अपयशामध्ये डॉ. अब्दुल कलामांनी जे केलं ते डिप्रेशनच्या आहारी गेलेल्या प्रत्येक तरुणाने वाचायला हवं.

आज ध्येय वेडे होऊन फिरणारे अनेक तरुण आपल्या अवतीभवती आहेत. या पैकी अनेक तरुण ध्येय न पूर्ण होण्याच्या दुखात कधी स्वतःला संपवतात तर कधी ते चुकीच्या मार्गाला लागतात. पालकांना देखील सगळ्यात जास्त आनंद जसा मुलाच्या यशाचा असतो त्यापेक्षा अधिक भीती असते ती म्हणजे त्याच्या अपयशाची.

अशा वेळी मुख्यता एखादा चांगला गुरु किंवा मित्र किंवा कुणीतरी “लढ” म्हणारा भेटला तर आपली नौका नदीकाठावर जाते नाहीतर ती कुठे बुडाली हेच कळत नाही.

असाच हा एका तरुण, बुद्धीने प्रचंड हुशार आणि आपल्या देशाच्या सुवर्ण पानांमध्ये ज्या व्यक्तीचे नाव घेतल जाते  अशा एका तरुणाची हि कथा आहे. या तरुणाचे नाव आपल्या देशातील प्रत्येकाला माहित आहे ते त्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशांसाठी.

डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम

पण या आपल्या देशाच्या मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यात देखील अपयश आले होते. देशाला महासत्ता होण्यचे स्वप्न दाखवणाऱ्या ह्या माणसाचे स्वप्न जेव्हा पूर्ण झाले नाही तेव्हा त्यांनी काय केले, त्याचीच हि प्रेरणादायी कथा.    

डॉ. अब्दुल कलाम तेव्हा स्वतःच्या हलकीच्या परिस्थितीवर मात करत रोज नवीन आव्हाने झेलत होते. स्वप्नांचे उंच मनोरे बांधत होते. या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचा भारताच्या उत्तर भागातील प्रवास सुरु झाला.

रेल्वेच्या खिडकीतून दिसणारी वेगवेगळ्या वेशातील माणस त्यांची भाषा राहण्याची पद्धत सगळ्याच गोष्टी ते निरखून पाहत होते. आजूबाजूला असणाऱ्या नद्या, उपनद्या, त्यांना लागून असणारी भात शेती आणि त्या निर्व शांततेत काम करणारी माणस ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मोहित करत होत्या. एका नवीन जगात आपण अवतरल्याची भावना त्यांच्या ठायी होती. हा प्रवास करत त्यांनी अखेर दिल्ली गाठली.

दिल्लीत ते आले होते डी.टी.डी. अॅंड पी (एअर) हि परीक्षा देण्यासाठी. त्यानंतर त्यांना त्यांच्या स्वप्नाला गाठायचं होत म्हणून त्यांनी पुढे डेहराडूनचा प्रवास चालू केला, या प्रवासात नवीन प्रदेशासोबतच ते एका नवीन आयुष्याची आखणी देखील करत होते.

तिथे ते हवाई दलाच्या निवड समिती पुढे मुलाखत देणार होते. ह्या मुलखती दरम्यान त्यांच्या लक्षात आले कि इथे ज्ञान, बुद्धिमत्ता या पेक्षा अधिक महत्व आहे ते व्यक्तीमत्वास. मुलाखतीच्या पूर्वी ते उत्तेजित आणि उत्सुक होते पण तितकेच घाबरले देखील होते, कारण शेवटी हे त्यानी ठरवलेले आयुष्याच अंतिम स्वप्न होते या पलीकडचे किंवा अलीकडच्या विश्वाची कल्पना त्यांनी केलीच नव्हती.

या मुलाखतीनंतर देशातील २५ तरुणांपैकी फक्त ८ तरुणांचे स्वप्न साकार होणार होते. अखेर निकाल लागला आणि डॉ. अब्दुल कलाम कळाले कि त्यांची हवाई दलात जाण्याची संधी हुकली. प्रचंड खिन्न, तळपायाची जमीन सरकावी असा आघातच त्यांच्यावर झाला होता.

आपल्या स्वप्नाचा झालेला असा अंत त्यांना सहाजिकच सहन न होणारा होता.

त्या दुःखात ते ऋषिकेशला पोहचले, गंगेच्या पात्रात त्यांनी अंघोळ केली. जसे आपण सगळेच, निराशेचे उत्तर एक तर देवाला विचारतो किंवा एखाद्या साधुसंतास भेटतो तसेच त्यांनी देखील समोर दिसणाऱ्या शिवानंद स्वामींच्या मठात जाण्याचे ठरवले. मठात जातात आजूबाजूला ध्यान लावून बसलेले आणि ईश्वर भक्तीत हरवलेले अनेक साधू ते पाहत होते.

पांढरे स्वच्छ धोतर, खडावा घातलेल्या शिवानंद स्वामींच्या जवळ ते पोहचले. त्यांच्याकडे पाहताच साक्षात गौतम बुद्ध अवतरल्याची भावना त्यांच्या मनात आली. त्यांच्या तेजस्वी मुद्रेने त्यांचे अर्धे नैराश्य कमी झाले होते. पण डॉ. अब्दुल कलाम दुखी कष्टी असल्याचे त्यांनी ओळखले आणि त्यांनीच दुखाचे कारण विचारले. भावना इतक्या तीव्र होत्या कि डॉ.कलामांनी आपले सगळे दुख, नैराश्य आणि अपयश स्वामींना सांगितले.

एका तरुणाने साधूला सांगितलेलं हे त्याचे दुख एका धर्मा पलीकडे असणाऱ्या गुरु-शिष्याच्या नात्याचे अप्रतिम उदाहरण आहे. कारण त्यांनतर स्वामी शिवानंदानी जे सांगितले त्या सांगण्याने भारताला इतिहास घडवणारी एक बुद्धिमान व्यक्ती जशी मिळाली तसेच डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम नैराश्येच्या त्या वाटेवर गुरु देखील मिळाला.

स्वामी शिवानंद म्हणाले,

“अपयश विसरून जा, तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेमण्यासाठी, अपयश यावे असे नियतीनेच योजलेले आहे. तुझ्या अस्तित्वाचा खऱ्या हेतूचा तूच शोध घे. अंतर्मनात डोकावून पहा, त्याज्याशी एकरूप हो, देवाच्या इच्छेला स्वाधीन हो”

हे शब्द डॉ.कलाम यांना मनापासून भावले. तिथून ते दिल्लीला परतले तिथल्या मुलाखतीचा निकाल पाहण्यासाठी. तिथे त्यांच्या हातात थेट नेमणूकपत्रच देण्यात आले.

त्यांनी ज्यांना गुरु मानले अश्या स्वामी शिवानंदांनी सांगितल्या प्रमाणे, हीच नियती असेल तर ती स्वीकारायला हवी असा विचार करून शांत मानाने डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून २५० रुपयांच्या मूळ पगारावर रुजू झाले.

आपल्या गुरूच्या शब्दावर निष्ठा ठेवून काम करणारे डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम नंतर आपल्या देशाचे मिसाईल आणि आपल्या देशाला महासत्ता होण्यचे स्वप्न दाखवणारे राष्ट्रपती झाले आणि त्यांचे नाव इतिहासा बरोबरच आपल्या प्रत्येकाच्या मनात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Amol thorat says

    Truly kalam sahab is the inspiration for upcoming generations. every depressed person should watch this article. and should do what abdul kalam did.
    Nice article.i read it in one go.

Leave A Reply

Your email address will not be published.