दुबईच्या शेखने सुद्धा आपल्या बायकोवर लक्ष ठेवायला पेगाससचा वापर केला होता

मध्यंतरी भारताचं राजकारण पेगासस नावाच्या वादळामुळे ढवळून निघालं होतं. संसदेच अखंड एक अधिवेशन या सॉफ्टवेअरमुळे अक्षरशः पाण्यात गेलं होतं. केंद्र सरकारवर इस्त्रायल बनावटीच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करत हेरगिरी केल्याचे आरोप झाले होते आणि विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता.

मात्र कधीकाळी भारतातील सत्ताधाऱ्यांची झोप उडवणार हे सॉफ्टवेअर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ते देखील दुबईमध्ये.

या स्पायवेअरचा वापर करुन दुबईचे शासक आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम यांनी त्यांच्या आधीच्या पत्नीवर, प्रिन्सेस हाया यांच्यावर पाळत ठेवल्याचा ठपका लंडनच्या उच्च न्यायालयाने ठेवला आहे. शेख मोहम्मद यांनी आपल्या अधिकारांचा हा अवैध्यरित्या वापर केला असल्याचं देखील लंडनमधील उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी स्पष्ट केलं आहे.

इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेल्या पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातुन शेख मोहम्मद बिन राशिद अल-मकदुम यांनी त्यांची आधीची पत्नी प्रिन्सेस हाया बिंत अल हुसेन आणि तिच्याशी संबंधित पाच लोकांवर (यात तिचे दोन वकील आणि इतर दोघांवर) पाळत ठेवली होती अशी माहिती सध्या समोर येत आहे. प्रिन्सेस हाया यांची एक वकील असलेल्या फियोना शेकल्टन यांना त्यांच्या इस्त्रायलमधील मित्राकडून याबाबतची माहिती मिळाली होती.

प्रिन्सेस हायाचा फोन गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये ११ वेळा हॅक करण्यात आला होता.

शेख मोहम्‍मद आणि त्यांची आधीची पत्नी हाया २०१९ साली आपल्या मुलांसहित युकेला गेल्या आहेत. हाया या शेख मोहम्मद यांची सहावी पत्नी आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार त्यावेळी त्या जर्मनीला शरणार्थी म्हणून गेल्या आणि त्यानंतर इंग्लंडला रवाना झाल्या होत्या.

न्यायाधीश म्हणाले, शेख मोहम्‍मद, सरकारच्या मदतीने त्या सर्व गोष्टी मिळवू इच्छित होते ज्या त्यांना योग्य वाटतात. त्यांनी हाया यांना इंग्लंडला जाण्यासाठी प्रवृत्त करण्यापासून इथं आल्यानंतर देखील सातत्याने त्रास दिला आहे. याच दरम्यान हाया यांचा फोन गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये ११ वेळा हॅक करण्यात आला होता. दुबईच्या प्रशासनाला हा आदेश शेख मोहम्मद यांनीच दिला असल्याचं पण न्यायालयाने स्पष्ट केलं.

शेख मोहम्‍मद यांच्याकडून मात्र या सर्व आरोपांना फेटाळून लावण्यात आलं आहे. ब्‍लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार शेख मोहम्मद यांच्यामते या केसमुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. आणि सध्या तरी या केसबाबत कोणताही पुरावा देण्याची वेळ आलेली नाही.

मात्र सध्यस्थितीमध्ये तरी न्यायालयाने ठेवलाला हा ठपका दुबईच्या राजघराण्यासाठी लाजिरवाणा आहे असचं म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.