दुबईच्या मॉलमध्ये डोक्यातली ट्यूब पेटली आणि या पठ्ठ्यानं जगातलं पहिलं फॅशन प्लॅटफॉर्म बनवलं

आज-काल सोशल मीडिया एक वेगळचं फॅड बनलय. चॅटिंग, कॉलिंग, व्हिडिओज त्याच्याही पुढे जात ते सध्या कमावण्याचं साधन बनलयं. इलेक्ट्रॉनिक वस्तू, मेकअप, खाण्यापिण्याच्या गोष्टी, यात फॅशन इंडस्ट्री सुद्धा मागे नाही. 

सध्या अनेक फॅशन ॲप आणि वेबसाईट सोशल मीडियावर उपलब्ध आहेत,  या ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात काय घ्यावं आणि काय नाही असा प्रश्न नेहमीच  डोक्यात येतो. खास करून महिला मंडळाला. कोणत्या टॉपवर  कोणती जीन्स जाईल, कुर्त्यावर कोणती ज्वेलरी सुट होईल, अशी कितीतरी प्रश्न  बायकांना पडत असतात. 

महत्त्वाचं म्हणजे सध्याचे फॅशन ट्रेंड खासकरून फॅशन  इंडस्ट्रीतील दिग्गज, सेलिब्रिटीज कडून पुढे जातात.  पण सोशल मीडिया, फॅशन अॅप, वेबसाईट किंवा दुकानात सुद्धा आपल्या आवडीचं  काही शोधणं, आजही जरा मुश्किलीचं काम आहे. जरी आपल्याला चांगलं प्रॉडक्ट मिळालं तरी त्याच्या साइज आणि स्टाईजशी ते जूळत नाही. जे  एका सेलिब्रिटी वर वेगळं दिसतं.

मात्र या गुंतागुंतीच्या परिस्थितीत एक वेबसाईट आपल्या चांगलीच फायदेशीर ठरणार आहे,  ती वेबसाईट म्हणजे हॉट नोट. जी  फ्रेडरिक देवरमपती बिझनेस मॅन बनवली आहे,  त्यानं दावा केलाय की, हॉटनॉट हे जगातलं पहिलं फॅशन सोशल मीडिया  प्लॅटफॉर्म आहे.  

दरम्यान, हा हॉटनॉट हे प्लॅटफॉर्म  सुरु होण्यामागेही एक इंटरेस्टिंग किस्सा आहे. 

तर, फ्रेडरिक एका रविवारी दुबई मॉलमध्ये होता जेव्हा त्याने एक बिलबोर्ड पाहिला ज्यावर लिहिले होते, “The new trend is here” आणि ही लाईन त्याच्या हृदयाला भिडली. त्यावेळी त्याच्या डोक्यात दोन प्रश्नांनी घर केलं पहिला म्हणजे  हा  ट्रेंड नेमकं बनवत तरी कोण? आणि दुसरा म्हणजे फॅशन इंडस्ट्रीवर फक्त मोठे ब्रँड किंवा लेबलच का राज्य करतायेत;  त्यातूनच “हॉटनॉट” ची कल्पना समोर आली.

हॉटनॉटचे संस्थापक फ्रेडरिक देवरामपती हा हैदराबाद मधल्या StuMagz चा  को – फाऊंडर आहे, जे महाविद्यालयांना डिजिटल प्लॅटफॉर्म एज-ए-सर्विस देतं.  हे टियर II आणि III शहरांमधील महाविद्यालयांवर फोकस  करतं.  

यासह, फ्रेडरिकला 2018 च्या फोर्ब्स अंडर 30 च्या लिस्टमध्येही स्थान मिळालेय.  यासोबतच तो टीईडीएक्सचा स्पीकर, ऑथर आणि मेंटर देखील आहे.

हॉटनॉट काय करतं?

