राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतलं होत

फेसबुक आणि व्हॉटस्अप वरुन सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टचा आशय असा आहे की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यासाठी स्वत:ला चौदा दिवसांसाठी कोंडून घेतले होते.

नेमकी पोस्ट कोठून व्हायरल झाली याचा शोध घेतला असता आमच्या हाती पोस्टच्या खाली वेगवेगळ्या लेखकांची नावे आली. अनेकांची स्वत:चा लेख म्हणून हा लेख खपवून इतकी उत्तम माहिती समोर आणणाऱ्या व्यक्तींवर अन्यायच केला म्हणावे लागले.

असो, तर मुळ मुद्दा आहे ही गोष्ट खरी आहे का? 

तर हो, हि गोष्ट खरी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनी स्वत:ला चौदा दिवसांसाठी घरात कोंडून घेतलं होतं. हा प्रसंग डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड दूसरा या पुस्तकात चांगदेव खैरमोडे यांनी सांगितला आहे.

यामध्ये सांगण्यात आल आहे की, 

हिंदूस्तानाला जादा राजकीय हक्क देण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी १९२७ साली सायमन कमिशन नियुक्त करण्यात आला. या कमिशनमध्ये एकाही भारतीय व्यक्तीची नेमणूक न झाल्याने या कमिशनला देशभरातून विरोध करण्यात आला. त्यामुळे प्रांतिक समिती नेमण्यात आली. १९२८ साली उमेदवारांची निवडणुक झाली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भास्करराव जाधव यांचा समावेश करण्यात आला होता.

देशाच्या राजकीय हक्कांसाठी आपण भरीव कार्य केले पाहीजे, याची जाणीव त्यांना होती. जगभरातील संविधानिक व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा या विचारातून जगभरातील राज्यघटनांचा सखोल अभ्यास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:ला १४ दिवस कोंडून घेतले होते. 

राज्यघटनेचा प्रश्न हिंदी राजकारणात प्रामुख्याने चर्चेला येणार आहे त्यावेळी आपण शांत बसणे ही गोष्ट योग्य ठरणार नाही याची जाणीव बाबासाहेबांना होती व त्यानुसार ५ ऑगस्ट १९२८ रोजी त्यांची प्रांतिक समितीवर निवड होताच त्यांनी दूसऱ्याच दिवशी आपल्या मित्रांकडून ४०० रुपये उधार घेतले. दोन दिवसात त्यांनी प्रा. पी.ए. वाडिया यांच्यासोबत तारपोरवाला बुकसेलर्स गाठले. व तिथे जगभरातील राज्यघटनांचे अभ्यासग्रॅंथ विकत घेण्यात आले.

९ ऑगस्ट पासून डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले व राज्यघटनांचा अभ्यास करण्यास सुरवात केली. अशा वेळी काही लोक यायचे व दरवाजा ठोठवायचे. अशा वेळी बाबासाहेबांची एकाग्रता तुटत असे.

यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी मडके बुवांना सांगितलं की, दरवाजाला बाहेरून कुलूप लावा. व इराण्याच्या हॉटेलातून मला सकाळ, दूपार, संध्याकाळ चहा देण्याची व्यवस्था करा. जेवणाची सोय देखील खिडकीतूनच करण्यात आली. अशा प्रकारे १४ दिवस डॉ. बाबासाहेबांनी स्वत:ला कोंडून घेवून राज्यघटनेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. 

या एकनिष्ठतेचं फळ म्हणजेच गेली ७० वर्ष अबाधित असणारी आपली राज्यघटना. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Cameraman Gupte says

    Few people know about the actual contribution of Dr.Ambedkar to the Constitution.One big contribution he made was in the Preamble.As the Chairman of the Draft Committee,the Preamble
    that was put up to him stated that India will be a Sovereign Republic. He inserted the word ” Democratic” .His reasoning was that a Soverein Republc can be headed by a Dictator also.Thus, the Preamble of the Constitution on 26th January,1950 made India”A Sovereign Democratic Repiblic”.

Leave A Reply

Your email address will not be published.