या भिडूनं फक्त कंबर हलवून टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर कल्ला केलाय !

च्यामारी जगात काय व्हायरल होईल सांगता यायचं नाही.

हल्ली हल्ली तर एका छत्तीसगढच्या बारक्या पोरानं ‘जानू मारी जानेमन’ गाणं म्हणलं आणि ते व्हायरल झालं. पुढं बादशाहन त्याच्यावर रॅप बनवलं. असो तर आजचा व्हायरल कन्टेन्ट आहे. नुसतंच ढुंगण हलवून नाचणाऱ्या एका पोराचं..

नाव काय याच तर, टूटचअँनइमू.. फोटो बघा म्हणजे समजेल.

0

ते बेन म्हणतंय टू टच अँन इमू @totouchanemu, हे त्याच युजरनेम आहे. आणि त्याच खरं नाव आहे डेव्हिड अलेन.

तर हा बाबा फेमस का झालाय ?

टिकटॉकच्या टॉप फाईव्ह लाईक असणाऱ्या व्हिडिओज मध्ये या पोराचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल त्याची स्टनींग बॅक, स्टनींग बॅक, स्टनींग बॅक, आणि स्टनींग बॅकच…

हा मुलगा त्याच्या कंबरेच्या डान्स मुव्ह्जमुळेच फेमस झालाय. त्याच्या या व्हायरल व्हिडिओला ३५ मिलियन लाईक्स आणि २०७ मिलियन विव्ह्ज मिळालेत, जे कि अजून पण वाढतच आहेत.  

हा अलेन ३२ वर्षाचा आहे जो टेक्सास मध्ये राहतो. त्याला ५ मिलियन फॉलोवर्स आहेत. या पोराने कोरोनाच्या काळात टाईमपास व्हिडिओ करायला सुरुवात केली होती. त्याला टिकटॉकसाठी युजरनेम निवडायचं होत. म्हणून त्याला वाटलं ज्या इमू प्राण्याला आपण कधी टचच केलं नाही त्याच नाव देऊन टाकू.. आणि “@totouchanemu” या नावानं तो फेमस झाला. 

सुरुवातीला अलेनचे टिकटॉक व्हिडिओज एवढे काही खास चालत नव्हते. पण त्याच्या मित्राला त्याचे हे व्हिडिओज आवडायचे. सो तो हे विडिओ फेसबुकवर शेअर करायला लागला. 

त्या मित्राच्या कृपेमुळे हळूहळू का होईना, अलेनचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. त्यानंतर अलेनला वाटलं की, आता काहीतरी वेगळं बनवलं पाहिजे म्हणून त्याने रिसर्च करायला सुरुवात केली. आणि यथावकाश त्याला ट्रिक सापडलीच. त्याने दुसऱ्या टिकटॉकर्सचे विडिओ बघून आपला स्वतःचा ट्रेंड कसा जाईल हे बघायला चालू केलं.

त्यात पुढं शूट कस करायचं म्हणून यानं स्वतःच आपले व्हिडिओ ड्रोनने शूट करायला सुरुवात केली. त्याच्या या अनोख्या अंदाजामुळे त्याचे व्हिडिओ खूप जास्तच व्हायरल व्हायला लागले. आणि त्यात आणि त्याची बुटी हलवणं. लोकांना ते जाम आवडायला लागलं. तो व्हायरल व्हायला लागल्यावर अमेरिकेतल्या पत्रकारांच्या रांगा त्याच्या दारात लागल्या.

त्यावर एका पत्रकाराने अलेनला विचारलं की बाबा रे तू तुझं ढुंगण हलवून का नाचतोस, वेढब नाही का दिसत ते ? यावर अलेन आपल्या फर्ड्या इंग्रजीत म्हणतो कसा,  

“I have probably the worst butt in the world, but I’m going to shake it just like Max, because who cares?”

म्हणजे जगातल वाईट असू द्या माझं ढुंगण, मी ते हलवणार आणि नाचणार कारण इथं कोणाला फरक पडतो ? आता हे ही खरंच आहे म्हणा. कारण जेव्हा अलेनने असं नाचायला सुरुवात केली होती तेव्हा लोकांनी अक्षरशः त्याची माप काढली होती.

जाता जाता अलेन काय सांगतोय बघा…

भिडूंनो मी जेव्हा आधी जगण्यासाठी इतर काम करायचो त्यात मला आनंद मिळत नव्हता. पण आता जे मी करतोय त्यात मी खूप खुश आहे. आणि प्रत्येकानेच त्याला जे आवडेल तेच काम करावं.

त्यामुळं चला आता लागा कामाला.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.