त चर्चा त्याच्या गाडीची झाली.
धूम नंतर वाढलेल्या भारतातल्या स्पोर्ट्स बाईकच्या खपावर स्वतंत्र संशोधन करता येईल.
आता पर्यंत धूम चे तीन भाग येऊन गेले.त्या तिन्ही भागात एकापेक्षा एक अत्याधुनिक स्पोर्ट्स बाईक वापरण्यात आल्या. त्या गाड्यांची हि माहिती खास धुम डे निमित्ताने.

१.सुझुकी हायाबुसा GSX-1300R.

धूम मधली सगळ्यात लाडकी गाडी. बँक लुटून स्पोर्ट्स बाईक वर धूम ठोकणाऱ्या टोळीचा प्रमुख कबीरकडे ही बाईक असते. या गाडीचे इंजिन तब्बल १२९९ सीसी होते. ३०० किमी प्रती तास वेग पकडेल इतकी याची क्षमता होती. चौदा वर्षानंतरही या हायाबुसाची क्रेझ कमी झाली नाही आहे .हिची भारतातली लोकप्रीयता पाहून सुझुकी ने २०१६ पासून भारतात याची निर्मिती सुरु केली आहे. आज ही गाडी साधारण १८ लाखत मिळू शकते.

२.सुझुकी BANDIT.

बाईक मेकानिक असणारा उदय चोप्रा कडे चित्रपटात ही गाडी असते. आता व्हिलन ला पकडायचं म्हटल तर गाडी पण तशीच तगडी पाहिजे. या गाडीने खरोखर हयाबुसाला टक्कर दिली. या गाडीचे सगळे फिचर थोड्या फार फरकाने हायाबुसा प्रमाणेच होते.

३.सुझुकी GSX-R1000.

धुमच्या दुसऱ्या भागात जॉन च्या जागी ह्रितिक व्हिलन होता आणि त्याच्याकडे ही बाईक होती. त्याला पकडणाऱ्या उदय चोप्राकडे सुद्धा हेच मॉडेल होते. २८६ किमी प्रती तास असा वाऱ्याशी स्पर्धा करणारा याचा वेग होता. स्टायलिश ह्रितिकला ही गाडी शोभून दिसली. या गाडीचे इंजिन होते १००० सीसी.

४. सुझुकी  GSR-600.

पहिल्या धूम मध्ये उदय चोराच्या गाडीवर पाठीमागे बसणारा अभिषेक बच्चन चं इन्स्पेक्टर जय दीक्षित दुसऱ्या धूम मध्ये ही गाडी चालवताना दिसला. ६०० सीसी इंजिन असलेली ही बाईक तुलनेने हलकी होती.याच पिक्चर मध्ये ऐश्वर्यानेसुद्धा ही गाडी चालवली होती.

५.BMW K1300R.

तिसरा धूम हा यशराज साठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. त्यामुळे त्यांनी आता पर्यंत वापरलेल्या सुझुकी ऐवजी BMW ब्रॅण्‍डच्या बाईक्स वापरायच निर्णय घेतला. १३०० सीसी इंजिन, याच सेगमेंट मधल्या सुझुकी B-KING ला हरवून जगातली सगळ्यात वेगवान बाईक बनण्यचा मान या बाईकला मिळाला होता. छोट्या चणीचा असलेला आमीर खान असून सुद्धा ही गाडी खूप स्टायलिश दिसली. अमीर खानने अनेक अवघड स्टंट दृश्ये या गाडीवर दिली.

६. BMW S1000RR.

अवघ्या २.६ सेकंदात १०० किमी प्रती तासाचा वेग पकडणारी ही गाडी आजही जगभर लोकप्रिय आहे .
BMW च्या स्टँडर्ड ला शोभेल अशी ही देखणी बाईक आहे. या पिक्चर मध्ये ही गाडी चालवण्याचं भाग्य उदय चोप्राला मिळाले. या गाडीची भारतातली किंमत २७ लाख आहे.

७.बजाज ऑटो रिक्षा.

आमीर खान आणि उदय चोप्रा ज्यावेळी BMW च्या बाईक चालवत होते तेव्हा अभिषेक बच्चन या रिक्षासोबत स्टंट करावे लागले. इंजिन आहे २०० सीसी आणि जास्तीजास्त ६५ किमी वेग पकडण्याची क्षमता. भारतीय लोकांचं अस्सल साधन धूम मध्ये वापरल्यामुळे धूम पिक्चर खऱ्या अर्थाने समाजवादी होता !!

Leave A Reply

Your email address will not be published.