५० वर्षांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रात सेक्शुअल एज्युकेशन सुरु करण्याचा प्रयत्न झाला होता…
मधल्या काळात शाळेमध्ये मुलांना लैंगिक शिक्षण देण्याबाबतची मोहीम देखील सुरु केली होती पण त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. कसा मिळेल, आपल्या समाजाची इच्छाशक्ती च नाहीये किं आपण लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत उघड बोलावं ! असो हा प्रयत्न आत्ताही फेल ठरतो पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कि, भारतात त्यातल्या त्यात आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात १९६७ च्या काळापूर्वीच लैंगिक शिक्षण आणण्याचा प्रयत्न झाला होता.
हो तब्बल ५० वर्षांपूर्वीच आपल्या महाराष्ट्रात सेक्स एज्युकेशन सुरु करण्याचा प्रयत्न झाला होता.
आणि हे सेक्स एज्युकेशन महाराष्ट्रात सुरु व्हावं यासाठी प्रयत्न केला होता तो डॉ. बापू काळदाते यांनी !
१९६७ च्या पूर्वी आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटनेच्या कार्यकारणीचे बापू काळदाते हे सदस्य होते. त्यामुळे या निमित्ताने त्यांना युरोपमधील अनेक देश-देशांमध्ये फिरण्याची संधी मिळाली. त्या प्रत्येक देशामधील युवकांबरोबर निरनिराळ्या प्रश्नांसबंधी, त्यांच्या शिक्षणासंबंधी जाणून घेण्याची संधी त्यांना मिळाली होती. तेंव्हा त्यांना त्या काळात या देशामधल्या शाळांत दिले जाणारे लैंगिक शिक्षणाची तरतूद पाहून विशेष कौतुक वाटले.
त्यांनी मनोमन काहीतरी ठरवले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी त्या बद्दलचे प्रयत्न चालू केले.
त्यांच्या मनात सुरु होते कि, आपल्याकडेही लैंगिक शिक्षण यावे. शासनामार्फत नववी-दहावीच्या विध्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण दिले जावे असा एक ठराव त्यांनी मांडला होता. त्यांनी यासाठी अत्यंत परिश्रम घेऊन, अभ्यास करून, संशोधन करून संपूर्ण पैलूंचा विचार करूनच त्यांनी हा ठराव शासनासमोर मांडला होता.
तेंव्हा सगळ्या पक्षांच्या सदस्यांनी या ठरावाला पाठींबा दिला होता.
पण दुर्दैव म्हणजे,
तेंव्हाच्या शिक्षणमंत्र्यांनी या ठरावाबाबत एक शब्दही न उच्चारता एका वाक्यात सांगितले कि,
“आपला ठराव मी एस.एस.सी बोर्डाकडे पाठवतो.” आणि चर्चा संपली. इतक्या मोठ्या विषयाचे गांभीर्य लक्षात न घेता हा ठराव अप्रत्यक्षपणे नाकारलाच म्हणावा लागेल, कारण त्याचे पुढे काही झालेच नाही. कित्येकदा काळदाते यानिविचारण केली मात्र शासनाकडून याची उत्तरे मात्र आली नाहीत.
तेंव्हाच स्पष्ट झाले कि, विशायचे अध्ययन व बगल न देता स्पष्ट उत्तर देण्याची टाळाटाळ विधिमंडळातील कामातील एक अडसर आहे असं मत देखील तेंव्हा काळदाते यांनी नोंदवलं होतं.
कोण आहेत हे डॉ. बापू काळदाते ?
बापूंची राजकीय कारकीर्द कार्यकर्ता म्हणून सुरू झाली.
बापू काळदाते हे राजकारणी असले तरी त्यांनी समाजशिलतेची कास कधी सोडली नाही.
समाजसेवेचे संस्कार असलेले बापू काळदाते हे राष्ट्र सेवादलातले होते. त्यांचे कुटुंब म्हणजे मराठवाड्यातलेच. त्या काळी मराठवाड्यात मराठी शिक्षणाची तितकी चांगली सोय नव्हती. म्हणून त्यांच्या वडिलांनी बापूला पंढरपूरला पाठवले होते. पुढे बापूने राष्ट्र सेवादलात भाग घेतला. तिथून मग परत मागे वळून पाहिलेच नाही.
साने गुरुजी, वि.स. खांडेकर, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, आचार्य जावडेकर यांच्या सहवास, संस्काराने ते कार्यकर्ता ते खासदार झाले. १९६७ मध्ये लातूर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले.
जनता पक्षाकडून आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघातून ते पहिल्यांदा खासदार झाले. सहाव्या लोकसभेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून ते निवडून गेले होते.
त्यापुढील काळात ते दोनदा राज्यसभेवर खासदार झाले. भारताच्या परराष्ट्र, आंतरराष्ट्रीय समन्वय शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. त्यांनी जगभरातील अनेक देशांना भेटी देऊन भारताचे प्रतिनिधित्व केले..
हे हि वाच भिडू :
- काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू.
- औरंगाबादमधल्या जिल्हा परिषदच्या शाळेतली पोरं थेट जपानी भाषेत गप्पा मारतात.
- औरंगाबादचा इतिहास आहे, ज्यांनी या गावावर विजय मिळवला त्यांनी तिथलं नाव बदललं.