मराठ्यात जन्मलो म्हणून आंबेडकरांना मनमोकळं कवटाळता येत नाही, पण आज ठरवलय..
सकाळी कामावर जाताना चौकात बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे पुतळे शेजारी शेजारी दिसले. काही वर्षांपासून ही प्रथा सुरु झाली आहे. पूर्वी असं काही पाहिलं की अभिमानाने उर वैगरे भरून यायचा.
शिवजयंतीला ही बाबासाहेबांचा पुतळा शेजारी असतो. शिवजयंती साजरी करणारे मित्र बाबासाहेबांची जयंती तितक्याच उत्साहाने करतात ह्याचं फार अप्रूप वाटायचं.
आता नाही वाटत. दोघं साइड चा म्यूच्यूअल एग्रीमेंट आहे हा. आता समजून चुकलं.
शाळेत असल्यापासून एखाद्या महापुरुषाचा आदर्श समोर ठेऊन सगळेच पुढे जात होते. पहिल्यापासूनच मी जरा घुळमुळ्या असल्याने राजे महाराजे म्हणजे माझ्या आवाक्याबाहेरचे वाटायचे. तेव्हा फक्त पुस्तकी कीडा होतो. एका मराठीच्या धड्यात वाचलं की बाबासाहेब कसे एका ब्रेड आणि गंधाला लावतात तेवढ्या जॅम वर सलग 21 तास अभ्यास करायचे.
तेव्हापासून त्यांच्याशी नाळ जोडली गेली. तेव्हा तर फक्त रडून कोसळायचच बाकी होत. त्यांचं छोटेखानी चरित्र मिळवलं आणि वाचून काढलं. तेव्हापासून बाबासाहेबांचं बोट धरलं ते आजपर्यंत !
हा बोट सोडवायचा प्रयत्न मात्र सर्वांकडून झाला. दोन्ही महापुरुष शेजारी बसवून जयंत्या साजऱ्या करणाऱ्या मित्रांसोबत कधी गप्पा मारायला बसलो की सगळ्यांचे खरे रंग समोर यायचे. चार चौघात कुणी ‘त्या’ जातीचा नाही ना याची खात्री करून जोक मारले जायचे. बाबासाहेब 21 तास सलग अभ्यास करायचे असं सरांनी सांगितल्यावर वर्गात मित्रांमध्ये पिकलेली खसखस आठवते. शालीमारच्या बाबासाहेब आणि इंदिरा गांधी च्या पुतळ्यावरुन मित्रांनी मारलेले जोक आठवतात.
“उद्या तुमचा सन ए भौ. जय भीम” असं म्हणून सवर्णांनी सवर्णांना डिचवत मारलेले टोमणे आठवतात.
एकदा बाहेरून येताना मी बुद्धाची मूर्ती घरी आणली. शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेबांचा मोठेपणा सांगणाऱ्या आईने मात्र लोक काय म्हणतील या धाकाने ती घरात ठेवू दिली नाही. एका मित्राचं जातीबाहेर लग्न लावून दिलं म्हणून आई म्हणायची,
“तू सुद्धा बौद्धाच्या घरात जन्माला यायला पाहिजे होतं. मी मनात म्हणतो, मलाही तेच वाटतं !
आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा तीच परिस्थिती आहे.
सकाळी सकाळी व्हॉट्सऍप ग्रुप वर आलेले जय भीम आठवले. त्याला इतरांचे रिप्लाय पण तसेच मुर्दाड. माझ्यासारख्या कित्येकांना हा त्रास होत असेल माहीत नाही. फक्त मराठ्यात जन्मलो म्हणून आंबेडकरांना मनमोकळं कवटाळता येत नाही. आजपासून ठरवलय मात्र.
आता आतल्या आत घुसमटणं बंद. कुणी आपल्याच भाऊबंदाने खवचटपणे जय भीम म्हणुन चिडवलं तर त्याच्या कानाखाली जाळ काढून खरा ‘जय भीम’ कसा असतो हे त्याला शिकवणार!
महापुरुष शेजारी बसवून जयंत्या करणाऱ्यानी जर कधी नंतर कुठल्या महापुरुषाबद्दल अपशब्द काढले तर जोड्याने हानणार त्याला. I mean it.
कधी कुठल्या रंगाचा झेंडा हातात घेतला नाही. ट्रिपलसिट गाडी चालवुन आज मिरवला पण नाही. डीजेच्या गोंगाटात नाचलो नाही. माझ्यापरीने हीच त्या महामानवाला आदरांजली. बाकी कायम त्यांचा बोट धरून चालतोच आहे.
जय भीम.
भिडू जितेंद्र घाटगे. 9168479073
हे ही वाच भिडू.
- त्या गर्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जमिनीवर बसून गाडगेमहाराजांच किर्तन ऐकत होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने प्रयत्न केलेले ?
- जात नाही ती जात पण एक ट्विस्ट आहे यात.
अगदी वास्तविकता मांडलात.. जय भीम
Babano , Ambedkar Marathyachyach Satyashodhak chalwalitun alel netrutwa hot, Marathyachich chalwaliye samor Ambedkarani samor chalawali.
हल्लीच्या काळात प्रत्येक पुरुषांबद्दल काहीही अभ्यास नसताना जो हुमदांडगावा केला जातो तो पहिला थांबवला पाहिजे आनि फक्त सवर्णांना दोष देण्यात काय अर्थ नाही ते इतर समाजापेक्षा त्या व्यक्तीला जास्त मानतात आणि आदर ही करतात पण फक्त जो हुमदांडगावा प्रत्येक वेळी होतो तो पहिला थंबला पाहिजे कुठलाही प्रसंग कुणाशीही जोडायचा कुठलेही श्रेय कुणाला भलत्यालाच द्यायचे हे कधी थाम्बणार आहे ते आधी थांबायला पाहिजे आणि फक्त हुर्रे करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळं सोशल मीडियावर जयंती आली की दुसऱ्या जातींना टार्गेट होईल असे स्टेटस पडत असतात त्यामुळं ही विषमता वाढत चालली आहे आणि असच चालू राहील तर वाढतच जाईल
Thank you sir ..
Jai bhim .
Great ….
सलाम तुमच्या पुरेगमी विचारला आहे मला अभिमान आहे तुमच्या मुळे दाभोलकर पानसरे सर यांचे विचार जिवंत राहतात
जय भीम भाऊ!
डाॅ.बाबासाहेब चे शिकेल तो टिकेल हे वाक्य किती महत्वाचे आहे.आज तरूण पिढीना पटले आहे.शिक्षणाशिवाय तुम्ही चांगली नोकरी/धंदा करू शकत नाही.प्रगती करायची असेल तर शिक्षण गरजेचे आहे. जय भिम
Chaan khoop chaan..real goshta mandlit sir ????????jaye bhim
Great
खूप छान लेख!!!
खूपच छान, वाचून उर भरून आला. Thanks
JAY BHIM GHADGE SAHEB KHUP CHAN LEKH
धन्यवाद 🙏
आदर वाटतो तुमचा🙏