डॉ.कलामांचे शिष्य अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात सेंद्रिय शेती करण्यासाठी आले.

साल होतं २००५. डीआरडीओ चे वैज्ञानिक डॉ. हरीनाथ यांना पोस्ट-डॉक्टरल वर संशोधन करण्याची अमेरिका कडून संधी देण्यात आली होती. एक संरक्षण वैज्ञानिक आणि सरकारी कर्मचारी असल्याने कॅरोलीना वैद्यकीय विद्यापीठ येथे संसोधन करण्यासाठी एक वर्षाची सुट्टीची परवानगी आवश्यक होती.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम जे तत्कालीन डीआरडीओ चे अध्यक्ष असल्यापासुन त्यांना ओळखत होते. डॉ. हरी नाथ यांना तशी परवानगी देत त्यांचे विशेष कौतुकही केले.

डॉ. हरी नाथ सांगतात,

 “कलाम सरांनी मला दोन वर्षांची परवानगी दिली पण त्यावेळी वचनही घेतले की, संशोधन पूर्ण करून मी देशात परतेल आणि देशाची सेवा करेल.”

डॉ. हरी नाथ यांच्या या प्रवासाने कलाम सरांना नक्कीच गर्व झाला असेल.

संशोधनापूर्वी, डॉ. हरी नाथ १२ वर्षांपासून संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते. पोस्ट-डॉक्टरल रिसर्च कोर्सने त्यांना भारतातील काही उत्कृष्ट वैज्ञानिकांसोबत हृदयरोगावर औषध विकसित करण्याचे कार्य करतांना पाहिले होते.

अमेरिकेला गेल्यानंतर तिथे त्यांना औषधांचे अनेक पेटंट आणि पेपर्स देण्यात आले. विशेषतः ती औषधे का आणि कशी बनवण्यात आली याची माहिती घेण्यासाठी.डॉ. हरी नाथ म्हणले,

“माझे अनेक रिसर्च हे सामान्य लोकांपर्यंत पोहचत नव्हते, पण बहुराष्ट्रीय औषधी कंपन्याना त्याच्या लाभ होत होता.”

पण घरात प्रकरण होईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापुरत्याच मर्यादित होत्या. काही वर्षानंतर त्यांच्या आईला लंबर स्पॉन्डिलायटिस आणि आर्थराईटिस आजार जडला. तेव्हा डॉ. हरी नाथ फोनवर बोलून डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यापलीकडे काही करू शकत नव्हते. तो काळ त्यांच्यासाठी भावनिकरीत्या फार कठीण होता.

डॉक्टरांकडे जाण्याच्या फारसा उपयोग नव्हता. कारण उपचार पेनकिलर आणि आयव्ही इंजेक्शन इतपतच मर्यादित होते, आणि त्यामुळे साईड इफेक्ट होऊन पोटात छाले होण्याचा धोका होता.

पुढे डॉ. हरीनाथ सांगतात,

“एका रात्री आईने मला फोन केला आणि आपल्याच शरीरात जखडल्याच्या कारणाने रडायला लागली होती. त्या त्रासातून तिची सुटका शक्य होत नव्हती.”

निराश होऊन ते त्यावर शोधत असतांना, डॉ. हरीनाथ यांना एका जापनीज वैज्ञानिकाचा लेख सापडला. त्यात मोरिंगा नावाच्या वनस्पती बद्दल माहिती दिलेली होती. ज्याने २००च्या वर आजारांवर उपचार करण्यात आले होते. ती संकल्पना एक स्थानिक लोकसाहित्याचा भाग होती, जिथे मोरिंगाची पाने मोठ्या प्रमाणात आढळायची.

डॉ. हरीनाथ ते शिकण्यासाठी आनंदित होते. कारण त्यांच्या आईच्या घराच्या पाठीमागे चार मोरिंगाची झाडे होती. त्यांनी त्यापासून उपचार करण्याची पद्धत आईला सांगितली आणि आईने झाडाचे काही पाने तोडून ते वाटून घेतले व कच्चे खाल्ले. त्याने पोटात दुखायला लागेल. म्हणून मग त्यांनी पाने पाण्यात उकळून घेऊन ते पाणी पिण्याचा सल्ला दिला.

आणि त्या उपचाराने चमत्कारासारखे काम केले. नंतर त्यांनी आईला दुखण्या बद्दल विचारले त्यावर आई हसून उत्तरल्या, “कसले दुखणे?” मी दुखण्यातून मुक्त झाली आहे. मोरिंगाच्या पाने तिला नवीन पट्टा दिला होता तर डॉ. हरी नाथ यांना एक नवी कल्पना दिली होती.

ते २०१५ मध्ये त्यांच्या गावी पेनागरम, तामिळनाडू येथे परतले. जेणेकरून ते आईची चांगली देखभाल करू शकतील. त्यांनी इतर वनस्पतींच्या मदतीने मोरिंगाच्या पानांची पावडर बनवली जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. तांच्या आईने हा उपाय करण्यासाठी त्यांना प्रोस्ताहन दिले. जेणेकरून दुखण्याने ग्रस्त असलेल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.

आज त्यांनी “मोरिंगा बुलेट” नावाने एक मिश्रण बनवले आहे. ज्यामुळे गाठीया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे त्रस्त असलेल्या स्थानिक लोकांना खूप फायदा झाला.

या उपचाराचे निरीक्षण करता, आपल्या आरोग्याविषयी असलेल्या समस्यांवर असलेले उपाय निसर्गात आहेत आणि आपण आपल्या गरजेसाठी त्यांचा कसा वापर करतो हे लक्षात आल्यावर डॉ. हरी नाथ यांनी सेंद्रिय शेती विषयी अधिक माहिती घेण्याचा निर्णय घेतला.

तर म्हणण्याप्रमाणे आपण जे खातो, तेच आपण असतो. डॉ. हरी नाथ यांनी लोकांना निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी पिके घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना तशी माती बनवायची होती.

सध्या डॉ. हरी नाथ स्वताच्या शेतात मोरिंगा सोबत वेगवेगळी स्वदेशी पिके घेतात. ज्यात कडीपत्ता, आवळा आणि मौसमी भाज्यांचा समावेश असतो. ते कंपोस्ट खड्डे बनवून त्यात गायीचे शेण मुत्र, कोरडे गवत आणि ग्रीन मॉस साठवतात. हे मिश्रण मातीत मिसळले जाते ज्याने मातीतील सेंद्रिय द्रवे परत येतात. हे मातीची जीवन वाढवत आणि रोपट्यांना अधिक स्वस्थ बनवत.

इतकेच काय तर त्यांच्याकडे कीटकावर नाशके देखील सेंद्रिय आहेत. आले, लसून आणि लाल मिरची यांची पेस्ट बनवून ती गोमुत्रात मिसळवतात व लागवडीच्या काळात ती पिकांवर फवारतात.

डॉ. हरी नाथ म्हणतात,

“शेती हेच माझ्यासाठी विज्ञान आहे. ती कला आहे, ती संस्कृती आहे. हा वसुधैव कुटुंबकम याचा मार्ग आहे. त्याचा अर्थ संपूर्ण जग एकत्रित जगणारे कुटुंब आहे.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.