टिव्हीवर दिसलेली पहिली व्यक्ती..

टिव्हीवर दिसलेली पहिली व्यक्ती कोण ?

खरतर या प्रश्नाची वेगवेगळी उत्तर मिळून जातील. म्हणजे जागतिक प्रसारमाध्यमातून नेहरू, गांधी टिव्हीवर झळकले देखील असतील. जगाच्या पाठीवर टिव्ही पोहचला असल्याने कुठल्या देशामध्ये पहिला कोण दिसलं हे सांगण तस अवघडच काम.

पण भारतीय दूरचित्रवाणीवर सर्वात पहिला कोण दिसलं होतं ? याच उत्तर मिळणं सोप्प आहे. भारतीय टिव्हीवर सर्वात पहिला झळकणारी व्यक्ती म्हणून प्रतिमा पुरी यांच नाव घेतलं जातं.

खरतर पहिली टिव्हीवर दिसलेली व्यक्ती याहून देखील अधिक या घटनेचं महत्व आहे. त्याच कारण अस की आज ज्या चोवीस तास न्यूज चॅनेलवरती महिला अॅंकर दिसतात, त्याच महिलांसाठी त्यांनी न्यूज अॅंकरींगचे दरवाजे खुले केले होते.

१५ सप्टेंबर १९५९ ला भारतात टेलिव्हिजनची सुरवात झाली होती. भारतात दूरचित्रवाणीची सुरवात करण्यात आली तेव्हा दूरदर्शन हा एकमेव चॅनल होता. दूरदर्शन तेव्हा ऑल इंडिया रेडिओच्या नियंत्रणाखाली काम करत असे.

१५ ऑगस्ट १९६५ साली दिल्लीच्या आकाशवाणी भवनातून दररोज पाच मिनटांसाठी बातम्या दाखवण्यास सुरवात करण्यात आली. पहिल्या वहिल्या बातम्या सांगण्याच अर्थात न्यूज अॅकरच काम केल होतं प्रतिमा पूरी यांनी. पुढे त्याच बातम्या देखील देत राहिल्या आणि जागतिक किर्तीच्या लोकांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे आली.

खालील फोटोमध्ये त्या पहिला अंतराळवीर युरी गगारीन यांची मुलाखत घेताना दिसत आहेत. 

Screen Shot 2018 11 23 at 1.24.46 PM
दूरदर्शन.

कोण होत्या प्रतिमा पुरी ?

प्रतिमा पुरी यांचा जन्म हिमाचल प्रदेशातला. शिमला येथे असणाऱ्या ऑल इंडिया रेडिओ मध्ये त्या कामासाठी रुजू झाल्या. पुढे त्यांची बदली दिल्ली येथे झाली. देशातील पहिलं वहिलं बातमी देण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं. १५ ऑगस्ट १९६५ रोजी ५ मिनटांसाठी या बातम्या देण्यात आल्या व ते काम प्रतिमा पुरी यांनी पार पाडलं होतं.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.