कोरोनाच्या डबल म्युटंटनंतर आता काय आहे हा ट्रिपल  म्युटंट ?

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा  मोठ्या प्रमाणात  वाढत चालला आहेत. यामागे कोरोनाचा डबल म्युटंट असल्याचं मानलं जातंय. अजून शास्त्रज्ञ त्याला नीट समजू शकले नव्हते तर ट्रिपल  म्युटंटने डोक वर काढलं आहे.  कोरोना विषाणूवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे कि,  काही नमुन्यांमध्ये ट्रिपल  म्युटंट आढळला आहे. यामुळे अर्थातच डोकेदुखी वाढणार आहे.

सरकारला आधीच मिळालीये ट्रिपल म्युटंटची माहिती

मिळालेल्या माहितीनुसार  आरोग्य मंत्रालयाला गेल्या आठवड्यातच सांगितले गेले होते की,  डबल म्युटंट असणाऱ्या विषाणूमध्ये  देखील बदल शक्य आहे. अश्या परिस्थितीत हे डबल नव्हे तर ट्रिपल म्युटंट बनले आहे. विषाणूमध्ये तीन वेगवेगळे व्हेरीयंट मिळाले आहेत.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांमधून तीन प्रकारचे नमुने आले. या नमुन्यात २ प्रकारच्या नमुन्यांत  स्पाइक प्रोटीनमध्ये दोन  मोठे म्यूटेशन किंवा बदल पाहायला मिळाले आहेत. तर  तिसर्‍या नमुन्यात स्पाइक प्रोटीनच्या बाहेर बदल पाहिले गेले आहेत.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे बदल देखील महत्वाचे आहेत. हे नवीन म्यूटेशन महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील १७ नमुन्यांमध्ये आढळले आहे. पश्चिम बंगाल अशा म्यूटेशनचे हॉट स्पॉट बनत आहे. हा तिसरा आणि नवीन म्युटंट मानवी शरीराच्या प्रतिकारक क्षमतेला चकवा देण्यासाठी आणखी सक्षम असू शकेल.

नेमकं काय आहे डबल आणि ट्रिपल म्युटंट?

वेळेप्रमाणे व्हायरसमध्येही बदल होणे निश्चित आहे. भारतातील डबल व्हेरीयंट ज्याला 1.617  नाव देण्यात आले होते. त्यात SARS-CoV-2 चे दोन म्युटंट आहे.  म्हणजेच SARS-CoV-2 चा जो व्हायरस होता, त्यात दोन मोठे बदल आढळले आहे. E484Q आणि L452R. E484Q अशी त्यांची नाव असून ते  ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरीयंटप्रमाणे आहे. 

या प्रकारच्या L452R मुळेचं  अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हा विषाणू वेगाने पसरला होता.

हे दोन्ही बदल कोरोना विषाणूच्या इतर प्रकारांमध्येही आढळले आहेत. परंतु भारतात प्रथमच असे घडले आहे की दोन्ही बदल एकाच प्रकारात घडले आहेत. अशा प्रकारे त्याला डबल म्युटंट्सवाला  कोरोना व्हायरस म्हटले गेले.

आता तिसरा व्हेरीयंट आढळून आला आहे.  अर्थात नमुन्यांत  E484Q आणि L452R व्यतिरिक्त काहीतरी दुसरे देखील पाहिले गेले आहे. आतापर्यंत फारच कमी नमुने सापडले असल्याने त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळाली नाही. सुरुवातीच्या माहितीनुसार, हा कोरोना विषाणू अधिक वेगाने पसरू शकतो.

नमुना जितक्या लवकर तपासला जाईल तितक्या लवकर ट्रिपल म्युटंटची माहिती मिळेल, तितक्या लवकर याच्याशी लढण्याची  रणनीती तयार केली जाऊ शकते.

आता जीनोम सिक्वेन्सिंगची स्थिती देखील जाणून घ्या

जीनोम सिक्वेंन्सिंगद्वारे मिळालेली  माहिती केवळ व्हायरस नियंत्रित करण्याच्या उपायांमध्येच मदत करत नाही तर त्याद्वारे औषधे आणि लस देखील विकसित केल्या आहेत. चीन आणि अमेरिकेसह काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीनोम सिक्वेंन्सिंगद्वारेमुळे  केवळ लस विक्रमी कालावधीत विकसित केली जाऊ शकत होती.

माहितीनुसार, भारतातील विषाणूच्या जीनोम सिक्वेन्सिंगची गती सुरुवातीपासूनच कमी होत होती. नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021 दरम्यान हे आणखी खाली आले. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोविडच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने होणारी घट आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि पैशांचा अभाव. आता तज्ज्ञांचा अंदाज आहे की यावेळी सरकारला आधीपासूनच माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे ट्रिपल  म्युटंटवर लवकरच सिक्वेन्सिंगचे काम सुरू होईल.

यावर्षी जानेवारीमध्ये सरकारने 10 प्रयोगशाळांच्या नेटवर्कद्वारे  जीनोम सिक्वेंनिंगला वेग देण्यासाठी भारतीय SARS-CoV2  जेनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) ची स्थापना केली.

सरकारी प्रयोगशाळेशी संबंधित विषाणूशास्त्रज्ञ म्हणतात कि, जीनोम सिक्वेंन्समध्ये वेळेचा बराच रोल असतो. सिक्वेन्सींगचे काम जितक्या लवकर होईल तितक्या लवकर व्हायरसवर मात करण्याचे मार्ग शोधले जाऊ शकतात. व्हायरसच्या पुढे राहण्याचा हा एक मार्ग आहे. पण आपल्या देशात असे घडत नाही. आम्ही व्हायरसपेक्षा  मागे राहतो. आम्ही काय घडतय यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहोत.

सिक्वेन्सींगमध्ये काय आहे समस्या ?

माहितीनुसार,  10 प्रयोगशाळांच्या मिश्रित कन्सोर्टियमला ​​सुरुवातीला 6 महिन्यांसाठी 115 कोटी रुपये दिले गेले. सर्व पैसे केंद्र सरकारने देण्यात आले. याशिवाय कोणतेही अतिरिक्त पैसे दिले गेले नाहीत, डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजीला  स्वत: च्या पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. 150 कोटी रुपयांपैकी 80 कोटींचा पहिला हप्ता 31 मार्च रोजी जाहीर करण्यात आला जेव्हा नवीन आर्थिक वर्ष आले होते.

यावेळी, हैदराबादच्या सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र केंद्र आणि दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँन्ड इंटिग्रेटेड बायोलॉजीने स्वतःच्या स्त्रोतांमधून जीनोम सिक्वेंसींगचे काम चालू ठेवले.

दरम्यान,  फेब्रुवारी महिन्यात 10 लॅब कन्सोर्टियम इन्सोकॉगची स्थापना झाल्यानंतर, देशभरात 13,000 सीक्वेंस डेव्हलप  केली गेली. मात्र, ते अद्याप अपुरी आहेत. एकूण येणाऱ्या  प्रकरणांमधील जीनोम  सीक्वेंसिंग 5 टक्के करणे हे इन्साकोचे उद्दीष्ट आहे. दररोज सुमारे अडीच लाख प्रकरणे येत असताना हे एक मोठे ध्येय आहे. 5 टक्के उद्दीष्टानुसार  दररोज 12,500 नमुने सीक्वेंसिंगसाठी  जाणे आवश्यक आहे. पण केवळ 1 टक्के जात आहेत. दरम्यान, सीक्वेसिंगवरूनच स्पष्ट होते की,  ट्रिपल  म्युटंट आढळून आला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.