ब्रॅण्ड, इन्फ्लुएंसर आणि कस्टमर त्यांच्यातील अंतर कमी करून त्यांचं सगळं फॅशन टेंशन दूर करणं हा या अॅपचा हेतू आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना फ्रेडरिक सांगतात, 

“हॉटनॉट कस्टमर्सना  आपल्या आवडत्या क्रिएटर्सची पर्सनल फीड तयार करण्यासाठी एक  प्लॅटफॉर्म देतं.  जे त्यांच्या साईज, स्किन टोन,  फॅशन नॉलेज आणि अनेक फिल्टर शेअर करतं. ब्रॅण्डला कस्टमर बिहेवियरवर रिअल-टाइम इनसाइट्स  मिळतात, क्रिएटर्स आपली स्टाइल दाखवू शकतात, आणि कस्टमर सहजपणे तो सगळा लुक एका प्लॅटफॉर्मवर शोधून खरेदी करू शकतात. ” 

B2C आणि B2C बद्दल स्पष्टीकरण देताना फ्रेडरिकने सांगितले की,

“सध्या फॅशन इंडस्ट्री मुख्यतः अनेक ईकॉमर्स साइटवर अवलंबून आहेत, जिथे ग्राहक सहजपणे वेगवेगळ्या स्टाईलचे फॅशन प्रॉडक्ट खरेदी करू शकतात. B2C आणि B2C  दोन्ही निर्विवादपणे ऑनलाइन मार्केटमध्ये   ट्रान्सफर झालेत.”

फ्रेडरिकच्या म्हणण्यानुसार,  “ऑनलाईन शॉपिंगच्या धावत्या जगात, हे एक असे प्लॅटफॉर्म आहे. जे ग्राहकांना  हॉट (उजवीकडे) किंवा नॉट (डावीकडे) स्वाइप करून फॅशन ट्रेंड ठरवण्याचा अधिकार देतं. तुम्ही वेगवेगळ्या फिल्टरचा उपयोग करून आणि आपल्या सगळ्या आवडत्या क्रिएटर्सना सेव्ह करून परफेक्ट फॅशन शोधू शकता. 

क्रिएटर्सना, हे त्यांच्या स्वतःच्या अटींवर कंटेंट तयार करण्यासाठीचं, त्यांचं सोशल आणि फॅशन कोटेशन सुधारण्यासाठी आणि  हे स्वतंत्रपणे मॉनीटाइज करण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे, कस्टमरसाठी फेमस ट्रेंडबद्दल जाणून घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.  तसेच  क्रिएटरसाठी हॉटनॉट एक असे प्लॅटफॉर्म आहे, जे क्रिएटर्सना केवळ पोस्टच नाही तर त्यांच्या कंटेंटमधून कमाई करण्याची परवानगी देते. 

फ्रेडरिक सांगतात,  लाँचिंग नंतर या प्लॅटफॉर्मवर केवळ 200  प्लस क्रिएटर्स होते आणि या दरम्यान एक नोटिफिकेशन मिळालं. ‘You have a purchase order.’ यानंतर आमचा आत्मविश्वास वाढला की, ऑनलाईन शॉपिंग आणि फॅशनच्या जगात हॉटनॉटला जागा आहे.  

आणि आता हॉटनॉट अॅपवर 10,000 पेक्षा जास्त यूजर्स आहे. बीटा लॉंचिंगनंतर अॅपवर 100+ ऑर्डर पूर्ण करण्यात हॉटनॉटला यश आलं. सध्या 500 पेक्षा जास्त ब्रँड हॉटनॉटशी जोडले गेलेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

हॉटनॉटचं बिजनेस  आणि रेव्हेन्यू मॉडेल तीन गोष्टींवर काम करतं.  त्या म्हणजे अॅफिलिएट मार्केटिंग, डिजीटल मार्केटिंग, आणि ई- कॉमर्स.

 

फ्रेडरिक देवरमपाठीसाठी एका छोट्या टिमपासून सुरुवात करणं आणि अॅप तयार करणं हे नक्कीच एक मोठे आव्हान होते, परंतु त्यांनी बीटा लाँच होईपर्यंत काम चालू ठेवले आणि आता ते यशस्वीपणे चिंता विस्तार करत आहेत.

 

सध्या या प्लॅटफॉर्मवर 1000 + क्रिएटर्स आहेत, तरी येत्या काही महिन्यात 50,000 पेक्षा जास्त क्रिएटर्सना जोडणं आणि  प्रत्येक कस्टमरचा फॅशन अॅड्रेस बनवण्यासाठी  1 मिलियन डाउनलोडचा आकडा गाठण्याची या प्लॅटफॉर्मची योजना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.