राजकारणाचा अनुभव नव्हता, पैशांचं पाठबळ नव्हतं तरी डॉक्टरांनी थेट चव्हाणांना धूळ चारली..

१९८९ ची लोकसभा निवडणुक. केंद्रात राजीव गांधी यांचं सरकार होतं. गेल्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेससाठी सहानुभूतीची मोठी लाट आली होती आणि त्यात त्यांचे चारशेच्या वर खासदार निवडून आले होते.

यावेळी काँग्रेसची लाट नव्हती पण तरीही त्यांना हरवता येईल असं कोणाला वाटत नव्हतं.

महाराष्ट्रात विशेषतः नांदेड हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. फक्त काँग्रेसचा नाही तर हा शंकरराव चव्हाण यांचा बालेकिल्ला !

नांदेडचा नगराध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या शंकरराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. नांदेडच्या जनतेने या आपल्या लोकनेत्यावर भरभरून प्रेम केलं. शंकररावांनी देखील नांदेडसाठी अफाट विकासकामे केली, पाण्याचा प्रश्न सोडवला. आपला स्वच्छ आणि शिस्तबद्ध कारभारासाठी ते राज्यात ओळखले जायचे. कधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधी झाले नाहीत.

शंकरराव दोन वेळा मुख्यमंत्री झाले. खुर्चीवरून पायउतार झाल्यावर राजीव गांधींनी त्यांना केंद्रात अर्थमंत्री म्हणून नेलं. संपूर्ण देशाचा आर्थिक कारभार शंकररावांना देऊन त्यांच्यावर पंतप्रधानांनी विश्वास दाखवला होता. शंकरराव चव्हाणांनी आपला राजकीय वारसा सुपुत्र अशोकराव चव्हाण यांच्याकडे सोपवला होता. अशोकराव चव्हाण हे नांदेडचे सीटिंग खासदार होते. वडिलांनी दोन वेळा विजय मिळवलेला नांदेडचा लोकसभा मतदारसंघ.

१९८९ साली जेव्हा लोकसभा निवडणुका आल्या आणि त्यात लागलेल्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली होती.

कारण याच निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता आणि हा पराभव संपूर्ण राज्यभर गाजला. 

कारण अशोकराव चव्हाण आणि डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या दोघांच्याही पार्श्वभुमीमध्ये आणि राजकीयदृष्टय़ा अनुभवामध्ये मोठी तफावत आढळून येते.  राजकीयदृष्टय़ा नवख्या उमेदवाराने तरुण, पण उमेदवाराला हरवले हे त्याकाळात मोठीच गोष्ट होती.  

१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत जुन्या पद्धतीचे व्यवस्थापन होते म्हणायला हरकत नाही, म्हणजेच निवडणुकांत आपल्या विरोधातील उमेदवार राजकीय, आर्थिकदृष्ट्या दुबळा असावा जेणेकरून निवडणूक जिंकून आणता येईल, असंच तेंव्हाही घडलं होतं.

एक गौप्यस्फोट २०१५ झाला होता,

या निवडणुकीत डॉ. काब्दे यांना जनता दलाने नांदेडमधून उमेदवारी द्यावी अशी मागणी स्वतः चव्हाण यांनीच केली होती. 

२०१५ मध्ये नांदेडमध्ये झालेल्या डॉ. काब्दे यांचा अमृतमहोत्सवामध्ये तेंव्हाच्या निवडणुकीच्या काळातले मुख्य साक्षीदार माजी आमदार तथा ज. द.चे ज्येष्ठ नेते गंगाधर पटने यांनी हा गौप्यस्फोट केला होता.  डॉ. काब्दे यांचा अमृतमहोत्सवी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी लिहिल्या गौरवपर लेखात पटने यांनी वरील घटना सांगितली आहे.

१९८७ च्या काळात नांदेड मतदारसंघातील पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला आणि वयाच्या अवघ्या तिशीत लोकसभेचे सदस्य झाले होते.

धडाक्यात राजकारणात एन्ट्री केलेल्या चव्हाण यांना वाटत होतं कि, आता आपण पुढची सार्वत्रिक निवडणुक देखील आरामात जिंकून येऊ. आणि नेमकं याच निवडणुकीत चव्हाण यांचा सामना डॉ. काब्दे यांच्याशी झाला होता.  आपल्यासमोर विरोधकांतर्फे नवखा उमेदवार आल्याने निकालापूर्वीच चव्हाण विजयी होणार अशी चर्चा चालू होती.

स्वतः काब्दे सांगतात, मला राजकारणाचा काहीही अनुभव नव्हता पण पक्षाने विनंती केली म्हणून मी निवडणुकीत उतरलो. पैशांकडूनही काही तयारी नव्हती. कसेबसे जमवलेल्या ६ लाखांमध्ये निवडणूक लढवली. मिळेल ते वाहन पकडून मोजक्या कार्यकर्त्यांसह प्रचार केला. नांदेड मतदारसंघात तब्बल १४०० गवे येतात त्यापैकी फक्त १४० गावात मी पोहचू शकलो. विजयाची अपेक्षा नव्हतीच पण जिद्दीने लढत द्यायची एवढं ठरवलं होतं. 

पण निकाल काही वेगळाच लागला.

पटने यांनी केलेल्या गौप्यस्फोटात असा दावा केला आहे कि, आपली रणनीती यशस्वी झाली आहे.  तेंव्हाचे घटनाप्रसंग त्यांनी सांगितल्यानुसार,  ‘ती’ निवडणूक पटने यांनी लढवावी, असे जनता दलाच्या  तत्कालीन नेतृत्वाचे म्हणणे होते तर स्थानिक पातळीवर पटने यांच्यापेक्षा डॉ. काब्दे सोपे असे काँग्रेसजनांना वाटत होते. त्यावेळी अशोक चव्हाण आणि पटने यांच्यात बोलणी देखील झाली होती.

काब्दे यांनाच उमेदवारी देण्याची विनंती अशोक चव्हाण यांनी केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची आणि पटने  यांची भेट झाली तेव्हा त्यांनी ‘गंगाधर नांदेडमध्ये काय चमत्कार केलास..’ असं म्हणत काब्दे यांचे अभिनंदन केल्याचे पटने यांनी म्हटले आहे…असो, अशोक चव्हाण यांचा ‘तो’ पराभव अनपेक्षितच तर होताच तर धक्कादायक देखील ठरला.

त्या काळात चव्हाण यांची व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण झाली होती.

घरगुती गॅस, दुचाकी वाहने आदींचे वितरकपद त्यांनी मिळवले होते. त्यावरून त्यांच्यावर कित्येकदा ‘खासदार का, एजन्सीदार’ अशी टीका व्हायची. आणि डॉ. काब्दे यांनी त्यांना पराभवाला सामोर नेलं. त्यानंतर पराभव भरून काढत राजकीय पुनर्वसनासाठी चव्हाण यांना बराच काळ वाट पहावी लागली….

मात्र १९८९ च्या त्या एकमेव विजयानंतर काब्देही कधी जिंकले नाहीत..!

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.