चीननं शोधलेल्या ‘ड्रॅगन मॅन’मुळे दिड लाख वर्षांचा मानवी इतिहास पुढे आलाय…

ईशान्य चीनच्या हार्बिन शहरातील सोनहुआ नदीत एक मानवी कवटी सापडलीय. ही कवटी मानवी उत्क्रांतीची संपूर्ण इतिहासच बदलू शकते. या जीवाश्माच्या विश्लेषणाने मनुष्याच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला जाऊ शकतो. चिनी संशोधकांना या विशेष जीवाश्माला ‘ड्रॅगन मॅन’ असं नाव दिलंय.

कवटी सापडली कुठं 

हर्बिन प्रांतातील सोनहुआ नदीवर पूल बांधणार्‍या चिनी कामगारांना एक कवटी १९३३ मध्ये सापडली होती. हेईलओजिआंग या प्रांतात हर्बिन मोडतं. हेईलओजिआंगचा अर्थ होतो ब्लॅक ड्रॅगन रिव्हर. म्हणून या प्रजातीला ड्रॅगन मॅन असं नाव देण्यात आलं.

त्याकाळात हर्बिनवर जपानच राज्य  होतं. ही कवटी इतर मानवी कवट्यांपेक्षा वेगळी दिसत असल्याने त्या चीनी कामगाराने ती घरी नेली. जपानी शासकांकडून ही कवटी पकडली जाऊ नये म्हणून ती विहीरीत लपवण्यात आली होती. ही कवटी २०१८ मध्ये सापडली. ही कवटी लपवणाऱ्या व्यक्तीने आपला मृत्यू होण्यापूर्वी नातवाला याबद्दल सांगितले होते.

हा ड्रॅगन मॅन होता तरी कसा ?

आत्ताच्या होमो सेपियन्सशी मिळता जुळता मेंदू या ड्रॅगन मॅनचा आहे. या माणसाच्या डोळ्यांची खोबण चौरस आकाराच्या जवळ जाणारी आहेत. भुवया दाट होत्या, तोंडाचा आकार मोठा होता. दातही मोठाल्या आकाराचे होते. संपूर्ण स्वरुपाचं असं खूप प्राचीन जीवाश्म सापडलं आहे, असं संशोधनात स्पष्ट झालंय. चिनी संशोधकांनी ही एक वेगळी प्रजाती मानली आहे. होमो लोंगी असं या जीवाश्मांना नाव देण्यात आलं आहे. चीनी भाषेत लोंग म्हणडे ड्रॅगन.

आजच्या हार्बिन शहरातील हिवाळ्यातील तापमान पाहिल्यास हे दिसून येते की या प्रजातीला निअँडरथल पेक्षा जास्त थंडपणाचा सामना करावा लागला असेल. होमो लोंगी बद्दल असे म्हटले जाते की त्यांची जात  संपूर्ण आशियामध्ये पसरली होती. आणि ते अतिशय कठीण वातावरणात जगत होते. या आधी, इस्त्राईलमधून ही अशीच बातमी मिळाली होती की नेशेर रामला येथील उत्खननात एक कवटी सापडली आहे. वेगवेगळ्या होमो लोकसंख्येपैकी हा शेवटचा मनुष्य असू शकतो.

चीनच्या जिओ विद्यापीठातील प्रोफेसर किआंग जी यांनी भौगोलिक रसायन शास्त्राच्या सहाय्याने असा अंदाज लावला की ही कवटी १.४६ लाख वर्ष जुनी असावी. त्यात बरीच जुनी आणि नवीन वैशिष्ट्ये होती. ती थोडी होमो सेपियन्ससारखी असल्याचे आढळले. ही कवटी आधुनिक मानवांपेक्षा खूप मोठी आहे. संशोधकांचा असा विश्वास आहे की ती ५० वर्षांच्या पुरूषाची असावी. त्याचे नाक रुंद असावे, या व्यक्तीचे शरीर खूप मोठे असावे.

एका सॉफ्टवेयरच्या मदतीने, असे आढळले की ही कवटी नवीन श्रेणीची आहे जी निअँडरथल पेक्षा  आधुनिक मानवाच्या जवळ आहे. रशियामधील डेनिसोव्हा इथल्या गुहेत मोडलेल्या हाताच्या बोटाचं हाड सापडलं होतं. ५० ते ३० हजार वर्षं जुन्या या हाडाच्या डीएनएचं पृथ्थकरण करून पहिल्यांदा डेनिसोव्हन्सची ओळख पटविण्यात आली होती. निअँडरथल वंशाशी साधर्म्य असलेल्या या वंशांचे सापडलेले अवशेष हे तुकड्या तुकड्यांमध्ये होते.

केंब्रिज विद्यापीठाच्या मिराझोन लाहर यांच्या मते ड्रॅगन मॅन हा डेनिसोव्हनच आहे.

डेनिसोव्हन्स काय आणि ड्रॅगन मॅन काय अशा प्रकारातली प्रजाती इतिहासातली गूढ अशी प्रजात आहे. तिबेटमध्ये मध्ये पण अशाच प्रकारची एक प्रजाती सापडली होती. या जीवाश्मांच्या डीएनएची चाचणी केल्यावर तेही डेनिसोव्हन्स असल्याचे समजते.

आता तिबेट आणि ड्रॅगन मॅनची जबड्याची रचना सेमच आहे. त्यामुळे डेनिसोव्हन्सचा खरा चेहरा कसा आहे हे आपल्याला कळू शकेल.

इस्रायलमध्ये ही सापडलेली कवटी याच प्रकारात मोडते आहे. अतिशय प्राचीन प्रजाती आणि अर्वाचीन अशा दोन्ही काळाशी साधर्म्य साधणारे लक्षण या जीवाश्मांमध्ये दिसतात. त्यामुळे ही प्रजात बाकी तत्कालीन प्रजातींपासून वेगळी होती, असं संशोधक सांगतात. हा मानव ताकदवान स्वरुपाचा होता. मात्र त्याच जगणं कसं होतं याविषयी माहिती मिळत नाही. आता एवढा रिसर्च करून पण  इतर संशोधक या ‘ड्रॅगन मॅनला’ सहमती देत नाहीयेत.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.